Home Blog Page 84

दैनिक जनमत १४ जून २०२३ E paper

 

तेरणा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी ३ कोटींची मान्यता

 

धाराशिव – तालुक्यातील उजव्या व डाव्या कालव्याच्या दुरूस्तीचे अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत रू. ३,४१,४६,१२६ /- (रू. तीन कोटी एकेचाळीस लक्ष शेहचाळीस हजार एकशे सव्वीस फक्त) एवढया खर्चाच्या प्रस्तावास खालील अटींच्या अधिन सोबतच्या प्रपत्रानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

तेरणा मध्यम प्रकल्प, तेरणा नदीवर सन १९६४ मध्ये बांधण्यात आलेला आहे. प्रकल्पास उजवा कालवा व डावा कालवा असून उजव्या कालव्याची लांबी १६ कि.मी. असून सिंचन क्षमता ९०२ हेक्टर आहे. तसेच डाव्या कालव्याची लांबी १५ कि.मी. असून सिंचन क्षमता ७५० हेक्टर आहे. अशाप्रकारे प्रकल्पाचे एकुण लाभक्षेत्र १६५२ हेक्टर आहे. माती धरणाची लांबी २४३७ मी. व जास्तीत जास्त उंची १५.२३ मी. आहे. सन २०११ मध्ये प्रकल्पाचे कालव्याव्दारे अंतिम सिंचन करण्यात आलेले आहे. त्यानंतर तेरणा मध्यम प्रकल्प बंद पाईपलाईन व्दारे सिंचन करण्याच्या दृष्टीने पथदर्शी प्रकल्प म्हणून सन २०१२ मध्ये हाती घेण्यात आला आहे. तथापी बंद पाईपलाईन वितरणप्रणाली सद्य:स्थितीत काही तांत्रिक अडचणी मुळे बंद आहे व त्यामुळे उजव्या व डाव्या कालव्याव्दारे होणारे सिंचन बंद झालेले आहे. बंद पाईपलाईन वितरणप्रणालीव्दारे सिंचन करण्यास विलंब होत असल्याने व धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून देखील कालव्याव्दारे अथवा बंद पाईपलाईन वितरण प्रणालीव्दारे पाणी देणे शक्य होत नसल्याने कालव्याची दुरूस्ती करण्याची मागणी लाभधारका कडून वारंवार होत आहे. सदरील कामे पूर्ण झाल्यावर उपलब्ध पाणीसाठयाव्दारे १६५२ हेक्टर सिंचन करणे शक्य होणार आहे.


दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असा असेल दौरा

 



आ. राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती


धाराशिव – मोदी @ ९ या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असून त्यांच्या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष अजित गोपछे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड. मिलिंद पाटील उपस्थित होते 

१६ जून रोजी सकाळी सोलापूर येथून तामलवाडी मार्गे त्यांचे जिल्ह्यात आगमन होईल.त्यानंतर  पांगरदरवाडी येथे मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. तेथून ते श्री तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूर येथे येतील तिथेच मंदिर संस्थानच्या कार्यालयात विकास आराखड्याचे सादरीकरण केले जाईल. पुढे ते धाराशिव येथे येऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी करतील. त्यानंतर प्रबुद्ध नागरिक संवाद साधण्यासाठी ॲड. मिलिंद पाटील यांच्या निवासस्थानी भेट देतील तसेच स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात विवीध विभागांची आढावा बैठक घेऊन दुपारी ५.३० नंतर मल्टीपर्पज कॉलेजच्या मैदानावर विशाल सभेला ते संबोधन करणार आहेत.


दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा 


https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym

मंत्रीमंडळ बैठक (१३ जून २०२३) निर्णय


 मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.


✅ सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता


✅ कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये


✅ अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.


✅ पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ


✅ लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार


✅ पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार


✅ अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ


✅ मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना


✅ स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ


✅ चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार

दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा 


https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym

सावंत यांच्या बॉडी गार्डकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यास बेदम मारहाण !

सावंत यांच्या बॉडी गार्डकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यास बेदम मारहाण !



आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी


पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या दबावामुळे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप


 १५ जून रोजी परंडा शहर बंद चा इशारा

परंडा ( प्रतिनिधी ) महाविकास अघाडीचे कार्यकर्ते बुध्दीवान लटके यांना मारहाण करणाऱ्या आरोपी विरूद्ध लटके यांच्या सांगण्या नुसार गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करावी अन्यथा दि १५ जून रोजी परंडा शहर बंद करु असा इशारा महा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

     दि १२ जून रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बुध्दीवान लटके हे पंचायत समिती कार्यालया जवळ कामा निमीत्त थाबले होते. या वेळी धनंजय सावंत यांचे बॉडी गार्ड दादा विटकर,अविनाश हंगे व इतर तीन अनोळखी व्यक्तीनी राजकीय द्वेषा पोटी लटके यांना मारहाण करुन त्यांच्या खिश्यातील रोख रक्कम व सोन्याची चैन तोडून घेतली असल्याचे म्हटले आहे.या प्रकरणी परंडा पोलिस फिर्यादीच्या म्हणण्या नुसार गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करीत असुन पोलिसावर पालकमंत्री डॉ.सावंत यांचा दबाव असल्याचा आरोप केला आहे.

