Home Blog Page 119

दैनिक जनमत ०१ नोव्हेंबर २०२२ E paper

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवारांची प्रकृती बिघडली

 

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार ते ब्रीच कॅंडी रुग्णालयात ते उपचार घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीने पत्रक काढून दिली आहे. 

सतत दौरे करून जनतेमध्ये मिसळणारे नेतृत्व म्हणून खा. शरद पवार यांची ओळख आहे. वयाच्या ८० वर्षानंतर ही त्यांचा उत्साह कमी झालेला दिसत नाही. २ नोव्हेंबर ला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय होणार आहेत. ३ नोव्हेंबरला ते शिर्डी येथे जाणार असून ४ ते ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिबिरासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.


दैनिक जनमत ३१ ऑक्टोबर २०२२ E paper

भैरवनाथ साखर कारखान्याच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा





गुलाल आम्हीच लावलाय मला बुकाही लावता येतो हे विसरू नका,शेतकऱ्यांशी बेईमानी करु नका महागात पडेल माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांचा इशारा 

परंडा – दि२७ ऑक्टोबर –  परंडा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा जिल्हयाचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बेईमानी न करता शेजारील आयाण बाणगंगा सहकारी साखर कारखाण्या प्रमाणे ऊसाला दर द्यावा अन्यथा गुलाल आम्हीच लावला आहे,आम्हाला बुकाही लावला येतो असा जोरदार हल्ला माजी आ.ज्ञानेश्वर पाटील यांनी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले त्या वेळी उपस्थीत शेतकऱ्यांना संबोधीत करताना  केला.

      दि २७ ऑक्टोबर रोजी मंत्री सावंत यांच्या सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्या विरूध्द मागील गळीत हंगामाचा ऊसदर प्रतिटन २४५० रुपये देण्याच्या मागणी साठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात परंडा भुम वाशी तालूक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते .

     या वेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सावंत यांचा समाचार घेताना म्हणाले की मंत्री पदा साठी तानाजी सावंत यांनी गद्दारी केली आहे.ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांच्याशी गद्दारी खपवुन घेतली जानार नाही.चालू गळीत हंगामाचा दर भैरवनाथ साखर कारखाण्याने जाहिर करावा व मागील गळीत हंगामाचा प्रतिटन २४५० रुपयाचा  दर देण्यात यावा अन्यथा उस उत्पादक शेतकऱ्यांसह पुढील मोर्चा थेट सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखाण्यावर काडणार असुन  कारखाना बंद पडल्यास स्वतः आपण जबाबदार राहाचल असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

     परंडा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी व ऊस उत्पादक शेतकरी यांनी शिवसेने उमेदवार म्हणूण तुम्हाला गुलाल लावला आहे.त्यांनी कष्टानी पिकवीलेल्या उसाला शेजारील करखाण्या प्रमाने उस बिल अदा करा त्यांच्याशी बेईमानी करू नका अन्यथा ज्यानी आपल्याला गुलाला लावला ते बुकाही लावतील असेही पाटील महणाले

      यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर,जिल्हा प्रमुख गौतम लटके तालूका प्रमुख मेघराज पाटील,चेतन बोराटे,शिवाजी ठवरे यांनी उपस्थीत शेतकऱ्यांना मागदर्श करताना भैरवनाथ साखर कारखाण्याने आयाण बाणगंगा सहकारी साखर कारखाण्या प्रमाने प्रतिटन २४५० रुपये दर द्या आशी मागणी केली.

      यावेळी उद्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दिलीप शाळु,शहर प्रमुख इरफान शेख,मा.नगर अध्यक्ष शिवाजी मेहेर,जनार्धन मेहेर,सुभाष शिंदे, ज्ञानेश्वर गीते,चेतन बोरडे,संतोष गायगवाड,रेवण ढोरे,प्रशांत गायकवाड,ईस्माईल कुरेशी, मैनुद्दीन तुटके,शंकर ईतापे,अब्बास मुजावर, हनुमंत कातुरे, रईस मुजावर,रफीक मुजावर,सलीम मुजावर,शाहरुख मुजावर,सलीम मुजावर,शंकर जाधव, बप्पा चव्हाण,भाऊ सुर्यवंशी, बुद्धीवान गोडगे,बुद्वीवान लटके, अंकुश डांगे,प्रताप पाटील,दिपक गायकवाड,दिपक भापकर,मानीक शिदे,उमेश परदेशी,कुणाल जाधव, भालचंद्र पाटील,शिवाजी कासारे, सुरेश डाकवाले,दत्ता मेहेर,रंगणाथ देवकर,रामलीग गायकवाड,

याच्या सह शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते.

      या वेळी खासदार ओमराजे निबांळकर,मा.आ.ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाप्रमुख गौतम लटके, तालुकाप्रमुख मेघराज पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवारांच्या हस्ते उस दरवाढ मागणीचे निवेदण तहसिलदार रेणूकादास देवणीकर यांना देण्यात आले.

  ——————————————–

 ऊस दर मागणी मोर्चाची सुरुवात मा.आ. ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासापुरी चौक येथून  हा मोर्चा राजापूरा गल्ली,आगरकर गल्ली,मंडई पेठ,आठवाडी बाजार टिपू सुलतान चौक मार्गने छत्रपती चौकात पोहचताच मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.यावेळी उपस्थीत मान्य वारांनी शेतकऱ्यांना संबोधीत करताना भैरवनाथ साखर कारखाण्याकडे इतर साखर कारखाण्याप्रमाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसदर देण्याची मागणी केली.

पहिली पगार कामगारांना, अभियंत्याचे सामाजिक भान

 

कसबे तडवळे – पहिल्या नोकरीची पहिली पगार देवाच्या चरणी अनेकांनी अर्पण केली असेल मात्र समाजातील कष्टकरी घटकाला आपली पहिली पगार देऊन आपली सामजिक बांधिलकी, सामाजिक भान दाखवणारे कमीच आहेत.

 उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र लोंढे यांचे चिरंजीव सौदागर राजेंद्र लोंढे यांना पुणे येथील बजाज कंपनीमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून नोकरी लागल्यानंतर समाजामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये  जगणाऱ्या व वडिलांच्या सानिध्यात कष्ट करणाऱ्या लोकांना देव  मानवत.स्वतःचा पहिल्या महिन्यातील एक लाख रुपये पगार ३८कामगारांना प्रत्येकी २२०० रुपये वाटून.त्यांची दिवाळी गोड करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करून दिल्याबद्दल गावातील नागरिकांनी सौदागर लोंढे यांचे कौतुक केले.

प्रती हेक्टरी रु. १८००० प्रमाणे २०३६६६ लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई वितरणासाठी उपलब्ध – आ.राणाजगजितसिंह पाटील


 खरीप २०२० पिक विमा

उस्मानाबाद –
 प्रधानमंत्री फसल बीमा योजना खरीप २०२० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विमा कंपनीने २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांची पहिली यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध केलेली आहे व प्रति हेक्‍टरी रुपये १८००० नुकसान भरपाई देण्याचे देखील कबूल केले असल्याची माहिती आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.

मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचा आदेश कायम राखत मा. सर्वोच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ३ लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला परंतु मा. सर्वोच्च न्यायालयाकडील रुपये २०१.३४ कोटीचा धनाकर्ष शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून सदरील रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी पुढील एक दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. 

दरम्यानच्या काळात विमा कंपनीने २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तसेच आपल्या मागणीप्रमाणे ४०% नुकसान गृहीत धरून रुपये १८००० प्रति हेक्टर प्रमाणे भरपाई देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. उद्या दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पुनश्च विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे, व पुढील याद्या बाबत चर्चा केली जाणार आहे. उपलब्ध २०१.३४ कोटी मधून या २ लाख ३ हजार ६६६  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई अदा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

आपल्या याचिकाकर्त्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केलेली आहे व याची रीतसर नोटीस विमा कंपनी व जिल्हाधिकारी यांना देण्यात येत आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.