Home Blog Page 112

दैनिक जनमत २९ डिसेंबर २०२२ E paper

 

दैनिक जनमत २८ डिसेंबर २०२२ E paper

दैनिक जनमत २७ डिसेंबर २०२२ E paper

 

BF-7 व्हेरिएन्ट अनुषंगाने प्रशासनाचे तुळजाभवानी भक्तांसाठी आवाहन

 

उस्मानाबाद – कोव्हिड च्या BF-7 व्हेरिएन्ट अनुषंगाने तुळजाभवानी मंदिरासाठी प्रशासनाने

सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी यांच्यासाठी सूचना निर्गमित करू आवाहन केले असून त्यात म्हटले आहे की, Indian Medical Association (IMA), नवी दिल्ली यांची दिनांक 22/12/2022 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये संपुर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएन्ट BF-7 संक्रमित झाला असल्याने नागरीकांनी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

 श्री तुळजाभवानी मंदिरात येणारे सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी बांधव व कर्मचारी यांनी कोरोना विषाणूंचा प्रदुर्भाव रोखणेसाठी खाली नमुद सुचनांचे तंतोतंत पालन करावे.

1) मंदिर व मंदिर परिसरात व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरण्यात यावेत.

2) सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात यावे. 3) आपले हात नियमित साबनाने अथवा सॅनिटयझरने स्वच्छ ठेवण्यात यावेत.

4) अंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा.

5) जर आपणास ताप, खोकला, सर्दी, संडास, उल्टी, डोकेदुखी व सांधेदुखी या आजारांचा त्रास होत असल्यास तात्काळ नजीकच्या दावाखन्यास भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

6) शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

ज्ञानवृक्षाचा शतकपूर्ती महोत्सव व माजी विद्यार्थी मेळावा पारा शाळेत संपन्न

 

राजेश भराटे यांच्या ४५ व्या चालू घडामोडी पुस्तकाचे केले प्रकाशन

पारा (राहुल शेळके ):उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद पारा शाळेस यावर्षी 100वर्ष यशस्वी पूर्ण झाले.त्यानिमित्ताने 

“आम्ही पारेकर प्रतिष्ठान पारा, जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा पारा, व शाळा व्यवस्थापन समिती पारा” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,ज्ञानवृक्षाचा शतकपूर्ती महोत्सव व माजी विद्यार्थी मेळावा ‘गौरव माझ्या शाळेचा, सन्मान करू विद्यार्थ्यांचा ‘हा कार्यक्रम दि.23डिसेंबर शुक्रवारी हा सोहळा संम्पन्न झाला.यां कार्यक्रम प्रसंगी 

 प्रमुख उपस्थिती म्हणून एम. रमेश (भा.पो.से.)सहाय्यक पोलीस अधीक्षक कळंब उस्मानाबाद , प्रांजल शिंदे( मुख्य कार्यकारी अधिकारी), जि.प.उस्मानाबाद, सुरेश बुधवंत(पोलीस निरीक्षक वाशी ), सुभाष शिनगारे (पोलीस निरीक्षक माटुंगा मुंबई ),श्री. भारत बन ( गटशिक्षणाधिकारी पं. स. वाशी), कासेकर (प्रभारी गटविकास अधिकारी वाशी )या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा सम्पन्न झाला.

         यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रांजल शिंदे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी स्वप्नाली भराटे यांचे दुःखी गंगा हे पुस्तकं तसेच राजेश जीवन भराटे यांचे 45वे वार्षिकी चालू घडामोडी 2023यां पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विदयार्थ्यांनी महाराष्ट्र दर्शन गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यां कार्यक्रमात 100वर्षात यां शाळेतून शिकून गेलेल्या जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

          यावेळी सरपंच राजेंद्र काशिद, शाळेचे मुख्याध्यापक मोटे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल डोरले, उपाध्यक्ष, सदस्य,आम्ही पारेकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष विष्णू हिंगणे, उपाध्यक्ष रघुनाथ भराटे, किशोर पानसे, मधुकर कुरुंद, सखाराम धुमाळ, श्रीराम शेळके, सखाराम भराटे सर्व सदस्य, गावकरी, शाळेचे सर्व माजी विध्यार्थी उपस्थित होतें. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुब शेख सर  यांनी तर आभार किशोर पानसे सर यांनी मानले.

दुधगाव ग्रापं निवडणुकीत परिवर्तन पॅनल विजयी,कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून केला जल्लोष

 


उस्मानाबाद:

उस्मानाबाद तालुक्यातील  दुधगाव येथील अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलने सरपंच पदासह ७जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले आहे.

येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या ७असून  गावातील एकुण मतदान ८७०होते तर  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  तिरंगी लढत पाहायला मिळाली.ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून पॅनल प्रमुख अमर मुलाणी, रविंद्र चव्हाण, अमीन काटे, विनोद चव्हाण, इन्नुस शेख, खालिल शेख, हामजू सय्यद, तय्यब सय्यद, गणेश पाटील, कय्युम मुलाणी आदींनी गावातील सर्व नागरीकांच्या भेठीगाठी समस्या जाणून घेत प्रचार यंत्रणा  राबवून निवडनुकीत मतदान करण्याचे आवाहन केले होते. आ. राणाजगजितसिंह पाटील व खा.ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत परिवर्तन पॅनल ची स्थापना केली होती . यापूर्वी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील यांचे बंधू शाम सुंदर पाटील यांची सत्ता होती.जनतेने त्यांना नाकारले असुन त्यांना फक्त ४० मतांवर समाधान मानावं लागले आहे.दुधगाव येथील जनतेने विश्वास टाकून परिवर्तन पॅनला विजयी केले. यामध्ये सरपंच पदाचे उमेदवार शीला पुरी३६४मतांनी विजयी झाल्या यांच्यासह खा.निंबाळकर गटाचे ५तर आ. पाटील गटाचे २उमेदवार विजयी झाले आहेत.

निवडणुक निकालाची घोषणा होताच विजयी पॅनलच्या समर्थकांनी  गुलाल उधळत, फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.