           दि १५ जून रोजी पर्यंत फिर्यादीच्या म्हणण्या नुसार आरोपीवर गुन्हा दाखल नाही केल्यास परंडा शहर बंद पुकारण्यात येईल असा इशारा दिला आहे.

      यावे वेळी राष्ट्रवादीचे तालूका अध्यक्ष ॲड.संदिप पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तालूका प्रमुख मेघराज पाटील,राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, रणजित पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर जाधव,अनिकेत काशीद,रविंद्र जगताप,रमेश परदेशी,इस्माईल कुरेशी,इरफान शेख,ॲड.अजय खरसडे,किरण शिंदे,कुणाल जाधव, सुदाम देशमुख,रेवण ढोरे, मकरंद जोशी,संतोष,गायकवाड,शाहरुक मुजावर,गणी हावरे,दत्ता मेहेर,रईस मुजावर,प्रशांत गायकवाड,तुकाराम गायकवाड, नंदू शिंदे,श्रीहरी नाईकवाडी,धनशाम शिंदे,बाबुराव साळुंके,सचिन पाटील,अमोल जगताप, जावेद पठाण,नागनाथ नरसाळे यांच्या सह कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.


दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा 


https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym

शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा थाळीपळी मोर्चा

 


धाराशिव दि. १२ (प्रतिनिधी) – शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीपळी मोर्चा काढण्यात आला.  विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक असलेली सेंट्रल किचन प्रणाली बंद करा, केरळ राज्याच्या धर्तीवर शालेय पोषण आहार कामगारांना 18000 मानधन द्या, विनाकारण विना चौकशी कामगारांना कामावरून कमी करू नका, दहा महिने ऐवजी बारा महिने शालेय पोषण आहार कामगारांना मानधन द्या, एक एप्रिल पासून झालेली मानधन वाढ कामगारांच्या खात्यात ताबडतोब जमा करा, इंधन भाजीपाला व पूरक आहार व पूरक आहार बिल ऑनलाईन करणाऱ्या शिक्षकाला निलंबित करा व ते बिल त्यांच्या पगारीतून कपात करून कामगारांना तात्काळ वाटप करा, ज्या कामगारांचे वय 65 वर्षे आहे अशा कामगारांना सेवा पुरती म्हणून एक लाख देऊन त्यांना तीन हजार रुपये दरमहा पेन्शन सुरू करा व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव शालेय पोषण आहार कामगार म्हणून शाळेमध्ये नियुक्ती करा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला होता यावेळी जिल्हाध्यक्षा कुसुम देशमुख, सुरेश धायगुडे, विष्णु शिंदे, बाळासाहेब निकम, सोनाली साळुंखे, सीमा येलदरे, मनीषा धामणे, शितल तौर, दिपाली देशमुख, मनीषा पवार, महिमा पवार, निर्मला पवार, अलका भोसले तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा 


https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym

धाराशिवमध्ये बसची फॉरच्युनर ला धडक

 


धाराशिव – शहरातील ताजमहल टाॅकीज समोर ब्रेक फेल झाल्याने बसचा व चारचाकीचा अपघात झाला आहे पुन्हा एकदा एसी टी महामंडळाचा भोंगळ कारभार पहिला मिळाला आहे.



 धाराशिव आगारातील धाराशिव लोहारा गाडी क्रमांक. एम एच २० बी. एल ४२३२ ही गाडी होती तर फाॅरचुनर क्रमांक एम. एच. ए. ल ०५ होती यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही दोन्ही गाडीतील लोक सुखरूप आहेत. हा अपघात झाल्यानंतर ताजमहल टाॅकीज परिसरात ट्राफिक झाल्याचे दिसून आले होते व त्यानंतर ट्राफिक   कर्मचारी येऊन अविनाश भुतेकर यांनी ही ट्राफिक हटवली.


दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym



केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात आम आदमी पार्टी रस्त्यावर



धाराशिव – आम आदमी पार्टीच्या वतीने धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकार आणि दिल्ली राज्य सरकार यांच्यादरम्यान प्रशासकीय अधिकार ताब्यात घेण्यावरून संघर्ष सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिलासा दिल्यानंतरही केंद्र सरकारने अध्यादेश काढून तो निर्णय बदलला. याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अध्यादेशाला राज्यसभेत विरोध करण्यासाठी विरोधीपक्षातील अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशकुमार, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे.

दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी  क्लिक करा