
धाराशिव – सरकार आणि प्रशासनाची मग्रुरी तुळजाभवानीच्या दरबारात दिसून आली असून चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही बसवलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्री प्रताप सरनाईक हस्ते उद्घाटन होणार असून प्रशासनाचा बेजबाबदारपणा यानिमित्ताने पुन्हा दिसून आला आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानीच्या तुळजापूर शहरात देखरेख आणि सुरक्षेसाठी प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असून हे या कॅमेऱ्यांना एस टी क्यू सी प्रमाणपत्र नसल्याचा मुद्दा आ. कैलास पाटील यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उचलून धरला होता, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरलेले असताना त्यांना उत्तर, माहिती न देता प्रशासनाने उद्या या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा घाट घातला असून जबाबदारी, नीतिमूल्ये यांना मूठमाती दिली आहे.
तुळजापूर शहरात जवळपास ६७ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे चिनी कंपनी युनिव्हीव चे आहेत आणि विशेष म्हणजे मॉडेल कोणते आहेत हे देखील दिले नसल्याची माहिती आहे.
एस टी क्यू सी नसलेल्या कॅमेऱ्यांमध्ये हॅकिंग, डेटा लीक आणि बॅक डोअरची जोखीम असते. तुळजापूर सारख्या संवेदनशील आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी (तुळजाभवानी मंदिर परिसर) असे कॅमेरे बसवणे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
- संजय निंबाळकर व भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश; आ.कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- परंड्यात अवैध शस्त्र बाळगणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; मॅगजिनसह अग्निशस्त्र जप्त