उस्मानाबाद जिल्हा लोककलावंतांची खाण – ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप भोसले यांचे प्रतिपादन

0
43
– पहिल्याच एकांकीका महोत्सवास तुडुंब प्रतिसाद 

– महोत्सवाचे जल्लोषात उदघाटन 
 उस्मानाबाद, ता. १:  तुळजापूरच्या आराध्यांचा गोंधळ साता समुद्रापार पोहोचला असून उस्मानाबाद जिल्हा ही लोककलावंतांची खाण आहे. विद्यापीठ उपपरिसरात सुरु झालेला नाट्यशास्त्र विभाग स्थानिक कलावंतांच्या बळावर नावलौकिक मिळवेल, असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी तथा चित्रपट निर्माते दिलीप भोसले यांनी व्यक्त केला.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसरात शनिवारपासून  दोन दिवशीय एकांकिका महोत्सवास सुरुवात झाली .  ज्येष्ठ रंगकर्मी तथा चित्रपट निर्माते दिलीप भोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले  महोत्सवात नामांकीत एकांकिका सादर होणार आहेत.

 उपपरिसरात नाट्यशास्त्र विभाग सुरु झाला असून यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच एकांकिका महोत्सव होत आहे. आहे. त्यामुळे नवोदीत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्याचा एक भाग म्हणून एकांकिका महोत्सव रंगणार आहे.  उदगाटनप्रसंगी  व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. जयसिंगराव देशमुख, अधिसभा सदस्य प्रा संभाजी भोसले, डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. संजय देवळाणकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे , राजेंद्र गायकवाड, शोभा गायकवाड, प्रकाश हुंडेकरी, प्रभारी संचालक डॉ. प्रशांत दिक्षित, विभागप्रमुख  डॉ. मिलींद माने यांचीही यावेळी उपस्थिती होती. बोलीभाषेचा मुनगंड न बाळगता युवकांनी पुढे यावे, असेही दिलीप भोसले म्हणाले. तर शंतनू गंगणे, डॉ काकासाहेब शिंदे, डॉ सतीश कदम यांच्यासह अनेक कलावंत, अभ्यासकांनी उस्मानाबादचे नाव राज्यस्तरावर नेले आहे, असे प्रा संभाजी भोसले म्हणाले.   पहिल्या दिवशी  लक्ष्मीकांत दोडके लिखित ‘ट्रॅक‘ तसेच ‘लाली‘ ही दुसरी एकांकिका ही एकांकिका सादर झाली.  दुसऱ्या दिवशी विजय तेंडुलकर लिखीत आदिनाथ शेरकर यांनी दिगदर्शीत केलेली ‘सन्मानपत्र’ तसेच  ‘थट्टामांडली‘ हीव ‘त्याची कहाणी‘ (एकपात्री) सादर होणार आहे. प्रा संतोष गालफाडे यांनी सूत्रसंचालन तर प्रा तन्मय शेटगार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ सुयोग अमृतराव, डॉ विक्रम शिंदे, डॉ गहिनीनाथ वळेकर, डॉ शिवाजी जेठीथोर यांनी सहकार्य केले. 


उस्मानाबाद उपपरिसरात ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप भोसले यांच्या हस्ते एकांकिका महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले  

यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. जयसिंगराव देशमुख, अधिसभा सदस्य प्रा संभाजी भोसले, डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. संजय देवळाणकर,डॉ. प्रशांत दिक्षित, डॉ. मिलींद माने   राजेंद्र गायकवाड, शोभा गायकवाड, प्रकाश हुंडेकरी आदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here