Home Blog Page 115

वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदारांना खेटरपूजेचा प्रसाद

 

उस्मानाबाद –

शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त विधानाने शिवप्रेमी आ.प्रसाद लाड यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. शहरातील शिवप्रेमीनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आ.प्रसाद लाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा निषेध व्यक्त केला. यावेळी एका शिवप्रेमींनी म्हटले आहे की यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान केल्यास त्याला चपलाने मारले जाईल व त्याला महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही तो कोणत्याही पक्षाचा नेता असला तरी त्याच्या विरोधात आक्रमक होऊ असा इशारा यावेळी देण्यात आला.

कवठेमहांकाळ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण थंडीच्या दिवसात तापले, गावागावात बैठकांचा सिलसिला, पडद्यामागील घडामोडींना वेग

तालुक्यात सरपंच पदासाठी 167 अर्ज तर सदस्य पदासाठी 1004 अर्ज दाखल



कवठेमहांकाळ (तानाजी शिंगाडे)

कवठेमहांकाळ तालुक्यातील होऊ घातलेल्या  28 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थंडीच्या वातावरणात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. यामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.पण माघार नंतरच प्रत्येक गावातील राजकीय वातावरण रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. शुक्रवार 2 डिसेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालय तुडुंब भरले होते सरपंच पदासाठी 167 तर सदस्य पदासाठी 1004 अर्ज दाखल झाले सरपंच व सदस्य पदासाठी अर्जांची गावनिहाय आकडेवारी खालील प्रमाणे.

अलकुड (एस) 9 – 23, आरेवाडी 3 – 23, ढोलेवाडी 7 – 27, हरोली 1- 14, कोंगनोळी 5 – 21, नरसिंहगाव ३ – ३१, शिंदेवाडी (हिं) 4 – 25,  चुडेखिंडी 4 – 25, हिंगणगाव 10 – 23, खरशिंग 4 – 26, लंगरपेठ 4 – 26, लोणारवाडी 7 – 28, शिरढोण 5 – 32, वाघोली 5 – 19, जायगव्हाण 4 – 26, आगळगाव 5 – 53,

अलकुड (एम) 6 – 28, घाटनांद्रे 6 – 41, जाखापूर 4 – 25, केरेवाडी 11- 7, कुची 4 – 49, कुकटोळी 5 – 45, रांजणी 6 – 77, विठुरायाचीवाडी 6 – 48, बोरगाव 12 – 58, सराटी  4 – 14, शेळकेवाडी 3 – 17, नागज 12 – 58. अर्ज दाखल झाले आहेत.


चौका चौकात रंगल्या चर्चा.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केल्यानंतर गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकांची चर्चा सुरू झाली चौका चौकात कट्या कट्यावर लोक याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. आत्तापर्यंत कार्यकर्त्यांच्या पातळीवर सुरू असलेली चर्चा मतदारापर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण भागातील मतदारांची मनधरणी करताना आता पुढार्‍यांना कसरत करावी लागणार आहे. ग्रामपंचायत च्या निवडणुका जाहीर झाल्या तसा ग्रामीण राजकारणांनी वेग घेतला आहे. या ठिकाणचे राजकारण तापू लागले आहे. गाव पुढार्‍यांची मतदारांवर प्रभाव असणारे कार्यकर्ते मिळवण्यासाठी धावाधाव सुरू आहे. खुले सरपंच पद असलेल्या ठिकाणी अत्यंत चुरशीने निवडणूक होणार आहे या ठिकाणी काट्याची टक्कर अपेक्षित आहे. सरपंच पदाबरोबरच सदस्य पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे थेट जनतेतून सरपंच पद असल्याने गावाची सारी सूत्रे सरपंचाच्या हातात राहणार आहेत प्रत्येक गटाचे सरपंच पदाचा उमेदवार हे पहिले टार्गेट असणार आहे पॅनल प्रमुखांना सरपंच पदाचा उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे उमेदवार हा जनतेच्या पसंतीस उतरणारा आणि महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या मर्जीतील असा महत्त्वाचा निकष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खुल्या प्रवर्गातील सरपंच पदासाठी पॅनल प्रमुखापैकी कोणाला तरी एकाला संधी मिळणार हे उघड गुपित आहे. कारण सत्तेच्या चाव्या कोणीही दुसऱ्याच्या हातात देणार नाही हे वास्तव आहे कारण केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायत यांना मिळत असतो कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमासाठी सर्वच राजकीय पुढारी आजी-माजी सरपंच आणि ग्रामपंचायत यांचे भावी सदस्य सरपंचाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आत्ता कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणावर उडी घेत आहे गाव पातळीवरील निवडणुकीत तरुणांचा चांगला सहभाग वाढत असल्याने चित्र दिसत आहे. यातून अनेकांची एकाधिकारशाही ही संपुष्टात येणार आहे कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात आणि नेत्यांनी गावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे याचा फटका या निवडणुकीत त्यांना बसणार आहे निवडणूक आणि मतदानाबाबत आता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. निवडणुका लागल्यानंतर कार्यकर्त्यांची जुळवा जुळवा करावी लागत आहे. निवडणुकीत होणारा खर्च ही सामान्यांच्या आवाक्या बाहेरच आहे कवठेमहांकाळ तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचात मध्ये गुलाबी थंडीत गावागावातील राजकारण तापू लागले आहे. पॅनलच्या उभारणीसह उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत.

