नमस्ते धाराशिव साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक संदीप कोकाटे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची;कळंब तालुका पत्रकार संघाची मागणी
पारा (राहुल शेळके ):हावरगाव तालुका कळंब येथील साप्ताहिक नमस्ते धाराशिव व युट्युब चॅनलचे संपादक संदीप अशोक कोकाटे यांच्यावर हावरगाव येथे अतुल आबासाहेब कोल्हे अविनाश चौधरी व विष्णू यादव कोल्हे यांनी मागील बातमीचा राग काढून आर्वच्या भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या लोकांपासून पासून संदीप व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे यासाठी संबंधित हल्लेखोर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा व कारवाई व्हावी अशी मागणी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने एम रमेश सहायक पोलीस अधीक्षक पोलीस उपविभागीय कार्यालय कळंब यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे हे निवेदन पोलीस उपनिरीक्षक पुजारवाड यांनी स्वीकारले या निवेदनावर कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश (बप्पा) टोणगे पत्रकार, दिलीप गंभीरे ,शितल घोंगडे ,परमेश्वर पालकर ,अकीब पटेल ,संभाजी गिड्डे ,माधवसिंग राजपूत,जय नारायण दरक बंडू ताटे यांच्या सह्या आहेत
चार हजाराची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
उस्मानाबाद – ग्रामीण स्तरावर लाचखोरी किती बळावली आहे याचा प्रत्यय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत असलेल्या कारवाया पाहून कळते. एका ग्रामसेवकाला चार हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड,वय 44 वर्षे
पद,ग्रामसेवक ,सजा कुमाळवाडी अंतर्गत आळणी आणि तुगाव, पंचायत समिती कार्यालय उस्मानाबाद जि. उस्मानाबाद यांनी तक्रारदार ( वय ६५) यांचे राहते घर असलेल्या गायरान जागेची तक्रारदार यांचे नावे नोंद घेण्यासाठी तसेच घरकुल मंजुरीसाठी आरोपी लोकसेवक नामे सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यानंतर संबंधित ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी :- विकास राठोड, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद यांनी काम पाहिले तर सापळा पथकात पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख ,मधुकर जाधव, विशाल डोके,सचिन शेवाळे यांचा सहभाग होता.संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद,विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद.प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद यांनी कारवाईसाठी मार्गदर्शन केले















































































