उस्मानाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पूर्व सूचना न देता उस्मानाबाद आगाराने बस सेवा बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
एस टी बस सेवा ही अत्यावश्यक सेवे पैकी एक आहे. ही सेवा अचानक बंद केल्याने महत्वाच्या कामानिमित्त उस्मानाबाद शहरात आलेल्यांचे मोठे हाल झाले. उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी २० मार्च रोजी जिल्हा बंद चे आदेश दिले होते त्यात बस सेवा बंद करण्याचे आदेश दिले नव्हते तरी देखील बस सेवा बंद करण्यात आल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उस्मानाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने तसेच मुंबई पुणे या ठिकाणाहून काही नागरिक गावाकडे येत आहे त्यांना गावी जाण्यासाठी एकमेव बस सेवेचा आधार आहे.
याबाबत परिवहन विभागाचे अधिकारी शिंदे यांना विचारले असता, याबाबत परिवहन विभागाकडून कुठले आदेश आले नाहीत मात्र गर्दी कमी असल्याने आम्ही गाड्या रद्द केल्या आहेत. प्रवासी आल्यास त्यांच्यासाठी बस सोडण्यात येईल, तसेच उद्या दि २३ रोजी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याचे सांगितले.