विध्याभवन हायस्कुल येथे 42 वा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

0
66
लोहारा/प्रतिनिधी
कळंब येथील विध्याभवन हायस्कुल येथे 42 वा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या जिल्हास्तरीय प्रदर्शनात लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जि.प.शाळेचे शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी यांच्या शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक गटातुन कृतिशील संवंयअध्ययन साहित्यास प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शिक्षक आ.विक्रम काळे होते.यावेळी ओदुंबर उकीरडे शिक्षणाधिकारी माध्यमिक,नलावडे उपशिक्षणाधिकारी,जोशी  उपशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी यांना हा पुरस्कार देण्यात आला.42व्या राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांच्या  साहित्याची निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे गटशिक्षणाधीकारी कमलाकर धुरगुडे(लोहारा),विस्तार अधिकारी बी.के.यरमुनवाड,केंद्र प्रमुख आर.एन.गरड,मुख्याध्यापक एम.आर.गवळी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here