Home Blog Page 82

१२ हजाराची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार ताब्यात

 

धाराशिव – १२ हजाराची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून या कारवाई नंतर पोलिस विभागातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. याबाबत  वृत्त असे की गुटखा व तंबाखूचा व्यवसाय सुरू करू देणे कामी व तक्रारदारावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी महादेव वसंतराव शिंदे ,वय- 45 वर्षे, पद- पोलीस हवालदार, उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन, उस्मानाबाद(वर्ग 3) तक्रारदार यांचेकडून 15,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 12,000 रुपये लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.

विहिरीच्या कामासाठी बळजबरीने बांधून ठेवलेल्या अकरा जणांची सुटका

 



धाराशिव – विहिरीच्या कामासाठी बळजबरीने बांधून ठेवलेल्या अकरा जणांची पोलिसांनी सुटका केली असून याबाबत माहिती अशी की,१७ जून  रोजी ०९.०० वा. सु. पोलीस स्टेशन ढोकी येथे माहिती प्राप्त झाली की, वाखरवाडी, ता. जि. धाराशिव येथे संदिप रामकिसन घुकसे, वय २३ वर्षे रा. कवठा, ता. सेनगाव जि. हिंगोली यास बळजबरीने पकडून ठेवून त्याचेकडून दिवसभर विहीरीचे काम करुन घेतात. अशी माहिती मिळाल्यावरुन ती माहिती मा. पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक  एम. रमेश उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांना देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि बुध्देवार, सपोफी / ८१६ सातपुते, पोह/४८ शेळके, पोना/१८७१ क्षिरसागर, पोना / १७६० तरटे, पोका / ९१६ शिंदे, पोकॉ/१८८ शिंदे, पोकॉ/५२९ गोडगे असे पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून शेध घेतला असता त्याठिकाणी १) भगवान अशोक घुकसे, २६ वर्षे, रा. कवठा ता. सेनगाव जि. हिंगोली हा मिळून आला, त्याचे सोबत इतर ५ इसम नामे २) मारुती पिराजी जटाळकर, वय ४० वर्षे, रा. आतकुर, ता. धर्माबाद, ३) राजू गनुलाल म्हात्रे, वय २२ वर्षे रा मध्येप्रदेश, ४) मंगेश जनार्दन कानटजे वय २६ वर्षे, रा. कुलमखेड, मा. बुलढाणा, ५) बालाजी शामराव वाघमारे, वय ३२ वर्षे, रा. लिंबा, ता. देगलूर जि. नादेंड, ६) गणेश अशोक पवार, वय ३० वर्षे, रा. नाशिक असे मिळून आले आहे. वाखरवाडी येथे मिळून आलेल्या इसमांकडे चौकशी केली असता संदिप रामकिसन घुकसे हा मौजे खामसवाडी येथील विहीरीवर असल्याचे माहिती देवून | त्यांना सोबत घेवून चला अशी विनंती केली, त्यावरुन वाखरवाडी येथील मिळून आलेले सहा इसमांना सोबत घेतल्यावर त्यांना विश्वासात घेवून


चौकशी केली असता त्यांनी माहिती दिली. की, संतोष शिवाजी जाधव (गुतेदार) व इतर एक हे दिवसा बळजबरीने विहीरीवर आमचेकडून काम करुन घेतात व संध्याकाळी आमचे हाता पायाला पळून जावू नये म्हणून साखळीने ट्रॅक्टरला बांधून ठेवतात अशी माहिती दिली. त्यानंतर आम्ही मौजे खामसवाडी येथे जावून शोध घेतला असता | त्याठिकाणी १) संदीप रामकिसन घुकसे वय २३ वर्षे, रा. कवठा, ता. सेनगाव जि. हिंगोली याचेसह चार इसम नामे २) भारत ललीत राठोड, वय २६ वर्षे, रा. रुई, ता. मानोरा, ३) शरद दत्ताराव शिंदे, वय ३० वर्षे, रा. आडतोलाजी ता. जालना, ४) अमोल संतोष निंबाळकर, वय २२ वर्षे रा. शिरुभदा, ता. मंगरुल, जि. वाशीम, ५) प्रणव राजेंद्र पवार, वय २९ वर्षे रा. औरंगाबाद असे साखळीने बांधलेल्या, घाबरलेल्या अवस्थेत, एकाखड्यात मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यंचे कडे चौकशी केली असता त्यांना कृष्णा बाळू शिंदे (गुतेदार) रा. भुम व इमर एक यांनी बांधून ठेवून त्यांना मारहाण करुन मृयांचेकडून विहीरीवर काम करुन घेत असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर सदर आकरा घबरलेल्या स्थितत असलेल्या इसमांना पोलीस स्टेशन ढोकी येथे आणण्यात आले असुन त्यावरुन पोलीस स्टेशन ढोकी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे.

