Home Blog Page 106

दैनिक जनमत १० फेब्रुवारी २०२३ E paper

प्रशासनाचा सावळा गोंधळ, उरुसामध्ये प्रथमोपचार केंद्रच नाही

 

उस्मानाबाद – उस्मानाबाद येथे हजरत ख्वाजा शमशोद्दिन गाजी रहे यांचा उरूस सुरू असून यातील चिरागा या धार्मिक विधी दरम्यान आज पहाटे अडीच च्या दरम्यान वळू घुसल्याने गोंधळ होऊन १४ भाविक जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.  कोणतीही यात्रा असेल तर भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रथमोपचार केंद्र सुरू करणे अपेक्षित असते मात्र उरुसामध्ये कोठेच प्रथमापोचार केंद्र आढळून आले नाही. उस्मानाबाद येथील हा दर्गाह भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा दर्गाह असून लाखो भाविक या ऊरुसासाठी येत असतात. यात अबालवृद्धांचा समावेश असतो. आरोग्याबाबत काही समस्या निर्माण झाल्यास उरुसाच्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र असणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी यावेळी बोलून दाखवली. याबाबत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 


ही अनपेक्षित घटना 

उरुसामध्ये घडलेली घटना ही अनपेक्षित आहे. उरूस होणाऱ्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजना बाबत सूचना केलेल्या आहेत. आमची एक टीम सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत उरुसामध्ये भेट देऊन देखरेख करत असते.

 वृषाली तेलोरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

दैनिक जनमत ०९ फेब्रुवारी २०२३ E paper

2022 च्या पिकविम्याची उर्वरीत पन्नास टक्के रक्कम देण्याचे विभागीय आयुक्ताचे आदेश

 


आमदार कैलास पाटील यांची माहिती

उस्मानाबाद (प्रतिनिधी):-पिकविम्याची उर्वरीत पन्नास टक्के रक्कम देण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दिल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यानी दिली आहे. पिकविमा रक्कम असमान असल्याच्या आमदार घाडगे पाटील यांच्या तक्रारीवरुन खरीप 2022 पिकविमासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली.

खरीप 2022 मध्ये केंद्राच्या अधिसुचनेचा चुकीच्या आधार घेऊन केंद्र सरकारच्या कृषी आयुर्विमा कंपनीने पन्नास टक्केच रक्कम दिली आहे. पिककापणी प्रयोग व नुकसानीचे प्रमाण गृहित धरुन ही पन्नास टक्केच रक्कम वाटप झाली आहे.एक ते 30 नोव्हेंबर हा जिल्ह्याच्या कापणी प्रयोगाचा काळ करारामध्ये नमुद आहे.शेतकऱ्यांच्या पुर्वसुचना ऑक्टोबर महिन्यातील असुन कंपनीने पंचनामे देखील त्यादरम्यान केले आहेत. हा निकष जिल्ह्यामध्ये कसा लागु होणार ? यावर आमदार घाडगे पाटील यानी आक्षेप घेतला होता.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पंचनामे  करण्यात आले मात्र केंद्र सरकारच्या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणुक केली.विमा रक्कमेचे असमान वाटप केले. बांधाशेजारीच दोन शेतकऱ्यांच्या वाटपामध्ये मोठी तफावत दिसुन आल्याने शेतकऱ्यांतुन संताप व्यक्त होत आहे.प्रशासन स्तरावरुन कंपनीला अनेकदा सुचना करुनही कंपनी पंचनामे देण्यास टाळाटाळ केली.यासाठी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे १४ जानेवारीला रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी (ता.आठ) विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी विभागीय तक्रार निवारण समितीची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये श्री.केंद्रेकर यानी केंद्राच्या अधिसुचना जिल्ह्यात लागु होत नसल्याची ठाम भुमिका घेत कंपनीस उर्वरीत ५०% टक्के रक्कम देण्याचे आदेश दिले. शिवाय पंचनाम्याच्या प्रती एक महिन्याच्या आत (आठ मार्चपर्यंत) देण्यास कंपनीने मान्यता दर्शविली आहे. कंपनीकडुन या आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देत फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्याचे आदेश श्री. केंद्रेकर यानी दिल्याचे घाडगे पाटील यानी सांगितले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या विमा रक्कमे एवढी म्हणजे जवळपास 259 कोटी रुपये  इतकी रक्कम मिळणार आहे.

