बंजारा क्रांती दलाने वंचित बहुजन आघाडीला झिडकारून भाजपाला दिले जाहीर समर्थन

0
53
तुळजापूर, दि. १५- समाजाच्या मुलभूत प्रश्नावर कोणतीही ठाम भूमिका घेण्यास कुचराई करणार्‍या बहुजन वंचित आघाडीला नाकारून भारतीय बंजारा क्रांतीदलाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि तालुका पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बंजारा क्रांती दलाने भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठींबा घोषित केला आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विजयासाठी आपण कटीबध्द असल्याचे बंजारा क्रांती दलाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. 
भारतीय बहुजन बंजारा क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष पिंटूभाऊ राठोड, जिल्हाध्यक्ष भिमराव राठोड व युवा जिल्हाध्यक्ष लिंबाजी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बंजारा समाजाच्या अडचणी, गोरगरीबांना न्याय आणि त्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना जाहीर पाठींबा देण्याचे एकमताने ठरविण्यात आले. आजवर विविध पक्षांनी बंजारा समाजाचे समर्थन घेण्यापुरते त्यांना वापरून घेतले. मात्र त्यानंतर समाजाच्या हिताकडे आणि मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत समाजाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या अनुमतीने राणाजगजितसिंह पाटील यांना जाहीर पाठींबा देत असल्याचे भारतीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष पिंटू राठोड यांनी जाहीर केले आहे. 
या

वेळी भाजपचे विजय दंडनाईक, गणेश सोनटक्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी नाईकवाडी, जिल्हा परिषद सदस्य सौ.उषा यरकळ, टिकले गुरुजी, अड. रमेश भोसले, सुरजित राऊत – माजी प.स. सदस्य, पोपट राऊत ग्राम समिती सदस्य, विजय फंड, रमेश शिंदे, वाणे वाडीचे माजी सरपंच गोपाळ कदम, उपसरपंच प्रमोद उंबरे, सुधाकर अबदारे, इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here