पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सदस्य पदाचा अर्ज बाद होऊ न देण्यासाठी मागितली लाच, दोघांवर कारवाई
तक्रारदार पुरुषाकडे वय-44 वर्षे आरोपी लोकसेवक भाऊसाहेब रावसाहेब हुंबे,वय 54 वर्षे पद उपलेखापरीक्षक -2, कार्यालय – लेखापरीक्षक श्रेणी 2, सहकारी संस्था,भूम ता. भूम् जि. उस्मानाबाद(वर्ग-3) जाकिर हुसैन अब्दुल रऊफ काझी. पद – गट्सचिव, कार्यालय – विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म., रामकुंड ता. भुम जि. उस्मनाबाद यांनी तक्रादारकडे
लाचेची मागणी रुपये 2,000/- दि.30 डिसेंबरला केली होती कारण यातील तक्रारदार यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म., रामकुंड च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सदस्य पदासाठी अर्ज केला असता सदरचा अर्ज बाद होऊ न देण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी यातील अलोसे 01 व 02 यांनी पंचासमक्ष 2,000/- रुपयांची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केलें व आलोसे क्र.01 यांनी पांचासमक्ष 2,000/- रूपये स्वतः स्वीकारले असता ताब्यात घेण्यात आले आहे या सापळा पथक -पोलीस अमलदार अर्जुन मारकड, शिधेश्वर तावसकर, विष्णु बेळे, जाकेर काझी, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे आहेत
शोभेच्या दारुच्या कारखान्यात स्फोट,५ मृत्यू तर २५जखमी
कारी(दि०१) प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील पांगरी -शिराळे मार्गावर असलेल्या शोभेच्या दारुच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी (दि०१) रोजी दुपारी 3वाजण्याच्या सुमारास घडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कारखान्यामधील स्फोटके सुरूच होती. पांगरी येथील इसमाचा हा कारखाना आहे. कारखाना हा जळून खाक झाला असुन कारखान्यामध्ये किती जण कामाला होते याचा शोध सुरू आहे. यामध्ये अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनाही दाखल झाले आहेत. मात्र कारखाण्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचाव कार्यास अडचणी निर्माण होत आहेत.
दुपारी ४वाजेपर्यंत ५ मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात आले होते. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ईट जि. प. प्रशाला शाळेमध्ये आनंदनगरी मेळावा, विद्यार्थ्यांनी जाणून घेतले व्यावहारिक ज्ञान
ईट (सोमेश्वर स्वामी)- भुम तालुक्यातील ईट जि.प प्रशाला शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय जिवनासोबतच व्यवहारीक ज्ञान देखील मिळावे, म्हणून आनंद नगरी मेळाव्याचे 31 डिसेंबर शनिवार रोजी आयोजन करण्यात आले . यामध्ये 163 विद्यार्थ्यांनी स्टॉल उभारले होते. तीन तासांमध्ये विविध पदार्थाच्या विक्रीतून अनेक रुपयांची विद्यार्थ्यांनी कमाई केली. यावेळी आनंद नगरी कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय कमिटी अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्य व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणसोबत व्यवहारीक ज्ञान मिळणे देखील गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातुन दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून ईट जि प प्रशाले कडून आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील तब्बल 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरुनच साहित्य बनवून आणुन शालेय आवारात स्टॉल लावले. विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. या मेळाव्याला एकप्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.
शालेय जीवनात शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान देखील येणे गरजेचे आहे. आयोजित आनंद नगरी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टाँल लावून स्वतःहा बनविलेल्या पदार्थाची विक्री करुन त्यातुन दोन पैसे मिळवले हे खरच कौतुकास्पद आहे. प्रशालेने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात नेहमीच चालना देईल या हेतूने प्रशाले कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग कवडे, सहशिक्षक हुंबे सर, गाडे सर, कोळी सर, कचरे सर ,सातपुते सर , बाजीराव कवडे सर,नानासाहेब कवडे सर, पवार सर, पितळे सर ,कांबळे सर आंधळे सर , तसेच सहशिक्षिका कुलकर्णी मॅडम,भोसले मॅडम, गिरी मॅडम,गवळी मॅडम,देशमुख मॅडम, यांनी परिश्रम घेतले.
सुधाताई महारुद्र मोटे यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न
डॉ.सोनाली मोटे यांनी ५ वी ते १२ वी शिक्षण घेत असलेल्या १०० मुलीच्या पदवी पर्यतच्या शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी
परंडा (भजनदास गुडे ) बाणगंगा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट भूम संचलित कै.महारुद्र बप्पा मोटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परंडाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्धघाट व बक्षीस वितरण संस्थेच्या अध्यक्षा सुधाताई महारुद्र मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक अॅड.रणजीत दादा मोटे,डॉ.सौ. सोनाली रणजीत मोटे,चि. नंदवर्धन रणजीत मोटे,बाणगंगा सहकारी कारखान्याचे संचालक भाऊसाहेब खरसडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.संदीप पाटील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील जिल्हा मजूर फेडरेशन संचालक राजाभाऊ पाटील, अॅड.सुहास पाटील,अतुल गोफने, महेश खुळे,नंदू शिंदे,श्रीहरी नायकवडी,डॉ.वाघमोडे,चत्रगुन जाधव,ताहेर पटेल,अमर यादव, आण्णा बुरंगे,गिरवलीचे सरपंच मोटे,सुचित सातपुते सर, बाणगंगा हायस्कूलचे मुख्याध्यापक मधुकर लिमकर सर,रामेश्वर विद्यालय शिराळाचे मुख्याध्यापक नारायण कडेकर सर,महारुद्र बप्पा मोटे विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत यादव सर,परंडा पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक कविता मुसळे मॅडम,रामराजे शिंदे, यांच्यासह विद्यार्थी,पालक, शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी विद्यालयातीला कुस्ती, ऍथलेटिक्स,कबड्डी,कराटे,विज्ञान प्रदर्शन,शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी मध्ये प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई महारुद्र मोटे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला,
डॉ.सौ.सोनाली रणजीत मोटे यांनी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुली पैकी गरजूवंत १०० मुलींना दत्तक घेऊन पदवी पर्यंतचा सर्व खर्च करण्याचे जाहीर केले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विभागीय अध्यक्षा सौ.वैशालीताई राहुल मोटे यांचा ३१ डिसेंबरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गॅदरिंगच्या कार्यक्रमात सुधाताई मोटे,डॉ.सोनाली मोटे,व ॲड. रणजीत दादा मोटे यांच्या हस्ते केक कापून वैशालीताई मोटे यांना शुभेच्छा दिल्या.
मोटे विद्यालयाचा मुलींचा कबड्डी संघ मुंबई येथे होणाऱ्या कबड्डी क्रिडा स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.त्याचे नुकतेच पत्र विद्यालयाला प्राप्त झाले असून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक अशा पद्धतीने आपल्या कलागुणाचे सादरीकरण करून स्रोत्यांना तीन तास मंत्रमुग्ध केले .
विद्यालयाचे व कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शरद झोंबाडे सर,प्रा.सौ वनवे मॅडम, जगताप सर,सुरवसे सर,यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शरद झोंबाडे,बाबूराव काळे सर व प्रा.वणवे मॅडम यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वीते साठी विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत यादव सर,पटेल सर,सुधीर यादव सर,प्रा.मारकड सर,प्रा.देशमाने सर,प्रा.अजित देशमुख,प्रा. रणजीत देशमुख,प्रा.खैरे सर,प्रा. मणियार सर,प्रा.आटोळे सर,प्रा.मेटकर सर्,भोरे सर,सरडे सर,भोसले सर,साठे सर,हाके सर, इतापे सर,भैरट सर यांच्यासह राजाभाऊ बनसोडे,अशोक कोकणे,देविदास गरड,थोरबोले या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर कुटुंबातंर्गत जमीनीची वाटणी करण्यास परवानगी- आमदार कैलास घाडगे पाटलांची माहिती
उस्मानाबाद (प्रतिनिधी) – कुटंबाच्या अंतर्गत शेतजमीनीचे विभाजन आता शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर होणार आहे.खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर यानी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्याकडे दिनांक 17 नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयात भेटून मागणी केली होती.त्यानुसार शासनाने गुरुवारी (ता. २९) रोजी रात्री त्यासबंधी परिपत्रक जारी केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतजमिनीचे कायदेशीर वारसदार असतानासुद्धा शेतजमिनीच्या विभाजनापासून वंचित असलेल्या वारसदारांना न्याय देण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमातील तरतुदीनुसार दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरुन किंवा सहधारकाने अर्ज केल्यास जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे,त्याचे एकत्रिकरण करणे, अधिनियमातील तरतुदीस अधिन राहुन धारण जमीनीचे विभाजन करण्याची पध्दती सांगण्यात आलेली आहे. पंरतु जमीन महसुल अधिनियमात सहधारकाची व्याख्या स्पष्ट नसल्याने क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी सहधारकाच्या नावे शेतजमीनीची विभागणी करण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे शेतजमीनीचे कायदेशीर वारसदार असतानासुध्दा विभाजनापासुन असे वारसदार वंचित राहत होते.सर्वोच्च न्यायालयातील कैलास राय वि.जय जय राम व इतर आणि सईद गंलाम वि. सईद शाह अहमद या दाव्याच्या निवाड्यात सहधारक म्हणजे फक्त सातबारा सदरी नाव असलेल्या व्यक्तीच नव्हे तर एकत्र हिंदु कुटुंबातील भविष्यात वारसा हक्काने सात बारा सदरी दाखल होणारे कायदेशीर वारस देखील सहधारक किंवा संयुक्त धारक आहेत असे स्पष्ट केले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्याआधारे वडिलोपार्जीत शेतजमीनीच्या कायदेशीर वारसाकडुन शेतजमीनीच्या विभाजनासाठी अर्ज प्राप्त झाल्यास सहधारकाने अर्ज केल्यानंतर जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रिकरण करणे आता अधिक सोपे होणार आहे.अधिनियम १९४७ तरतुदींना अधिन राहुन जिल्हयातील महसुल मंडळनिहाय विशेष मोहिम राबवुन जमीनीचे विभाजन करण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत.शेतजमीनीचे कायदेशीर वारसदार असतानासुध्दा विभाजनापासुन वंचित असलेल्या वारसदारांना न्याय देण्याबाबत संबंधितांना आदेशित करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाकडून याबाबत परिपत्रक काढून संबंधित उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,नायब तहसिलदार यांना आदेश दिले होते.























































