Home Blog Page 113

नमस्ते धाराशिव साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक संदीप कोकाटे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची;कळंब तालुका पत्रकार संघाची मागणी

पारा (राहुल शेळके ):हावरगाव तालुका कळंब येथील साप्ताहिक नमस्ते धाराशिव व युट्युब चॅनलचे संपादक संदीप अशोक कोकाटे यांच्यावर हावरगाव येथे अतुल आबासाहेब कोल्हे अविनाश चौधरी व विष्णू यादव कोल्हे यांनी मागील बातमीचा राग काढून आर्वच्या भाषेत  शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या लोकांपासून पासून संदीप व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे यासाठी संबंधित हल्लेखोर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा व कारवाई व्हावी अशी मागणी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने एम रमेश सहायक पोलीस अधीक्षक पोलीस उपविभागीय कार्यालय कळंब यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे हे निवेदन पोलीस उपनिरीक्षक पुजारवाड यांनी स्वीकारले या निवेदनावर कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश (बप्पा) टोणगे पत्रकार, दिलीप गंभीरे ,शितल घोंगडे ,परमेश्वर पालकर ,अकीब पटेल ,संभाजी गिड्डे ,माधवसिंग राजपूत,जय नारायण दरक बंडू ताटे यांच्या सह्या आहेत

दैनिक जनमत २१ डिसेंबर २०२२ E paper

 

दैनिक जनमत २० डिसेंबर २०२२ E paper

चार हजाराची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 

उस्मानाबाद – ग्रामीण स्तरावर लाचखोरी किती बळावली आहे याचा प्रत्यय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत असलेल्या कारवाया पाहून कळते. एका ग्रामसेवकाला चार हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड,वय 44  वर्षे 

पद,ग्रामसेवक ,सजा कुमाळवाडी अंतर्गत आळणी आणि तुगाव, पंचायत समिती कार्यालय उस्मानाबाद जि. उस्मानाबाद यांनी तक्रारदार ( वय ६५) यांचे राहते घर असलेल्या गायरान जागेची तक्रारदार यांचे नावे नोंद घेण्यासाठी तसेच घरकुल मंजुरीसाठी आरोपी लोकसेवक नामे सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यानंतर संबंधित ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ डिसेंबर रोजी ताब्यात  घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा अधिकारी :- विकास राठोड, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद यांनी काम पाहिले तर सापळा पथकात पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख ,मधुकर जाधव, विशाल डोके,सचिन शेवाळे यांचा सहभाग होता.संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद,विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद.प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद यांनी कारवाईसाठी मार्गदर्शन केले

अवैध पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह एक आरोपी अटक

 


उस्मानाबाद – शहरात अवैध पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह एक आरोपी अटक करण्यात आली आहे.स्था.गु.शा. च्या पथकास गुप्‍त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दि. 12 डिसेंबर रोजी उस्मानाबाद शहरातील बायपास रस्त्यालगतच्या हॉटेल साईकमलसमोर अंगावर पिवळसर सदरा व करड्या रंगाची विजार परिधान केलेला एक इसम अवैध पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. यावर स्था.गु.शा. चे पोनि- यशवंत जाधव यांनी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांना सदर माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे एक पथक नमूद ठिकाणी सापळा लाउन होते. यावर सायंकाळी 19.00 वा. सु. नमूद हॉटेलसमारे बातमीतील नमूद वर्णनाचा एक इसम आल्याने पथकाने संशयावरुन त्याची विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव- किशोर लिंबराज माळी, वय 34 वर्षे, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद असे सांगीतले. तो पथकास पाहुन गांगरल्यासाखा झाल्याने पथकाने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे लोखंडी धातुचे पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे असा एकुण अंदाजे 17,400 ₹ किंमतीचे पिस्तुल व काडतुसे मिळाले. यावर पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील नमूद पिस्तुल व काडतुसे जप्त करुन त्याच्याविरुध्द आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 361/2022 हा शस्त्र कायदा कलम- 3/25 अंतर्गत नोंदवण्यात आला असुन पुढील तपास आनंदनगर पो.ठा. चे सपोनि- खरड हे करत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक,  नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- यशवंत जाधव, पोउपनि- संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- समाधान वाघमारे, विनोद जानराव, फरहान पठाण, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर यांच्या पथकाने केली आहे.