एक लाख 44 हजार पूर्वसूचना चुकीच्या पध्दतीने रद्द करण्यात आल्याचा आक्षेप आमदार घाडगे पाटील यांनी घेतल्यानंतर दिसत आहे, दोन आठवड्यात प्रत्येक शेतकऱ्यांच्या पुर्वसुचनेचा आढावा घेतला जाणार आहे. या आढाव्यात नाकारण्यात आलेल्या पूर्वसूचना कोणत्या कारणाने नाकारल्या याची पूर्वसूचना निहाय माहिती केंद्र सरकारच्या विमा कंपनीने द्यावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 

केंद्र सरकारच्या विमा कंपनीने २३ नोव्हेंबर २०२२ ला प्राप्त झालेल्या पूर्वसूचने पैकी ४०९५२ सर्वे करणे प्रलंबित असल्याचे कळविले होते. तर ११  जानेवारी २०२३ ला हे सर्व सर्वे पूर्ण केल्याचे कंपनीने कळविले आहे. नोव्हेंबर नंतर हे सर्वे कधी व कसे पूर्ण केले याचे पुरावे ही केंद्र सरकारच्या विमा कंपनीने द्यावे असे आदेश दिले आहेत. 

आयुक्तांनी दिलेल्या या तिन्ही आदेशाचे पालन झाल्यास ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.  हे तीन महत्वाचे आदेश तात्काळ  पारीत करून दिल्याने कंपनीची  मुजोरी आतातरी कमी होईल अशी अपेक्षा आमदार घाडगे पाटील यांनी व्यक्त केली. शिवाय शेतकऱ्यांसाठीचा हा लढा असाच सुरु राहणार असल्याचा विश्वास यावेळी घाडगे पाटील यांनी दिला आहे. 

यावेळी शेतकरी प्रतिनिधी अनिल जगताप, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी विभागीय कृषी अधीक्षक  रविंद्र पाटील, कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनी बी. बी. इनकर, शेतकरी प्रतिनिधी सुधीर सुपनार तर  दुरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पीकविमा कंपनी विभागीय व्यवस्थापक शंकूतला शेट्टी आदि बैठकीला उपस्थित होते.

गुरुजी तुम्हीही? ३०० रुपयांसाठी लाच घेऊन लाज घालवली!

 

उस्मानाबाद – लाचखोरीची अनेक प्रकरणे घडतात मात्र ज्यांच्याकडून नैतिक मूल्यांची जडघडण करण्याची जबाबदारी असते असे गुरुजीच लाचखोरी करीत असतील तर विद्यार्थी अन् भावी पिढी कोण घडवणार?

खात्यात जमा झालेल्या वेतनाचे व अनुदानाचे ऑडिट करण्यासाठी जि.प. केंद्रीय शाळा मुलांची तेरखेडा ता. वाशी ,जि.उस्मानाबाद (वर्ग-3 ) चे मुख्याध्यापक भारत रामभाऊ भालेकर वय 58 वर्ष, जि. प. केंद्रीय शाळा, तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद येथील मुख्याध्यापकास बुधवार (दि.08) रोजी 300 रूपये ची लाच घेताना उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले

तक्रारदार ह्या मुख्याध्यापिका असून मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा झालेल्या वेतनाचे व अनुदानाचे ऑडिटर कडून लेखापरीक्षण करून देण्यासाठी वर नमूद आलोसे यांनी 300 रुपये लाचेची मागणी करून लागली स्वीकारण्याचे मान्य केले व स्वतः 300 रुपये लाच रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारताना उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले सदर कार्यवाही ही औरंगाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे अधिक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक विकास राठोड, पोलिस अंमलदार इफ्तेकार शेख, मधुकर जाधव, सचिन शेवाळे यांनी केली.

