26 November 2026, Thursdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
ताज्या बातम्या

मराठवाडा रेल कोच फॅक्टरीत भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या; आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांची ठाम भूमिका

अधिग्रहित जमिनींचा योग्य मोबदला आणि स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्यासाठी उपोषणस्थळी भेट देत मागण्यांना पाठिंबा

धाराशिव प्रतिनिधी : लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळावे, प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला मिळावा तसेच स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या न्याय्य मागण्यांसाठी उपोषणास बसलेले विलास शाहूराज मुळे यांच्या उपोषणस्थळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या व अडचणी सविस्तर जाणून घेतल्या.
लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरी हा मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र, ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आल्या, त्याच भूमिपुत्रांना प्रकल्पाच्या विकासाचा लाभ मिळणे आवश्यक आहे. प्रकल्प उभारणीसाठी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना रोजगाराच्या संधींमध्ये प्राधान्य देणे ही शासनाची जबाबदारी आहे, अशी ठाम भूमिका आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी यावेळी मांडली. मराठवाड्यात मोठमोठे औद्योगिक व विकासात्मक प्रकल्प उभे राहत असताना स्थानिक तरुणांना रोजगारासाठी इतरत्र भटकंती करावी लागू नये. या प्रकल्पांमध्ये मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीत प्राधान्य मिळाले पाहिजे. भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार, अधिग्रहित जमिनींचा योग्य मोबदला आणि इतर न्याय्य मागण्यांसाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली.
यावेळी सक्षनाताई सलगर, लातूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके, काळदाते अमृताताई, आंदोलनकर्ते नागनाथ शिंदे, कपिल धावड, धीरज मुळे, अनिल पवार, ओंकार बुद्धीबार, अनिल पंचाळ, शुभम शिंदे, रामेश्वर पवार, प्रवीण साळुंके, सुनील पवार, अशोक मुळे, अमर बोचरे, जगदीश पाटील यांच्यासह अनेक आंदोलक उपस्थित होते.
मराठवाड्याचा विकास हा केवळ प्रकल्प उभारण्यापुरता मर्यादित न राहता, त्या विकासाचा प्रत्यक्ष लाभ स्थानिक भूमिपुत्र आणि तरुणांना मिळाला पाहिजे. भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळालाच पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे.

Exit mobile version