दैनिक जनमत १८ जून २०२३ E paper

धाराशिव जिल्ह्याकरिता १७ ते २१ जून, २०२३ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

 

धाराशिव – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून दिनांक १७ व १८ जून, २०२३ दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


औट घटकेची बॅनरबाजी… तत्परता की दबाव?

 



धाराशिव – धाराशिव शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या पूर्वी दि १६ रोजी शिवसेना ठाकरे गटाकडून भकास @ ४० अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र ही बॅनरबाजी औट घटकेची ठरली आहे. बॅनरबाजीची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशासनाने हे बॅनर काढले असले तरी बॅनर काढण्यासाठी  तत्परता दाखवली   गेली की बॅनर काढण्यासाठी प्रशासनावर दबाव होता याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सुरुवातील हे बॅनर कोणी लावले याबाबत अनभिज्ञता होती मात्र हे बॅनर भाजप विरोधकांनी लावले असल्याचे कळल्यानंतर मात्र प्रशासनाने हे बॅनर काढून टाकले.


रंगाचे वावडे? 


बॅनर काढण्यासाठी प्रशासनाने सुरुवात केल्यानंतर तिथे काही शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले त्यांना याबाबत सवाल केल्यानंतर काळा रंग अशुभ असतो असे कारण सांगितल्याचे माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी दैनिक जनमतशी बोलताना सांगितले.

धाराशिव जिल्ह्यात १६ जून ते ३० जून पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी

 



धाराशिव –   जिल्हयात दिनांक 16 जून 2023 रोजी म उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचा धाराशिव जिल्हा दौरा नियोजित आहे. दिनांक 16 जून 2023 ते दिनांक 21 जून 2023 या कालावधीत श्री गजानन महाराज पालखी शेगाव, ता. शेगाव जि. बुलढाणा ही उस्मानाबाद जिल्हयातून आषाढीवारी करीता श्रीक्षेत्र पंढरपूर जि.सोलापूर कडे मार्गस्त होणार आहे. दिनांक 19 जून 2023 ते दिनांक 21 जून 2023 या कालावधीत श्री संत एकनाथ महाराज पालखी पैठण जि. औरंगाबाद ही उस्मानाबाद जिल्हयातुन आषाढीवारी करीता श्रीक्षेत्र पंढरपुर जि. सोलापूर कडे मार्गस्त होणार आहे. दिनांक 16 जून 2023 ते दिनांक 28 जून 2023 या कालावधीत विविध संतांच्या पालख्या दिंडया हया उस्मानाबाद जिल्हयातुन आषाढीवारी करीता श्रीक्षेत्र पंढरपूर जि. सोलापूर कडे मार्गस्त होणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष/संघटना यांचे कडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनांक 29 जून 2023 रोजी देवशयानी एकादशी ( आषाडी एकादशी) साजरी होणार आहे. दिनांक 29 जून 2023 रोजी ईद-उल-अझहा (बकरी ईद ) साजरी होणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष/संघटना यांचे कडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिकविमा व नुकसान भरपाईची देय रक्कम मिळावी आणि इतर मागण्या च्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष/संघटना यांचे कडुन धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, बंद, निदर्शने, तालाठोको व रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उस्मानाबाद जिल्हयात ग्रामीण / शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा / जत्रा / ऊरुस लहान मोठया स्वरुपात साजरे करण्यात येतात. व्यक्ती, व्यक्ती समुह तसेच विविध पक्ष/संघटना यांचे वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी अचानकपणे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील प्रमाणे संपन्न होणारे धार्मिक सण / उत्सव, यात्रा / जत्रा / ऊरुस व आंदोलनात्मक कार्यक्रम उस्मानाबाद जिल्हयात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 16 जून 2023 रोजीचे 00.01 पासुन ते दिनांक 30 जून 2023 रोजी 24.00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमाव व शस्त्रबंदी प्रमाणे खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.

1. शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत. 2. लाठया, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तु बाळगणार नाहीत. 3. कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत.

4. दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.

 5. आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.

6. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत. 7. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.

8. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार नाही

श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी १५ ते १६ जून रोजी मार्गात बदल

धाराशिव –  दिनांक 16 जून 2023 (शुक्रवार) रोजी सुरक्षेच्या कारणास्तव श्री देविजींचे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना दिनांक 15 जून 2023 चे मध्यरात्रीपासून दिनांक 16 जून 2023 चे मध्यरात्रीपर्यंत घाटशीळ रोड पार्कींग येथून बिडकर पायऱ्यामार्गे दर्शन मंडपात दर्शनासाठी सोडण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.