दैनिक जनमत ०५ डिसेंबर २०२२ E paper

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

मुंबई –  मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीस उपस्थित होते.  

संक्षिप्त मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे – 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची #भरती प्रक्रियेला गती देणार

 दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र #दिव्यांगकल्याण विभाग स्थापन करणार. ३ डिसेंबरपासून विभाग कार्यरत 

अधिसंख्य पदावरील अधिकारी- कर्मचाऱ्यांना काही सेवाविषयक लाभ देणार. अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करणार

 सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर. राज्य शासनाची ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.

 प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना १ हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क  आकारणार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थ्याना होणार फायदा. 

 गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार. राज्यातील २३८६ गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी २०० चौ.मी. जागा मोफत देणार. 

 अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या ८२६ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता. ४३१७ हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या १६९.१४ कोटी खर्चास सुधारित मान्यता. ३६५९ हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ

 शासकीय कर्मचाऱ्यांना २००६ ते २००८  या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीच्या आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणारमहाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती.

 बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेस अनुदानित तत्वावर मान्यता

ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट पिंपरखेड येथे संविधान दिन साजरा व शहीदांना आदरांजली

   

परंडा – (प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. 

   संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. 

    चहा विकणारा सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो हि संविधानाची ताकत आहे हे विसरून चालणार नाही.तसेच संविधानामुळेच महिलांना सन्मानाची वागणूक आणि हक्क मिळाला आहे. क्रांतीसुर्य महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले.ग्लोबल शाळेतील मुलांना संविधानाचे महत्व व त्याचा अभ्यास होण्यासाठी प्रार्थनेच्या वेळी दररोज मुलांकडून संविधान म्हणवून घेतले जाते हे विशेष.

           तसेच मुंबई  येथे २६/११ च्या झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री गोरख मोरजकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केले तसेच यावेळी संस्थेच्या सचिवा तथा जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा शिवमती आशाताई मोरजकर म्हणल्या की ,२६ नोव्हे.२००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्लामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकुण १६६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर अदांजे ७०० जण जखमी झाले होते.पोलिस जवानांनी हा हल्ला परतवून लावत नऊ दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले होते तसेच अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते ह्या हल्ल्यात १८ पोलिस जवानांना वीरमरण आले म्हणून शहीद जवानांना मानवंदना देत आदरांजली वाहण्यात आली. तसेच माढा तालुक्यातील सुलतानपुर गावचे शहीद पोलिस राहुल शिंदे हे शिवमती आशाताई मोरजकर यांचा विद्यार्थी होते त्यांच्या आठवणीला उजाळा देत असताना आशाताईंना आश्रू अनावर झाले त्यामुळे प्रशाले मध्ये भावनिक वातावरण झाले होते. 

     याप्रसंगी ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट च्या मुख्याध्यापिकासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.