धाराशिव :
धाराशिव शहर पोलीस ठाण्यात खोट्या विवाहाच्या आमिषाने तरुणाची तब्बल १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बाळासाहेब हरिभाऊ मोरे (वय ३३, रा. वडगाव सी., ता. व जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी विवाहाचे आमिष दाखवून त्यांचा खोटा विवाह लावून दिला. या विवाहाच्या नावाखाली फिर्यादीकडून एकूण रु. १,२०,००० इतकी रक्कम घेतली. मात्र नंतर हा विवाह फसवा व बनावट असल्याचे उघड झाले.
ही घटना २३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून ते २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत वडगाव सी. परिसरात घडली.
या गुन्ह्यात आरोपी म्हणून –
- युवराज पाटील, दशरथ्ज्ञ जहागीरदार (दोघे रा. पाटण, ता. पाटण, जि. सातारा),
- शांताबाई (रा. बैलबाजार, भारत पेट्रोल पंपाजवळ, कराड),
- अविनाश मिलींद साळवे (रा. गणेश नगर, वडाळा ईस्ट, मुंबई, मुळ रा. देवळी, ता. मानगाव, जि. सातारा)
- व त्याची पत्नी दिपाली अविनाश साळवे (रा. पाटण, ता. पाटण, जि. सातारा)
यांचा समावेश आहे.
फिर्यादीच्या प्रथम खबरेवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
