Home Blog Page 102

लाच घेताना सीपीआर मधील लिपिकास ए.सी.बी. ने घेतले ताब्यात

 

कोल्हापूर, दि.९ (अमोल कुरणे) नोकरीतील स्थायित्व प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या सी.पी.आर. रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आरोपी  हुसेनबाशा कादरसाब शेख,वय ४७, वरिष्ठ लिपिक,जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सी.पी.आर. हॉस्पिटल कोल्हापूर वर्ग-3, सध्या राहणार बुरुड गल्ली, नागराज मंदिर जवळ शनिवार पेठ, कोल्हापूर., मूळ गाव.अ १९५ कर्णिकनगर, जिजामाता बागेजवळ, सोलापूर शहरयातील तक्रारदार या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सी.पी.आर.) येथे अधिपरिचारिका पदावर नोकरीस आहेत. त्यांना स्थापित प्रमाणपत्र हुसेनदाशा शेख याने तयार करून दिले. त्या बदल्यात शेख याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारत असताना त्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार ,पो.स.इ. संजीव बंबरगेकर, पो.हे.कॉ. विकास माने,पो.हे.कॉ. सुनिल घोसाळकर,पो.ना. सचिन पाटील,पो.काॅ. रुपेश माने,पो.काॅ.सूरज अपराध व अन्य सहकार्यांनी पकडले.

विद्यापीठ उपकेंद्रातील विश्रांतीगृहाच्या उद्घाटनाचा लपून छपून घाट?




धाराशिव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील विश्रांतीगृह आणि उपहारगृहाच्या उद्घाटनाचा लपून छपून घाट विद्यापीठ प्रशासनाने घातला आहे. आज दि ९ मार्च रोजी विद्यापीठ कुलगुरूंच्या हस्ते कोनशिला उद्घाटन करण्यात येणार असून याबाबत माध्यमांना तर दूरच ठेवण्यात आले त्यासोबत लोकप्रतिनिधींना याची साधी कल्पना देखील दिली नाही.  विद्यापीठाच्या काही सिनेट सदस्यांना देखील कळविण्यात न आल्याने हा लपून छपून उद्घाटनाचा घाट नेमका कशासाठी घालण्यात आला असा प्रश्न पडतो आहे.

विद्यापीठ उपकेंद्र जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षणासाठी महत्वाची भूमिका पार पाडते तिथे येणाऱ्या अभ्यांगताना विश्रामगृह आहे हेच कळू नये विश्रामगृहात नेमक्या कोणत्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. आतील काम चांगल्या दर्जाचे आहे की नाही हे कळू नये असे विद्यापीठ प्रशासनाला वाटते का?

या उद्घाटनाच्या कार्यक्रमाबाबत विचारण्यासाठी संचालक डी. के. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा ऑफिशियल बैठकीनिमत्त कुलगुरू उपकेंद्रा येत आहेत त्या बैठकीनंतर कोनशिला उद्घाटन करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच याची कोणतीही कार्यक्रम पत्रिका छापली नाही असेही सांगितले.



मनमानी कारभार!

 हुकूमशाही पद्धतीचा कारभार कुलगुरूंनी नेहमी केला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता, सिनेट सदस्यांना विश्वासात न घेता, व्यवस्थापनाच्या सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत असून माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा लहान भाऊ असल्यासारखे कुलगुरू वागत असल्याची प्रतिक्रिया माजी सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी दिली

दैनिक जनमत ०९ मार्च २०२३ E paper

 

६७ लाखाच्या मुद्देमालासह दारु जप्त एक्साईज कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाची कारवाई

 

कोल्हापूर, दि. ४ (अमोल कुरणे) राज्य उत्पादन शुल्क एक्साइजचे कोल्हापूर जिल्हा अधीक्षक रविंद्र आवळे, उपअधीक्षक आर.एल. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने उचगाव, ता. करवीर हद्दीत हायवे क्र. ४ तावडे हॉटेल चौका मध्ये एका संशयित आयशर चालकास पकडून आयशर कंटेनर नं. एम.एच.०८ ए. पी. ५०८० ची तपासणी केली असता, आयशर कंटेनरमध्ये गोवा बनावटीची विदेशी मद्याने भरलेले १८० व ७५० मिलीचे ५०० बॉक्स आणि बीअरचे १२० बॉक्स असे एकूण ६२० बॉक्स मद्य मिळुन आले.

या प्रकरणी सुरेश रामजीवन बिश्नोई वय २४ रा. ढाणी धोरिमाना, जि. बारमेर, राजस्थान याला अटक करण्यात आली आहे.  ५२,०३,२०० चे मद्य व आयशर वाहनासह एकूण मुद्देमाल ६७,०३,२०० चा आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथक प्रमुख निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, दुय्यम निरीक्षक एस. एल. नलवडे, जवान सचिन काळेल, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, जय शिनगारे यांनी सहभाग घेतला.

व्वा रे निवडीची पद्धत, नेत्यांच्या सुपुत्रांना आणि सामान्यांना वेगळा न्याय?

धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप का केला जातो याचा प्रत्यय जिल्ह्यातील एका सभेत नुकताच आला, निमित्त होते शरद युवा संवाद यात्रेचे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख या संवाद यात्रेनिमित्त जिल्ह्यात आले होते. गेले अनेक महिने युवक काँग्रेसचे पद रिक्त आहे. अनेकांनी जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा देखील व्यक्त केली. त्यानंतर मेहबूब शेख यांनी भाषण संपताना काही इच्छुकांची नावे घेत त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींना हात वरती करून कोणी किती माणसे आणली याची खातरजमा केली. मग यापूर्वी जे जिल्हाध्यक्ष किंवा पदाधिकारी  नेमले गेले त्यांची निवड करण्यापूर्वी अशीच पद्धत वापरली गेली होती का? की राष्ट्रवादीत फक्त सामान्य कार्यकर्त्यांना अग्निपरीक्षेला समोर जावे लागते. ज्यांची पोहोच, वशिला मोठा आहे त्यांना ताबडतोब पदे दिली जातात का हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत. जिल्ह्यातील बडा नेता पक्ष सोडून गेल्यानंतर सुरू झालेली गळती अद्याप का थांबली नाही? प्रमुख पदावर आमचाच माणूस असायला हवा असा हट्ट कोण धरत आहे? गेल्या काही काळात पक्ष सोडून गेलेले पदाधिकारी कोणाच्या कार्यपद्धतीला सोडून गेले? यावर मंथन होणार की सामान्य कार्यकर्त्यांना वेट अँड वॉच वर ठेवले जाणार हा येणारा काळच सांगणार आहे.