उस्मानाबाद जिल्ह्यातील महिलेचा सोलापुरात कोरोनाने मृत्यू

0
51

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिलेचा सोलापूर येथे कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मयत झालोली महिला 65 वर्षाची असून तीचे मुळगांव सुलतानपूर , जि . उस्मानाबाद येथोल असून नई जिंदगी येथे नातेवाईकांकड़े 18 मार्च रोजी आली होती . लॉकडाऊनमुळे ती येथेच नातेवाईकांकडे राहत होती . दि . 12मे  रोजी दुपारी 12.15 वा . सिव्हील हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते . उपचारा दरम्यान दि . १२ मे  रोजी सायं 05.15 वा निधन झाले . त्या महिलेचे कोव्हीड -19 अहवाल प्राप्त झाला असून तो पाॅझिटिव्ह असल्याची माहिती सोलापूर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्याचा कोरोना बाधीतांचा आकडा २२ ने वाढू ३३० वर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here