घरफोडीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; २.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
277

धाराशिव – कळंब शहरातील घरफोडी प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत गजाआड करत मोठी कामगिरी बजावली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २,२४,२९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि.) सुदर्शन कासार यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान पोस्ट कळंब हद्दीत गुप्त बातमीवरून आरोपीचा शोध सुरू केला. गुप्त माहितीप्रमाणे, संशयित आरोपी दिगंबर संदिपान काळे (वय २५, रा. आंदोरा, ता. कळंब, जि. धाराशिव) याने कळंब परिसरात घरफोडी करून चोरी केलेला मुद्देमाल आपल्या घराजवळील शेतात लपवून ठेवला होता.

पोलिसांनी तत्काळ आरोपीस ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून प्राथमिक चौकशी केली असता त्याने कळंब येथील निखिल एंटरप्राइजेस या दुकानात घरफोडी केल्याची कबुली दिली. याबाबत पोस्टे कळंब येथे आधीच गुन्हा क्रमांक २८०/२५ अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंद असल्याची पुष्टी झाली.

यानंतर पोलिसांनी पंचनामा करून नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल —

  • २,२४,२९८ रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य
  • २,००० मीटर अॅल्युमिनियम तार

असा एकूण २.२४ लाख रुपयांचा माल जप्त केला. चौकशीत आरोपीने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचेही मान्य केले.

पोलिसांनी आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे कळंब येथे हजर केले असून त्याच्या साथीदाराच्या शोधासाठी पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई  अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोह. शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण, चापोका रत्नदीप डोंगरे, व चापोका बाबासाहेब गुरव यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here