उस्मानाबाद – कळंब तालुक्यातील तिघांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 22 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 21 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 1 व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 3 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड येथील 15 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल(Inconclusive) आला असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. उस्मानाबाद येथील 18 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कळंब येथील 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. असे एकुण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 51 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.