तासगाव (प्रतिनिधी)
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तासगाव नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दर्यावरती किसान व्यायाम मंडळचे कार्यवाह स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीचे माजी व्हॉइस चेअरमन गुलाबराव काका पाटील यांचे शुक्रवार दिनांक 24 रोजी सकाळी अकरा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले निधनाची बातमी समजतात काकांचे राहते घरी त्यांच्यावर प्रेम करणारी तासगाव शहरातील नागरिक तासगाव नगरपालिकेचे आजी माजी नगराध्यक्ष आजी माजी नगरसेवक सूतगिरणीचे संचालक मार्केट कमिटीचे संचालक खरेदी विक्री संघाचे संचालक यांनी गुलाबराव काका पाटील यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले वरचे गल्ली तसेच तासगाव शहरावर काकांची निधनाची बातमी समजतात दुःखाचा डोंगर कोसळला कै गुलाबराव काका पाटील यांचे ८६ वर्षे वय होते तर काँग्रेस पक्षाचेवतीने काँग्रेस भवन समोर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील यांनीही काकांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, माती सावरण्याचा कार्यक्रम सोमवार २७ रोजी ठीक ९.३० वाजता अमरधाम स्मशानभूमी तासगाव येथे आहे.