घोटाळेबाज अदानीमुळे एलआयसी व सर्वसामान्यांच्या ठेवींना संरक्षण द्यावे या मागणीसाठी काँग्रेसची निदर्शने

  

उस्मानाबाद दि.६ (प्रतिनिधी) –  सामान्य जनतेचा पैसा लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडिया अर्थात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या आस्थेने, आशेने व विश्वासाने ठेवलेला आहे. यातीलच गुंतवणूक आदाने उद्योग समूहात करण्यात आलेली आहे. तर अदानी उद्योग समूहाने मोठा घोटाळा केला असल्यामुळे एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियामधील ठेवीदारांच्या रकमेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाला संरक्षण द्यावे, या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियासमोर दि.६ फेब्रुवारी रोजी जोरदार आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली.

भारतीय जीवन विमा कंपनी व भारतीय स्टेट बँकेमध्ये सर्वसामान्यांच्या ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत. या पैशाची गुंतवणूक अदानीच्या उद्योग समूहात केली आहे. तर अदानीच्या विविध उद्योग समुहात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा केल्याची पोलखोल हिंडेनबर्ग या वित्तीय संस्थेने करुन जगासमोर आणला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात येण्याची शक्यता आहे या सामान्य लोकांच्या गुंतवणुकीला भारत सरकारने संरक्षण द्यावे व एलआयसी आणि सामान्य गुंतवणूकदारांना नुकसान पोहोचू नये याची काळजी घेण्यासाठी उचित कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी मोदी हटाव, देश बचाओ, एलआयसी बचाओ.. देश बचाओ, एसबीआय बचाओ.. देश बचाओ, अदिनीच्या उद्योग समूहाची चौकशी झालीच पाहिजे, अदानीला पाठीशी घालणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो अशा प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड धिरज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा बँकेचे संचालक महेबूब पटेल, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अभिजीत चव्हाण, महिला विभागाच्या प्रदेश महासचिव शीला उंबरे, जिल्हा उपाध्यक्षा ज्योती सपाटे, कळंब तालुकाध्यक्षा अंजली ढवळे, उमेश राजेनिंबाळकर, सिद्धार्थ बनसोडे, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, ॲड राज कुलकर्णी, भूषण देशमुख, ॲड जावेद काझी, ॲड दर्शन कोळगे सुरेंद्र पाटील अमोल कुतवळ, आश्रुबा माळी, सलमान शेख, अब्दुल लतीफ, अभिजीत देडे, राहुल लोखंडे, विश्वजीत शिंदे, बालाजी माने, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, अनंतराव घोगरे, अशोक बनसोडे मुनीर शेख, गणेश सापते, प्रणित डिकले, मेहराज शेख, सरफराज काझी, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, विश्वंभर मैंदाड, संजय गजधने, अमोल पाटील संजय कवडे, हसन शेख, अब्दुल लतीफ आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलीच्या वाढदिवसानिमित्त हजारे दांपत्यांकडून विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 

सलगरा,दि.४(प्रतिनिधी) 

मुलीच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक वायफळ खर्चाला फाटा देत हजारे दांपत्यांनी त्यांची मुलगी त्रिशा महादेव हजारे हिच्या पाहिल्या वाढदिवसानिमित्त दि.४ फेब्रुवारी रोजी सलगरा (दि.) जि.प. शाळेत शालेय साहित्याचे आणि खाऊचे वाटप केले. 

श्रीमंत असो वा गरीब वाढदिवसानिमित्त पाहुणे, मित्र मंडळी यांना बोलावून हॉल, मंडप, डेकोरेशन अवाढव्य खर्च करणे आदी परंपरा सध्या समाजात जोमात सुरू आहेत. या सर्व गोष्टींना फाटा देत सायली महादेव हजारे आणि महादेव यशवंत हजारे या दांपत्यांनी समाजासाठी आपण काही तरी देणं लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत सलगरा जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे आणि खाऊचे वाटप करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.