परंडा प्रतिनिधी-
परंडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर सुरू असून शुक्रवारी( दि 15 ) दुपारी 3 च्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काढणीस आलेली पिके ,फळबागा आदींचे मोठे नुकसान झाले आहे
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील
लॉकडाऊन,जिल्हाबंदी,बंद असलेले लिलाव ,कोणत्याच शेतमाला नसलेले बाजारभाव यातच काय भर कमी होती ते मेघगर्जनेसह होत असलेला वादळी पाऊस याच वादळी पावसात वाऱ्यामुळे कपिलापुरी ,आवार पिंपरी सह परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झले आहे कपिलापुरी येथील महादेव पाटील यांची उत्पादन देणारी लिंबोनी बाग भुईसपाट झाली आहे.२ एकर क्षेत्रावर असलेल्या लिंबोनी बागेतील उत्पादन देणारी तब्बल २५ झाडे जमीन दोस्त झाली आहेत.६ वर्षांपासून आलेली ही बाग सुसाट सुटणाऱ्या वादळी वाऱ्या पुढे तग धरू शकली नाही परिणामी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे