१५ व्या वित्त आयोगाचा निधी न मिळाल्याने पाणीबाणी?
उस्मानाबाद – शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीबाणी सुरू असून आठ आठ दिवस पाणी मिळत नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला मात्र वीज पुरवठा खंडित होण्यामागे केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी न मिळणे हे कारण असल्याचे बोलले जात आहे. मार्च २०२२ पासून आजपर्यंत हा निधी अद्याप अप्राप्त आहे. जवळ पास १५ कोटीची ही रक्कम असल्याचे देखील बोलले जात असून येत्या कालावधीत हा निधी न मिळाल्यास पाणी पुरवठा खंडित होणार आहे. नगर पालिकेच्या न. प. फंडात संपूर्ण बिल भरले जाईल एवढा निधी नाही. कराच्या माध्यमातून जी वसुली होते तीच न. प. फंडात जमा होत असते. त्यामुळे वित्त आयोगाच्या निधीची पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी मदत होत असते.
साडे आठ कोटी बिल थकीत
उजनी येथून पाणी पुरवठा होणाऱ्या योजनेसाठी दरमहा ८० लाखांच्या आस पास देयक असते. सोलापूर जिल्ह्यातील दोन पंपिंग स्टेशन चे बिल ५ कोटी ६५ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यातील पंपिंग स्टेशन चे २ कोटी ५८ लाख रुपये बिल थकीत आहे.
तब्बल तेरा दिवसांपासून वीज पुरवठा खंडित
९ फेब्रुवारी रोजी पाणी पुरवठ्याच्या योजनेचा वीजपुरवठा खंडित झाला होता तो २२ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला मात्र केवळ १० लाख रुपये भरून हा वीज पुरवठा सुरू करण्यात आला असल्याने लवकरात लवकर बिल न भरल्यास पुन्हा वीज पुरवठा खंडित होणार असल्याचे बोलले जात आहे.
आलेले पाणी दूषित?
शहरातील जनतेत रोष वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने हातला देवी तलावातून पाणी पुरवठा सुरू केला मात्र शहरात होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात असून हातला देवी तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे का याची तपासणी करण्याचीही मागणी नागरिकांमधून होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची हत्या
मगरवाडी ( विठ्ठल जाधव )
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची दुपारी दरम्यान निर्गुणरित्या हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
एकाच घरातील तीन महिलांच्या खून सत्रामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेसह अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरात दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून
दिपाली बाळू माळी (वय-25), संगीता महादेव माळी (वय-50), पाराबाई बाबाजी माळी (वय-45) या तीन महिलांचा राहत्या घरासमोर हत्याराच्या सहायाने खून करण्यात आला. तिन्ही महिलाची प्रेते घरासमोर अत्यावस्थ पडली होती.
या घटनेने नंदेश्वरात खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षक रणजीत माने,एपीआय वाघमोडे,सपोनी आवटे,पोसई धापटे,पोसई शेट्टे तसेच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे सर्व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. हत्येच्या कारणामागील शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.
या तीन महिलाच्या खुनामुळे नंदेश्वर गावावर शोककळा पसरली असून, अचानक झालेल्या खून सत्रामुळे गावात भितीचे वातावरण पसरले.
त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत एका संशयितास ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तपासाअंती या खुणाचे कारण स्पष्ट होणार आहे
वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप
सलगरा,दि.२०(प्रतिक भोसले)
वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वत्र जेवणावळी घालण्याच्या प्रथा आपण बहुतांशी ठिकाणी पहातो. माञ त्या सोबतच वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून आगळी वेगळी श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. वडिलांच्या व्दितीय पुण्यतिथीनिमित्त जेवणावळी कार्यक्रमा बरोबरच शामराव (आण्णा) मुसळे, रामराव (बापु) मुसळे, आणि सचिन मुसळे या भावांनी आपल्या वडिलांच्या म्हणजेच कै.विजयकुमार (काका) शामराव मुसळे यांच्या व्दितीय पुण्यतिथीनिमित्त दि.२० फेब्रुवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. वडिलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरणारी आहे. मात्र अलिकडच्या काळात हे प्रसंगही मोठे इव्हेंट म्हणुन साजरे केले जातात. फ्लेक्सबाजी, जाहिराती, भोजनाच्या मोठमोठया पंगती मात्र या गोष्टी बाजूला सारत अवाजवी खर्च टाळुन सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्य वाटप आणि ह.भ.प. गोपाळ (आण्णा) वासकर महराज यांची किर्तनसेवा या माध्यमातून वडिलांच्या स्मृती वेगळ्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न तालुक्यातील गंधोरा येथील मुसळे परिवाराकडुन करण्यात आला आहे.
अशा प्रकारे शालेय साहित्याचे वाटप करून एक वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. या वेळी सरपंच बबिता राठोड, तंटामुक्त अध्यक्ष संतोष मुसळे, माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शामराव (आण्णा) मुसळे, पोलीस पाटील गजेंद्र कोनाळे, सुरेश मुसळे, रामराव (बापु) मुसळे, सचिन मुसळे, सुधीर पाटील, महेश पाटील, संभाजी मुसळे, अरुण पौळ, मोजम मुल्ला, लक्ष्मीकांत कुलकर्णी, मुख्याध्यापक जट्टे, श्रीमती करडे, श्रीमती भोसले, चव्हाण, प्रवीण पाटील, प्रवीण भोसले, बालाजी पाटील, महादेव भोसले, सुनील सोनटक्के यांच्या सह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
परंडा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
मराठा सेवासंघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने ३९३ दिप प्रज्वलीत
परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ जयंती उत्साहात साजरी ……
शिवजयंती निमीत्त वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धेती विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण.
परंडा ( भजनदास गुडे)मराठा सेवासंघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड व शिवप्रेमीच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी परंडा येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करून पुजन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील,पोलिस निरिक्षक अमोद भुजबळ,पोलीस उपनिरीक्षक कविता मुसळे,माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सIद्देवाल,माजी नगरध्यक्ष जाकीर सौदागर,आरपीआय चे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे, तुकाराम साळूंके,ॲड.नुरोद्दीन चौधरी,ॲड.देवकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.संदिप पाटील,मा.नगरशेवक सुबोधसिह ठाकूर,विकास कुलकर्णी, बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे,राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे,ॲड सुभाष वेताळ, नवनाथ जाताप,पंचायत समितीचे माजी उप सभापती मेघराज पाटील,माजी नगरअध्यक्ष शिवाजी मेहेर,उद्योजक हनुमंत पाटील,रणजित पाटील, आशोक वेताळ,रमेश परदेशी,अमर साळुंके,संतोष भांडवलकर, भारत घोगरे,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष वाजीद दखणी,शिवसेना शहर प्रमुख इरफान शेख,गोविंद जाधव,शिवाजीराव कदम,ॲड. घोगरे,नानासाहेब पवार,धनंजय सोनटक्के,पोलिस पाटील संजय कदम,जाधव सर,हनुमंत यादव सर,शफी पटेल सर,बाबूराव काळे सर,मतीन जिनेरी,दिपक थोरबोले,मकसुद पल्ला,गणेश चव्हाण,विशाल पवार,आप्पा बनसोडे, शरीफ तांबोळी, बाबासाहेब जाधव, आतूल गोफणे,नाना मांडवे, भाऊसाहेब खरसडे,हरिचंद्र मिस्कीन रवि दादा मोरे,कानिफनाथ सरपणे, आप्पा काशीद,बाळासाहेब पाटील,महेश ठोंगे,शाम मोरे, दिगंबर गुडे,तानाजी बनसोडे, गणेश कोकाटे,राजू सोनवणे, रत्नकांत शिंदे,पप्पू पठाण, सुधाकर कोकाटे, तुकाराम गायकवाड,पोपट गटकुळ, यांच्या सह शिवप्रेमी मोठया संखेने उपस्थित होते .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीच्या पुर्वं संधेला जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्षा आशाताई मोरजकर यांच्या मार्गदर्शना खाली ३९३ दिप प्रज्वलीत करून शिवजन्मोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.तसेच छत्रपती शिवाजी महाराज या नावावर ३९३ पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्याने छ्त्रपती शिवाजी महाराजाचे नाव दिव्यात उजळून निघाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने दोन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील विजेत्यांना तुकाराम महाराज यांची गाथा, ट्रॅपी,प्रमानपत्र व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले.
शिव जन्मोत्सव सोहळा व शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे तालूका अध्यक्ष गोरख मोरजकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे,संभाजी ब्रिगेडचे तालूकाध्यक्ष समाधान खुळे,अंगद धुमाळ,शशिकांत जाधव,देवानंद टकले,महेश शिंदे सर,शरद नवले सर,रविकापसे सर,दैवान पाटील सर,रविदादा मोरे,मलीक सय्यद, आनंत सुर्यवंशी,निशिकांत क्षिरसागर,राजकुमार देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती आशाताई मोरजकर,जि.प.च्या मा.महिला व बालकल्याण सभापती शिवमती पुष्पा मोरे,जिजाऊ ब्रिग्रेडच्या तालुकाध्यक्षा शिवमती प्रियका क्षीरसागर,शिवमती तेजस्विनी करळे,शिवमती मनिषा जगताप, शिवमती अपेक्षा पाटील,शिवमती राणीताई कोळगे,सारिका मोरे, ज्योती हजारे,निता जाधव, आश्विनी लोखंडे,जान्हवी कुलकर्णी,आकांक्षा देशमुख यांनी परिश्रम घेतले.
——————————————
पप्पू पठाण यांच्या वतीने शिवभक्तांना शरबतचे वाटप
परंडा येथील सामाजीक कार्यक्रत्ये पप्पू पठाण यांच्या वतीने शिवजयंती निमीत्त छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थीत शिवभक्ताना शरबतचे वाटप करण्यात आले.
——————————————
वक्तृत्व स्पर्धेतील गट क्र. १ विजेते स्पर्धक
प्रथम क्र.अक्षरा धनंजय गोरे, द्वितीय क्र. ईश्वरी दयानंद पाटील, तृतीय क्र.अपेक्षा प्रमोद बोबलट.
गट क्र.२ विजेते स्पर्धक प्रथम क्र.समर्था संतोष सुर्यवंशी, विद्वतीय क्र.सई सचिन पाटील, तृतीय क्र.सिमा विजय पाटील.
भक्तीशक्ती मॅरेथॉन स्पर्धेतील गट क्र.१ मधील विजेते स्पर्धक
पथम क्र.अतिश शामराव शिरगिरे,द्वितीस क्र.शुभम लक्ष्मण भांडवलकर,तृतीय क्र.अनंत धोडीराम विटकर.
गट क्र.२ मधील विजेते स्पर्धक
प्रथम क्र.सायराज नितीन गावडे, द्वितीय क्र.ज्ञानेश्वर बालाजी नाईकनवरे,तृतीय क्र.प्रथमेश चंद्रकांत कुदळे या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारीतोषीक देऊन सन्मानीत करण्यात आले.

































































