पालकमंत्री आणि भाजप आमदारांमध्ये सुप्तसंघर्ष?
उस्मानाबाद – जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि तुळजापूर चे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये सध्या सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा जोर धरत आहे. या संघर्षाची सुरुवात पालकमंत्री सावंत यांनी जिल्हा परिषद मधील कामांना स्थगिती देण्याची मागणी केल्याच्या पत्रानंतर सुरू झाली. जिल्हा परिषदेत भाजप आणि सावंत गट यांची सत्ता असताना त्याच काळातील कामांना स्थगितीची मागणी केल्याने उलट सुलट चर्चाना उधाण आले होते. त्यानंतर या सुप्त संघर्षाचा दुसरा टप्पा आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या बैठकीचा त्यात देखील पालकमंत्र्यांच्या मतदार संघात अधिकची कामे नेण्यात आल्याची देखील चर्चा होती. सुप्त संघर्षाचा तिसरा टप्पा नुकताच घडला असून तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याच्या नियोजन विभाग प्रधान सचिवांना पत्र लिहीत जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत निधी वाटपात असमतोल असल्याचे म्हटले आहे. या पत्रानंतर मात्र हा सुप्त संघर्ष थोडा पुढे गेला आहे. दोन्ही नेत्यांनी अद्याप याबद्द्ल जाहीर विधान केलेले नाही. मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील कोणत्याही कार्यक्रमात एकत्र देखील दिसलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात दोन्ही नेत्यात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील येत नाही. त्यामुळे हा सुप्त संघर्ष आहे की खुला विरोध आहे की सारं काही आलबेल आहे हे उभयतांनी जाहीर केल्यानंतर समजेल.
आज दि १४ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे निर्णय
मुंबई – आज दि १४ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले ते संक्षिप्त स्वरूपात खालीलप्रमाणे
* राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित केल्या जातील.
* धान शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. १ हजार कोटी निधीस मान्यता दिली असून त्याचा ५ लाख शेतकऱ्यांना लाभ होईल.
*महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता देण्यात आली. औषधी, वैद्यकीय उपकरणांची खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत होईल.
*पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती दिली जाईल. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
* पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख, जेजुरी तीर्थक्षेत्रासाठी १२७ कोटी २७ लाख तसेच सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींच्या विकास आराखड्यांचे सादरीकरण.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्यात येईल. यासंदर्भात अध्यादेश काढला जाणार आहे.
*राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदन केले. राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला.
आयान-बाणगंगा कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्याशिवाय हंगामाची सांगता होणार नाही
शेतकऱ्यांनी कारखाना बंद बाबतच्या अफवावर विश्वास ठेवू नये- चेअरमन राहूल मोटे
परांडा (भजनदास गुडे) मराठवाड्यातील अग्रगण्य ईडा-जवळा येथील परंडा, भूम,वाशी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्या-साठी आधारवड असलेल्या “आयान मल्टीट्रेड एल.एल.पी”संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखाना लि.ईडा-जवळा या कारखान्याचा चालु गाळप हंगाम २०२२-२०२३ हा यशस्वीरित्या सुरळीतपणे सुरु असुन प्रति दिन ४००० मे.टन ऊसाचे गाळप कारखाना करीत आहे.शिवाय कारखान्याकडे ऊसतोड-वहातुक यंत्रणा सुध्दा भरपूर प्रमाणात ऊपलब्ध आहे.तसेच आयान- बाणगंगा साखर कारखान्याने हंगाम २०२२-२०२३ मध्ये आजपर्यंत ३७४२९१.५९९ मे.टन ऊसाचे गाळप केलेले असुन कारखान्याची दैनंदिन व सरासरी रिकव्हरी सुध्दा उस्मानाबाद जिल्ह्यात २ नंबर वर आहे.त्या अनुषंगाने कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना हंगामाची सांगता होणार नाही. अशी माहिती बाणगंगा कारखान्याचे चेअरमन मा.आ.राहुल भैय्या मोटे व आयान चे संचालक सचिन सिनगारे यांनी दिली आहे.
आयान-बाणगंगा साखर कारखानाने गाळपास येणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रक्कम रु. २३५०/- प्रमाणे पहिला हप्ता दिला असुन त्यानुसार ऊस उत्पादक शेतकरी यांच्या खात्यावर ऊस बिले वेळेत जमा केलेली आहेत व करीत आहोत. तसेच तोड-वहातुक बिले सुध्दा वेळेवर दिली जात आहेत. आयान-बाणगंगा साखर कारखान्याकडे गेल्या चार वर्षापासुन असणाऱ्यां वजन काटयाबाबत वाहतुकदार व ऊस उत्पादक शेतकरी यांच्याकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असुन कारखान्याच्या काट्याबाबत वाहतुकदार व शेतकरी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका नाही. कारखान्याने गेल्या चार वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार व कर्मचारी तसेच इतर देणी वेळेत दिलेली आहेत.
याही वर्षी ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतुक ठेकेदार यांचे पेमेंटचे वेळेत वाटप चालु आहे.आयान-बाणगंगा साखर कारखान्याने गेल्या ५ वर्षात सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला आधार देण्याचे काम केले आहे.कारखान्याकडे ऊसाची नोंद केलेल्या सर्व शेतकऱ्याच्या ऊसाचे गाळप करण्यास कारखाना कटीबध्द आहे.तरी भागातील संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्यावरच गाळप हंगामाची सांगता होणार आहे.
तरी कारखाना बंद बाबत कुठल्याही अफवावर ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार यांनी विश्वास ठेवू नये व चालु गळीत हंगामासाठी चांगल्या रिकव्हरीच्या दृष्टीने चांगल्या प्रतीचा ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे,असे आवाहन बाणगंगा कारखान्याचे चेअरमन मा.आ.राहुल भैय्या मोटे व आयानचे संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे.
यावेळी बाणगंगा कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर संतोष तोंडले,मुख्यशेती अधिकारी विठ्ठल मोरे,चीफ इंजिनियर जेशकुमार शिंदे,चीफ अकौंटंट विशाल सरवदे,स्टोअर किपर नानासाहेब जाधव यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.







































































