राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र ही शासन मान्यता प्राप्त संघटना नाही
शासनाच्या परिपत्रकाने उद्याच्या आंदोलनाची हवा काढली !
धाराशिव – जिल्ह्यात आणि राज्यात उद्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटना जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात देखील हे आंदोलन होणार आहे मात्र राज्य सरकारने परिपत्रक काढत या आंदोलनातील हवा काढून घेतली आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र ही शासन मान्यता प्राप्त संघटना नाही असे या परिपत्रकात म्हटले असल्याने आंदोलन होणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
काय आहे परिपत्रकात
ढगपिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गुंफाताई मासाळ यांची बिनविरोध निवड
परंडा ( प्रतिनिधी) परंडा तालूक्यातील ढगपिंपरी ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी गुंफाताई मासाळ यांची बिन विरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच निवडी साठी ढगपिपरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि १० मार्च रोजी विशेष सभा घेण्यात आली.
सरपंच पदासाठी सौ.गुंफा लहु मासाळ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता.निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी आबासाहेब सुरवसे यांनी गुंफा मासाळ यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी ग्रामसेवक श्रीराम खरात,ग्रा.पं सदस्य राजेंद्र परबत, चंपावती जाधव यांच्यासह मा.सरपंच डाॅ.नवनाथ वाघमोडे, मा.सरपंच बप्पाजी जाधव, भाजपा तालुका उपाध्यक्ष रवि गरड,शहाजी सोलंकर,वैजिनाथ आबा हिवरे,शहाजी गरड,सुरेश येवारे,नितीन गरड,लहु मासाळ, राजेंद्र कुलकर्णी,वि.का.सोसायटी चेअरमन रमेश गरड,बळीराम हिवरे,ज्ञानदेव वाघमोडे,बापू करळे,अभिमान बारसकर,पोलीस पाटील हरिदास हावळे उपस्थित होते.
ए.पी.आय.दीपक भांडवलकर यांनी गगनबावडा पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारला
कोल्हापूर,दि.१२ (अमोल कुरणे) गगनबावडा पोलीस स्टेशनचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी स्वीकारला असून, या पूर्वी रणजीत पाटील यांची ३० जानेवारी रोजी जयसिंगपूर येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. यादरम्यान गगनबावडा पोलीस स्टेशन चा कार्यभार कळे पोलिस ठाण्याचे ए.पी.आय. प्रमोद सुर्वे यांच्याकडे देण्यात आला होता.पी.एस.आय.म्हणून भांडवलकर नक्षलवादी एरिया गडचिरोली येथे काम करत असताना ते ज्या वाहनातून जात होते, त्या वाहनाला नक्षलवाद्यांनी भू-सुरुंगाच्या स्फोटाने उध्वस्त केले होते, यामध्ये ते गंभीर जखमी होऊनही प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूच्या खाईतून वाचले आहेत. त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक मिळाले आहे. गांधीनगर येथेही त्यांनी काम पाहिले होते. त्यानंतर त्यांची बदली एसपी ऑफिस नियंत्रण कक्ष, कोल्हापूर जिल्हा न्यायालय येथे झाली होती. त्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी , सिंघम म्हणून ओळखले जाते.
लाच घेताना सीपीआर मधील लिपिकास ए.सी.बी. ने घेतले ताब्यात
कोल्हापूर, दि.९ (अमोल कुरणे) नोकरीतील स्थायित्व प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या सी.पी.आर. रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आरोपी हुसेनबाशा कादरसाब शेख,वय ४७, वरिष्ठ लिपिक,जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सी.पी.आर. हॉस्पिटल कोल्हापूर वर्ग-3, सध्या राहणार बुरुड गल्ली, नागराज मंदिर जवळ शनिवार पेठ, कोल्हापूर., मूळ गाव.अ १९५ कर्णिकनगर, जिजामाता बागेजवळ, सोलापूर शहरयातील तक्रारदार या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सी.पी.आर.) येथे अधिपरिचारिका पदावर नोकरीस आहेत. त्यांना स्थापित प्रमाणपत्र हुसेनदाशा शेख याने तयार करून दिले. त्या बदल्यात शेख याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारत असताना त्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार ,पो.स.इ. संजीव बंबरगेकर, पो.हे.कॉ. विकास माने,पो.हे.कॉ. सुनिल घोसाळकर,पो.ना. सचिन पाटील,पो.काॅ. रुपेश माने,पो.काॅ.सूरज अपराध व अन्य सहकार्यांनी पकडले.
विद्यापीठ उपकेंद्रातील विश्रांतीगृहाच्या उद्घाटनाचा लपून छपून घाट?
धाराशिव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील विश्रांतीगृह आणि उपहारगृहाच्या उद्घाटनाचा लपून छपून घाट विद्यापीठ प्रशासनाने घातला आहे. आज दि ९ मार्च रोजी विद्यापीठ कुलगुरूंच्या हस्ते कोनशिला उद्घाटन करण्यात येणार असून याबाबत माध्यमांना तर दूरच ठेवण्यात आले त्यासोबत लोकप्रतिनिधींना याची साधी कल्पना देखील दिली नाही. विद्यापीठाच्या काही सिनेट सदस्यांना देखील कळविण्यात न आल्याने हा लपून छपून उद्घाटनाचा घाट नेमका कशासाठी घालण्यात आला असा प्रश्न पडतो आहे.
विद्यापीठ उपकेंद्र जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षणासाठी महत्वाची भूमिका पार पाडते तिथे येणाऱ्या अभ्यांगताना विश्रामगृह आहे हेच कळू नये विश्रामगृहात नेमक्या कोणत्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. आतील काम चांगल्या दर्जाचे आहे की नाही हे कळू नये असे विद्यापीठ प्रशासनाला वाटते का?
या उद्घाटनाच्या कार्यक्रमाबाबत विचारण्यासाठी संचालक डी. के. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा ऑफिशियल बैठकीनिमत्त कुलगुरू उपकेंद्रा येत आहेत त्या बैठकीनंतर कोनशिला उद्घाटन करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच याची कोणतीही कार्यक्रम पत्रिका छापली नाही असेही सांगितले.
मनमानी कारभार!
हुकूमशाही पद्धतीचा कारभार कुलगुरूंनी नेहमी केला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता, सिनेट सदस्यांना विश्वासात न घेता, व्यवस्थापनाच्या सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत असून माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा लहान भाऊ असल्यासारखे कुलगुरू वागत असल्याची प्रतिक्रिया माजी सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी दिली

















































