कोरोनाच्या महामारीस घाबरुन न जाता दक्ष राहुन प्रतिकार शक्ती वाढवा आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन

0
52


उस्मानाबाद –
१४ मे रोजी कळंब तालुक्यामध्ये ३ कोरोनाबाधीत रुग्ण सापडले आहेत, या अनुषंगाने आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सकाळी कळंब येथे भेट देऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच स्थानिक नेते, कार्यकर्ते व नागरिकांबरोबर चर्चा केली.
यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परीषद अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, कळंबचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व इतर अधिकारी उपस्थीत होते.
कळंब तालुक्यातील मौजे पाथर्डी येथील दाम्पत्य यांना कोरोनाची बाधा मुंबईत झाली असावी असा प्राथमीक अंदाज जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या बरोबर झालेल्या चर्चेतून व्यक्त करण्यात आला आहे. परंतु कळंब शहरातील रुग्णाला कोणाच्या संपर्कातून प्रादुर्भाव झाला आहे,
हे समजत नसल्याने अत्यंत दक्ष राहण्याची गरज आहे असे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, कळंब शहराप्रमाणे जिल्ह्यातील इतर भागात मुंबई- पुण्यावरुन आलेल्या लोकांची संख्या जवळपास लाखाच्या पुढे आहे. त्यातील काही जण लक्षण दाखवत नसले तरी कोरोनाबाधीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकांक्ष रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसुन येत नसल्याने ते बाधीत आहेत किंवा नाही हे सहज रित्या समजु शकत नाही. अशा परिस्थितीत Covid-19 होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचार गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
केंद्राच्या आयुष (AYUSH) मंत्रालयाने आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, व युनानी उपचारा बाबतच्या सूचना सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. प्रतिकार शक्ती वाढवावी लागणार या अनुषंगाने नजीकच्या काळात आपल्याला याबाबत ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत.
कळंब शहरातील व तालुक्यातील नागरिकांसह जिल्हावासीयांना आवाहन करण्यात येत आहे कि, कोरोनाचे संकट अजून गंभीर झालेले आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता आपल्याला आपली दिनचर्या काळजी पूर्वक पूर्ण करावी लागणार आहे. आपण जागरूक राहणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे, फेस मास्क लावणे, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे असुन, अशा गंभीर परिस्थीतीत उस्मानाबाद जिल्हयातील जनतेने घाबरुन न जाता दक्ष राहुन प्रतिकार शक्ती वाढवीण्यावर भर देण्याचे अवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here