‘वेगवान व गतीमान’ नावाने जाहीरात करणाऱ्या अभ्यासु उपमुख्यमंत्र्यानी जिल्हावासियांच्या प्रश्नाची उत्तरे द्यावी




आमदार कैलास पाटील यांचे फडणवीसांना आवाहन 

धाराशिव (प्रतिनिधी) वेगवान निर्णय व गतीमान सरकार अशा जाहीराती करणाऱ्या सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्हयातील जनतेला  पडलेल्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत असे आवाहन  आमदार कैलास पाटील यानी केले आहे. राजकीय सभा जिल्ह्यात घेताना अभ्यासु म्हणुन ओळख असलेल्या फडणवीसांनी जनतेच्या मनातील विषयावर प्रकाश टाकुन त्याचे निरसन करावे असे पाटील यानी म्हटले आहे.

——————

1) सततच्या पावसाचे अनुदान अजुनही मिळालेले नाही,सप्टेंबर 2022  मध्ये सततच्या  पावसामुळे अनुदानाची मागणी चा 222 कोटीचा प्रस्ताव राज्यसरकार कडे पाठवला. त्यावर मंत्रीमंडळाची उपसमितीची बैठक घ्यायला वेगवान सरकारला विलंब झाला, त्यानंतर त्यावर अभ्यास गट नेमला ,आता 13 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत म्हणजेच  तब्बल 9 महिन्यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी ची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. गतीमान सरकारला शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीच अभ्यास गट का नेमावा लागतो तसेच मदत मंजूर करण्यासाठी 8-9 महिने का वेळ लागला ?

2) भाजप -शिंदे सरकार नेहमी हे शेतकर्यांचे सरकार आहे आम्ही निकषाच्या बाहेर जाऊन शेतकऱयांना प्रति हेक्टर 13600 रु अन 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत देत आहोत अशी शेखी  मिरवत होते  परंतु परवा मंजूर केलेली सततच्या पावसाची मदत व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीची मदत वाढवून द्यायचे तर लांबच उलट आपल्या सरकारने ती मदत कमी करून 2 हेक्टर पर्यंतच 8500 प्रति हेक्टर का केली याच उत्तर शेतकर्यांना  मिळालं पाहिजे !

3) 2020 खरीप पिकविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. तिथे शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात लढाई जिंकली. तरीही कंपनीकडुन रक्कम वसुल करणे सरकारला जमले नाही. जिल्हाधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सूरु केल्यावर सरकारच्या वकीलांनी उच्च न्यायालयात कंपनीला पुरक ठरेल अशी बाजु घेतल्याने कारवाईला स्थगिती मिळाली. सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिकेच्या सुनावणीतही राज्य सरकारच्या वकीलांने शेतकरी विरोधी भुमिका घेतली. दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुदत असताना तिथे सहा महिन्याचा वेळ लावला. त्यातही प्रतिज्ञापत्रामध्ये एनडीआरएफच्या निकषानुसार रक्कम वितरीत करण्याचा मुद्दा आणला. त्यामुळे जिथे 357 कोटी रुपये मिळणार होत तिथे फक्त 109 कोटीच रुपये मिळणार आहेत. कंपनीधार्जिने राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हक्काचे अडीचशे कोटी रुपये कंपनीच्या घश्यात का घातले?

4) 2021 खरीप पिकविम्याबाबत पन्नास टक्केच रक्कम देऊ केली आहे, त्याबाबत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीसमोर 24 जानेवारी रोजी बैठक झाली. त्या बैठकीस आता सहा महिने होत आले तरीही त्याचे इतिवृत्त देखील तयार झालेले नाही. त्यावरुनच शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकार किती गंभीर आहे हे दिसते. ही रक्कम 485 कोटी असुन जानेवारीच्या राज्यस्तरीय बैठकीत कंपनीने चुकीच्या पध्दतीने वाटप केल्याचे निदर्शनास आले होते, राज्यस्तरीय समितीला शेतकऱयांच्या बाजूने निर्णय द्यावा लागला असता म्हणून त्या सुनावणी होऊन सहा महिने झाले उर्वरित 485 कोटी कंपनी कडून वसूल करून शेतकर्यांना द्यायचे तर लांबच साधे त्या सुनावणी चे इतिवृत्त अद्याप पर्यंत का तयार झाले नाही याच उत्तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकर्यांना  द्यावं लागेल !

5) 2022 खरीप पिकविमा वितरीत करताना केंद्र सरकारच्या कंपनीने असमान पध्दतीने वाटप केले. त्याची मी स्वतः विभागीय आयुक्ताकडे तक्रार केली व त्यानी बैठक घेतली. 21 फेब्रुवारी रोजी आयुक्तानी थेट कंपनीला उर्वरीत रक्कम देण्याचे आदेश दिले. तरी कंपनीकडुन रक्कम वसुल करणे सरकारला शक्य होत नाही, तसेच मुजोर कंपनीकडुन साध्या पंचनाम्याच्या प्रती सुद्धा मिळविण्यात गतीमान सरकार अपयशी ठरले आहे . केंद्र सरकारची कंपनी असताना देखील कित्येक  महिने उलटून गेले तरी राज्य सरकार गप्प  का बसले आहे?

6) शेतकऱयांनी परराज्यात  विकलेल्या कांद्याला अनुदान न देण्याचा शासनाने शेतकरीविरोधी निर्णय घेतला. अनुदानासाठी लावलेल्या अटी एवढ्या जाचक होत्या की जिल्ह्यातील साडेसहा हजारापैकी फक्त सहाशेच शेतकरी जिल्ह्यात पात्र ठरले. अनुदान देण्याची घोषणा करुनही शेतकऱ्यांना त्याचा उपयोग का झाला नाही?

7) हरभरा खरेदी केंद्र सूरु करण्यासाठी वेगवान सरकारला गतीमान निर्णय का घेता आला नाही. जेव्हा शेतकऱ्यांने हरभरा व्यापाऱ्यांना विक्री केला तेव्हा सरकारने जाणीवपुर्वक खऱेदी केंद्र सूरु केली असा प्रकार सरकारने करणे शेतकरी विरोधी नाही का?

8) 2018 साली तुम्ही मुख्यमंत्री असताना कृष्णा मराठवाडा प्रकल्पास प्राधान्यक्रमाची अट घातली यात मराठवाड्यातील एकही कामे घेतले नव्हते. महाविकास आघाडी सरकारने तुळजापुर तालुक्यातील रामदरा व कळंब तालुक्यातील दुधाळवाडीपर्यंतच्या विविध कामाचा समावेश प्राधान्यक्रमात केला. त्या वर्षी तत्कालिन सरकारने साडेआठशे कोटीची भरीव तरतुद केली. व त्याची निविदा प्रसिध्द झाली. तुमच्या सरकारने आल्यानंतर पहिल्यांदा स्थगिती देण्यास सूरुवात केली. त्यात एवढ्या महत्वाच्या कामालाही स्थगिती दिली. नंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनात मी लक्ष्यवेधी मांडल्यानंतर ही स्थगिती उठविली. मात्र कामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी तुमच्या गतीमान सरकारला एप्रिल महिन्यापर्यंतचा म्हणजे 8 महिने कोणत्या कारणामुळे लागले यामुळे कालावधी  साडेआठशे कोटीपैकी फक्त साडेचारशे कोटी रुपये खर्च होऊ शकले हेच तुमचे जिल्ह्यावरील प्रेम का?  

9) धाराशिव शहरातील उद्याने व आठवडी बाजाराच्या कामासाठी कोट्यावधीचा निधी महाविकास आघाडी सरकारने दिला होता. तुमच्या सरकारच्या स्थगिती धोरणामुळे शहरातील ही कामे होऊ शकली नाहीत. ज्या शहरात तुम्ही सभा घेताय तिथली ही विकास थांबविल्यानंतर हा जाब कोणाला विचारायचा ?

10)धाराशिव व कळंब तालुक्यातील बांधकाम विभागाच्या रस्त्याची खूप वाईट अवस्था झाली आहे यासाठी निधी द्यायचं तर लांबच राहील परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर असलेल्या कामांना स्थगिती दिल्यामुळे या रस्त्यांवर रोज अपघात होत आहेत यामुळे काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमच अपंगत्व आले याला जबाबदार कोण  ?

11) एप्रिल 2023 मध्ये धाराशिव ,कळंब व तुळजापूर तालुक्यात गारपीट होऊन खुप मोठया प्रमाणात शेतकऱयांचे नुकसान झाले स्वतः मा मुख्यमंत्री  यांनी पाहणी केली 2 महिने उलटून गेले तरी अद्याप पर्यंत 1 रु सुद्धा शेतकर्यांना मदत मिळाली नाही ती मदत वाढीव दराने मिळणार का 8500 प्रमाणेच मिळणार व पेरणी आधी मिळणार का याच उत्तर शेतकर्यांना मिळालं पाहिजे 


मा  उपमुख्यमंत्री महोदय आपल्या सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणामुळे जिल्ह्यात जुलै 2022 पासून मे  2023 पर्यंत 147 शेतकऱयांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे शेतकर्यांना सततच्या पावसाची ,हक्काच्या पीकविम्याची रक्कम वेळेत मिळाली असती तर कदाचित या  147 शेतकर्यांवर आत्महत्या करायची वेळ आली नसती या प्रश्नाना श्री.फडणवीस यांनी उत्तरे देऊन जनतेच्या मनातील शंका दुर कराव्यात असे आवाहन आमदार पाटील यानी केले आहे.