परंडा :- परंडा मतदारसंघातील राजकीय वातावरण ऑक्टोबर हिट पेक्षाही जास्त तापू लागले असून प्रमुख पक्षाचे उमेदवार आपापली राजकिय ताकद वापरून आपल्या प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा घेत आहेत परंडा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सूर्यकांत उर्फ सुरेश कांबळे यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो बाळासाहेब (प्रकाश )आंबेडकर हे भूम येथे बुधवारी सभा घेणार असून त्यासाठीचे भव्य नियोजन भूम येथे सुरू आहे सध्या परंडा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असून आंबेडकर यांची जाहीर सभा झाल्यानंतर मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहे
सद्या परंडा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून वंचित बहुजन आघाडीचे सुरेश कांबळे यांनी तिन्ही तालुक्यातील वाड्या ,वस्त्यांवर जाऊन भेट देऊन संपर्क वाढवला आहे तर युती व आघाडीवर नाराज वंचित कडे आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे