विशेष लेख
आज जागतिकिकरणात …केवळ शहरातीलच नव्हे तर गावखेड्यातलीही माणसं बदलत गेली …पैशाच्या पाठीमागे धाऊ लागली .त्यातूनच विभक्त कुटूंब पध्दतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.घराघरातलं शहानपण संपलं.बदलत्या काळात विकास नावाच्या शब्दानं सगळ्यांच्या मनावर गारूड घातलं. खेड्यातली माणसं… मुंबई,पुण्यासारख्या शहरात पैसे कमवण्यासाठी जाऊ लागले.शहरात परप्रांतीयांची संख्याही बेसुमार वाढू लागली.शहरांना सुज यायला लागली.नैसर्गीक झाडांच्या कत्तली बेसुमार केल्या.शहरालगतच्या जंगलांचं वाळवंट केलं आणि सिमेंटकाँक्रिटची जंगलं उभारली आणि फ्लॅटबंद संस्कृती बळावली…!नातीगोती संपत चालली .माणसं एकमेकापासून तुटत चालली.”वृध्दाश्रमांची संख्या कमी होण्याऐवजी वाढू लागली!”स्वत:ने राञंदिवस कष्ट करतांना रक्त ओकत, कमावलेल्या स्वत:च्याच घरात. मायबाप पोरके झाले.गाव खेड्यांची सुधारणा व विकास व्हावा का? तर नक्किच व्हावा. यात शंका नाही.परंतु आज खेडेगावातील वास्तव चिञण पाहीलं तर आज तेथे विकास होतांना दिसत आसला तरी वास्तव वेगळेच आहे परंतु माणुसकीचा ओलावा माञ आटत चाललेला दिसतो आहे.माझं,तुझं करण्यात सख्या भावातच स्पर्धा वाढू लागली आहे.त्यातूनच शेतीच्या भांडणाच्या तक्रारी वाढत आहेत घराघरातून गाव नेता तयार होतो आहे गावातलं राजकारणाचं स्वरूप ही आता बदलत गेलय.ग्रामपंचायतीच्या निवडणूकात कमालीच्या उलाढाली होत आहेत.वारेमाप पैशांचा वापर केला जात आहे.आपलं पॅनल निवडून आलच पाहिजे. यासाठी आकांत केला जातो आहे.पारापारावर बेकारांच्या फोजा, दिल्लीतल्या राजकारणाच्या गप्पात रंगताहेत.मोबाईलवर सगळे व्यस्त झालेत.कांहीही करा आणि झटपट पैसा मिळवा हे सूञ आता जगण्याचं अनेकांनी साधनच बनवलं आहे.झटपट पैसा मिळावा.तो ही कष्ट न करता आणि कमी वेळात … मग थोडाफार वेळ शेतात आणि बाकीचा वेळ राजकारणात,इतर उचापतीत. गावखेड्यात मजुरांचा प्रश्न,जनावरांच्या चा—या,पाण्यांचा प्रश्न गंभीर आहे.खरं तर या बदलात खेड्यातील अर्थव्यवस्थाच विस्कळीत झाली आहे.त्यात निसर्गाचे बदललेले स्वरूप. अवेळी पडणारा पाऊस…”पाण्याचा दुष्काळ…!शेतीचा वनवास!” यामुळे आता अनेकांनी बैल,गुरं,ढोरं समदं विकलं आणि कृषी जीवन सगळं यंञावर आणून ठेवलं…!शेत पेरण्यापुरतं जमलच तर निंदण्यापुरतं आणि काढणीपुरतंच. कांहीनी धोरणच ठरवलंय.शेतातली सकाळची न्याहारी संपली आणि काळ्या आईकडे पाठ फीरवली ज्यांनी आजही शेतात सकाळी न्याहारी ठेवली…त्यांची माञ प्रगती दिसते आहे पण ही संख्या नगन्य झाली आहे.
या सा—यांचा परिपाक म्हणजे पैसे तर कमवलेच पाहिजे. या भुमिकेतून गावखेड्यात दारूंचा महापूर येतो आहे मका बेफाम चालतो आहे.पुरूष,महिला,शाळकरी पोरं मटका लावताहेत नशिब फळफळेल म्हणून मटक्यांच्या आकड्यांचा अभ्यास केला जात आहे.त्यातूनच व्यसनाधीनता,आळशीपणा,नैराश्याचे ढग जमत आहेत आणि त्यातून अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.गावागावात मटका पोहचला …मटका चालवणारा ,अवैद्दरित्या दारू विकणारा हे गावात बंगले बांधताहेत. शेती विकत घेत आहेत .लोकांना व्याजाने पैसे देत आहेत .गावात रूबाबदारीने वावरत आहेत. गावपुढा—यांशी संगनमताने वागत आहेत. पोलीसाबरोबर सलोख्याच्या संबंधाने बिंधास्तपणे ,राजरोसपणे मैञीणे वावरत आहेत.धाब्यावर त्यांना जेऊ घालत आहेत.दारू पिणारे ,मटका लावणारे शेती विकत आहेत,मजुरी बुडवत आहेत. शेताकडे दुर्लक्ष् करत आहेत.आणि घर,शेत गहान ठेवत…कर्जाचा डोंगर घेऊन नैराश्याचं ढघ माथ्यावर घेऊन जगत आहे आणि परिणाम कृषीनिष्ठा संपवल्या जात आहेत.
गावखेड्यातील दारूबंदी,मटकाबंदी करणं हे त्या, त्या परिसरातील पोलीसांचं कर्तव्यच आहे.आज एम.ए.एम.एड.एम.फील,पिएच डी शिक्षण घेऊन अनेक युवक नोकरी मिळत नसल्याने नाराजीतुन नैराश्य घेऊन वावरत आहेत .आज पोलीसांना दर महिना पगार असुन भले तो कमी असेल पण मर्यादित गरजा ठेवल्या तर पुरणारा आहे.पण आज गरजांचं स्वरूप बदलल्याने त्यांचा दारूवाले,मटकावाले यांच्याकडे कानाडोळा जाणीवपूर्वक होतो आणि त्यातूनच हे अवैद्द धंदे बळावतात.हे सगळ्या यंञणेला माहित असते.वरिष्ठांना माहित असतं पण सगळं निवांतपणे चाललेलं आसतं. पोलीस व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात नेञरोग बळावत चालला आहे….
उस्मानाबाद तालुक्यातील, कोंड गावातील . दारुबंदीचा प्रश्न? प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे.कोंडसारखी परिस्थिती अनेक गावात आहे.कोंड गावातील दारूबंदीच्या तक्रारी गेल्या दोन वर्षापासून मी पेपरातून वाचतो आहे.तेथे दारूचे अड्डे जे चालवतात ते थेट राहात्या घरातून …त्याचा ञास शेजारी राहाणा—या ग्रामस्थांना,विद्यार्थ्यांना होतो.दारु पिणा—यांच्या घरच्यांना होतो.गावातील दारुबंद झाली पाहिजे , म्हणून तेथील ग्रामस्थ ढोकी पोलीसांना तक्रार देताहेत.वारंवार गा—हानं मांडतात मग हे पोलीस काय करतात? हे गप्प का?खरं तर आज संसार उध्दवस्त करणा—या या धंदा करणा—या विरूध्द कोणी बोलत नाहित.पण हे ग्रामस्थ सातत्याने गावातील दारुबंदीसाठी आक्रोश करताहेत म्हणल्यावर पोलीसांनी वेळीच कार्यवाही करणे आवश्यक होते असे आमच्या सारख्या संवेदनशील असणा—या विचारवंताना वाटते.पोलीस या संदर्भात कार्यवाही करत नाहित हे लक्षात आल्यावर या ग्रामस्थांनी आपले लोकप्रतिनिधी मा.आमदार कैलास पाटील व उस्मानाबाद मतदार संघाचे खासदार मा.ओमराजे निंबाळकर यांच्याकडे जाऊन त्यांनी तक्रारीचा पाढा वाचला …आणि सहाजिकच आहे.आपल्या ग्रामस्थांची मागणी चांगली आसल्याणे या तरूण आमदार व खासदार यांनी कोंड गावातील दारूबंदीवर आज दि.२९फेब्रुवारी रोजी ,ढोकी पोलीस स्टेशनमध्येच ग्रामस्थ व पोलीसांची बैठक घेतली …!आणि त्या बैठकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले.! पोलीसांनी दारूविक्री करणा—यांना झुकते माप दिले आहे हे लक्षात आल्यावर मा.आमदार कैलासजी पाटील व मा.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बैठकीत पोलीस व त्यांच्या वरिष्ठांना धारेवर धरले.आपला आक्रोश मांडला…!ग्रामस्थांनी कैफियत मांडली. त्याचे व्हिडीवो पाहिले .फोटो पाहिले.यात आज ढोकी पोलिसांचा नाकर्तेपणा दिसला …आपण ज्यासाठी पगार घेतो त्यासाठी जर काम करत नसु तर आपणास मान,शान कसा मिळेल?आपले नाव कसे होईल?ज्याच्यावर अन्याय,अत्याचार होतो त्याची बाजु घेण्याऐवजी केवळ पैसा मिळतो म्हणून आपण पैसेवाल्यांची बाजु घ्यायची? हे आता तरी तेथील आमच्या पोलीस मिञांनी ठरवावे!आमदार,खासदार आपल्या दारात येऊन आपणास खडसावतात …हे आपल्यासाठी योग्य नाही.खरं तर या आमदार ,खासदार साहेबांनी आज एक चांगलेच काम केले आहे.हल्ली राजकारणी आणि अधिकारी संगनमतानेच करतात व राजकारण्याचे पोलीसांना अभय असते असे बोलले जाते परंतु या घटनेवरून या लोकप्रतिनिधींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या प्रश्नावर पोलीसावर हे लोकप्रतिनिधी खुपच संतापलेले दिसले.ग्रामस्थांच्या मागणीमुळे या लोकप्रतिनिधींनी ही आजची
ढोकी येथील पोलीस ठाण्यात बैठक बोलावली होती.
यावेळी बैठकीत कोंडच्या दारुबंदीबाबत कोंड येथील ग्रामपंचायत सदस्य सिकंदर मुलाणी यांनी गावात सात ठिकाणी अवैद्य दारुचे दुकाने आसल्याचे सांगीतले.तेंव्हा पोलीसांच्या कामगिरीचा पंचनामाच होत होता.कांही ग्रामस्थ सांगत होते तक्रार केल्यावर गावात पोलीस येतांनाच दारूवाल्याला सांगुन ठेवतात त्यामुळे पोलीसांना धाडीत कांहीच सापडत नाही.आशा तक्रारी ग्रामस्थ करताहेत तेंव्हा या प्रश्नावर तरूण आमदार मा. कैलासदादा पाटील कडाडले…!त्यांनी आपला संताप व्यक्त करत पोलीसांना चांगलेच धारेवर धरलेले दिसते.होते त्यांनी पोलीसांना चांगलेच धारेवर धरले. बैठकीत कोंडच्या दारुबंदीबाबत कोंड येथील ग्रामपंचायत सदस्य सिकंदर मुलाणी,तटामुक्त समीतीचे अध्यक्ष महादेव काजळे ,माजी सरपंच हारीभाऊ जाधव ,बाळू गिरी ,दादा खोत यांनी कोंड गावात होत असलेला अवैद्य दारुबंदीचा विषय लावून धरला.आमदार कैलास दादा पाटील यांनी कोंडचा दारुबंदीचा विषय प्रोसेडिंग ठरावात घ्यायला लावून पोलीसांना पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे.
जर कोंडची दारुबंदी नाही झाली तर संबंधीत अधीका—यांची तक्रार,वरिष्ठांकडे करणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील व खासदार मा. ओमराजे निंबाळकर यांनी ही माहिती बैठकीतच दिली.
खरं तर या बैठकीत पोलीसांचा नाकर्तेपणा दिसतोच आहे.आता पुढच्या पंधरा दिवसाची वाट पाहाण्या ऐवजी आपण आपल्या कायद्याचा धाक दाखवायची वेळ आली आहे असे दिसते.
पोलीस किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी ही सुध्दा माणसंच आहेत त्यांच्यात कांही लालची असतीलही …सगळेच पोलीस क्रप्ट नाहित .माणुस चुकीचा पुतळा आहे म्हण आहे.पण भूतकाळात झालेल्या चुका वर्तमानात सुधारता येतात…व भविष्यकाळाचा वेध घेऊन जर आपण काम केले तर चुका सुधारता येतात.
या प्रश्नावर कोण हरले?कोण जिंकले हे महत्वाचे नाही.कायदा सुव्यवस्था राखणे यासाठी अवैद्द धंद्याला आळा घालून दारूबंदी होणे गरजेचे आहे.काळ सोखावता कामा नये!
दारूबंदी करण्यासाठी ग्रामस्थांना शुभेच्छा…!
पोलीस अधिकारी यांनीही कायदा कोणाला अभय देत नाही हे दाखवून देण्यासाठीच्या कार्यवाहीला शुभेच्छा…!
मा.आमदार कैलासजी पाटील व मा.खासदार ओमराजे निंबाळकरजी आणि पञकार हुकमतजी मुलाणी आपणासही धन्यवाद.
प्रा.राजा जगताप
उस्मानाबाद
मो.नं.९८८११८८२६३