उस्मानाबाद – निवडणुका म्हटल्या की पक्ष बदला बदली, बंडखोरांचे बंड या साऱ्या घटना आल्या. परंतु तुळजापूर मतदारसंघात सध्या वेगळे चित्र आहे.आचारसंहितेपूर्वी रोहन देशमुख, देवानंद रोचकरी अश्या तगड्या लोकांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती.मात्र भाजपने माजी मंत्री राणाजगजिसिंह पाटील यांना उमेदवारी दिली.या उमेदवारी नंतर भाजपमध्ये बंडखोरी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र देवानंद रोचकरी यांनी राणाजगजिसिंह पाटील यांना पाठिंबा दिला तसेच रोहन देशमुख यांनीही मेळावा घेऊन भाजप एकत्रित असल्याचे दाखवून दिले. १० ऑक्टोबर ला झालेल्या गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत दीपक आलुरे आणि गणेश सोनटक्के यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. दोघांचीही तुळजापूर तालुक्यात ताकद आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो. शिवसेनेचे कार्यकर्ते काही काळ प्रचारापासून अलिप्त होते मात्र त्यांनीही युती धर्म पळूनी कामाला सुरुवात केली. या पूर्वीच्या निवडणुकीत अा. चव्हाण यांच्यासमोर अनेक उमेदवारांचे आव्हान असायचे त्याच्यांत मतविभाजन होऊन निवडणूक जिंकणे त्यांना सहज सोप्प असायचं. यापूर्वी विभाजनाचा फायदा हाताला होत होता. मात्र शमलेली बंडखोरी मतदारसंघातील वजन असलेले नेते यांचा भाजप प्रवेश यातून भाजपने आखलेले बेरजेचे राजकारण येत्या २१ तारखेला काय किमया दाखवते ते पाहावे लागेल.
कार्यकर्ते झाले चार्ज
गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेपूर्वी लढत कशी होईल याबाबत भाजपच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या मध्ये साशंकता होती मात्र सभेमध्ये शहा यांनी तुळजापूरला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवण्याचे दिलेले आश्वासन तसेच २१ टी एम सी पाणी आदी स्थानिक मुद्द्यानाही प्राधान्य दिले यामुळे युतीचे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत