25 November 2026, Wednesdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
पुणे

पुण्यात न्यायालयाबाहेर गोळीबार; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मंदार किवळेची हत्या

चार दिवसांपूर्वीच मिळाला होता जामीन; न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : शहरातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर बुधवारी (दि. २५) भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मंदार किवळे याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. न्यायालयाबाहेरच घडलेल्या या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मंदार किवळे हा २०२५ मध्ये पुण्यातील कात्रज परिसरात झालेल्या शुभम चव्हाण खून प्रकरणातील आरोपी होता. न्यायालयीन कामकाजासाठी बुधवारी तो शिवाजीनगर न्यायालयात आला होता. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. गोळीबारासह कोयत्याने वार करण्यात आल्याने न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणासह अन्य पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.
पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. शुभम चव्हाण खून प्रकरणाशी या हल्ल्याचा संबंध आहे का, यादृष्टीनेही तपास केला जात आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाल्याने न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता न्यायालयाबाहेरच गोळीबार आणि प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने न्यायालयीन कर्मचारी, वकील आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Exit mobile version