Home Blog Page 64

भैरवनाथ शुगर च्या वतीने वडनेर ग्रामस्थांची दिपावली गोड

 

सरपंच जैनुद्दिन शेख यांच्या हस्ते  वडनेर येथील २९४ कुंटूबांना मोफत साखर वाटप


परंडा (दि१५ नोव्हेंबर) आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री डॉ.प्रा.तानाजी सावंत यांच्या सोनारी येथील भैरवनाथ शुगरच्या वतीने दिपावली सना निमीत्त परंडा तालूक्यातील वडनेर येथील २९४ कुंटूबाना दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रति कुटूब ५ कीलो मोफत साखरेचे वाटप करण्यात आले.

          राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.प्रा.तानाजीराव सावंत व भैरवनाथ शुगरचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांच्या आदेशाने भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक तथा जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शना खाली परंडा तालुक्यातील नागरीकांची दिपावली गोड व्हावी या उद्देशाने मागील काही दिवसापासुन भैरवनाथ शुगरच्या वतीने परंडा तालुक्यातील नागरीकांना मोफत साखर वाटप करण्यात येत आहे.

          दि.१४ नोव्हेंबर रोजी या साखरेचे वडनेर / सरणवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच जैनुद्दिन शेख यांच्या हस्ते वडनेर येथील २९४ कुटुंबाना प्रति कुटुंब ५ किलो साखरेचे मोफत वाटप करण्यात आले.यामुळे ऐन दिपावली सनात भैरवनाथ शुगर कडुन मोफत ५ किलो साखर मिळाल्यामुळे गरीब व सर्व सामान्य कुंटूबाना दिलासा मिळाला आहे.

       यावेळी अपना वतन संघटनेचे हमीद शेख,वडनेर / सरणवाडी ग्रुप ग्रामपंचायती च्या नुतन ग्रा.प.सदस्या अनुराधा गायकवाड,माजी सरपंच सुरेश परदेशी,शिवसेना शाखा प्रमुख नवनाथ काशीद,कांतीलाल गोफणे, पप्पू लाडे,अस्लम शेख, आरीफ शेख,अंतू वायकुळे,अर्जुन जाधव, आनिल जाधव, सोहेल तांबोळी,चाँद शेख,मुजीब शेख,जावेद शेख,हैबत गायकवाड लक्ष्मण गायकवाड,गणेश सरवदे, आक्षय सरवदे,रज्जाक शेख,पांडू कोळी यांच्या सह कार्यकर्ते, ग्रामस्त मोठया संख्याने उपस्थित होते.

अनाळा येथील आट्या-पाट्या स्पर्धेत शिवशाही आट्या-पाट्या संघ प्रथम

  

परंडा (प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील अनाळा येथे सालाबाद प्रमाणे दिवाळी निमित् भव्य आट्या – पाट्या स्पर्धेचे आयोजन कालिका देवी मैदानावर करण्यात आले होते.या स्पर्धा १०ते १२ नाव्हेंबर दरम्यान संपन्न झाली.या स्पर्धेसाठी गावातील उच्च शिक्षित तरुण,व्यापारी बांधव यांनी आकर्षक बक्षीसे स्पर्धेसाठी दिली होती.या स्पर्धेत  ३२ संघांनी सहभाग नोंदवला होता.स्पर्धेचा समारोप दि.१२ रोजी संध्याकाळी झाला.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे २१००० हजार रुपयाचे बक्षीस शिवशाही आट्या – पाट्या संघ अनाळा यांनी पटकाविले.द्वितीय क्रमांक १५००० हजार रुपये संघर्ष आट्या – पाट्या संघ इनगोदा, तृतीय क्रमाक ११००० हजार जय भवानी आट्या – पाट्या संघ मुगांव,चतुर्थ क्रमांक ७००० हजर विठ्ठल – रुक्मिनी आट्या – पाट्या संघ पंढरपूर तर पाचवे बक्षीस ५००० हजार जय भवानी आट्या – पाट्या संघ साकत यांनी पटकाविले.

         बक्षीसाचे वितरण डॉ. प्रकाश सरवदे,अभियंता सतिश चोबे, सोमनाथ गिलबिले कालिका ज्वेलर्स चे विनोद चिंतामणी, मेजर योगेश शिंदे,अंगद राऊत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.विजेत्या संघास सागर ज्वेलर्स तर्फे ट्रॉफी भेट देण्यात आली.तीन दिवस चालेल्या या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून अप्पा राजे वामन यांनी उत्कृष्ठ काम पाहिले.या स्पर्धेसाठी पंच म्हणून दशरथ क्षिरसागर,हनुमंत क्षिरसागर,सुग्रीव फराटे,बाबू कदम,लक्ष्मण पवणे,लक्ष्मण हिवरे,उमेश क्षिरसागर यांनी काम पाहिले.मैदान व्यवस्थापक म्हणून बाळू मोटे यांनी काम पाहीले स्पर्धा शांततेत संपन्न करण्यासाठी गावातील तरुण युवक,पोलीस दलात कार्यरत असणारे लक्ष्मण क्षिरसागर व रमेश क्षिरसागर यांनी अथक परिश्रम घेतले . स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती .

सोनगीरी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली

 

सोनगीरी येथील जलजीवन मशिन अंतर्गत २८ लक्ष रुपयाची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित


पाणी पुरवठा योजनेचे उद्योजक राजाभाऊ शेळके यांच्या हस्ते लोकार्पण


परंडा (भजनदास गुडे ) परंडा तालुक्यातील कात्राबाद सोनगिरी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत सोनगीरी येथील जलजीवन योजनेतील पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ उद्योजक राजाभाऊ शेळके यांचे हस्ते दि.१४ नोव्हेबर रोजी करण्यात आला.

          मागील काही वर्षापासून सोनगीरी ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा उपक्रम असलेली जल जीवन योजना सोनगीरी येथे मंजूर झाली.या मंजुर झालेल्या योजनेचे काम काही महिण्यातच पूर्ण होऊन दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कार्यन्वीत करण्यात आली आहे.

          सदर योजना २८ लक्ष रुपयांच्या निधीतून उभारण्यात आली आसुन सोनगीरी येथील १०० कुटूबांना नल जोडणी देण्यात आली.सदर योजना तात्काळ सुरू झाल्यामुळे सोनगीरी येथील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

         नळ योजनेचे लोकार्पण करतेवेळी उद्योजक राजाभाऊ शेळके,दिनेश गरड,विष्णू गरड, किरण गरड,परसराम कोळी, गणेश कोकाटे, राहुल गरड,दत्ता वेताळ,नवनाथ खैरे, नाना शिंदे, अशोक सोनवणे, नवनाथ शेळके, बाळू चव्हाण,सचिन इंगळे, अरुण जाधव, बिभीषण फासे,गणेश इंगळे,संतोष काटे,कृष्णा वेताळ, बापू वेताळ यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

राज्य मंत्रिमंडळ बैठक : संक्षिप्त निर्णय

 

राज्य मंत्रिमंडळ बैठक : संक्षिप्त निर्णय

 

दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ 

धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती. 

( इतर मागास बहुजन कल्याण) 

राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता

( उद्योग विभाग) 

 मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार.

( जलसंपदा विभाग) 

 

अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे  राज्य निवड मंडळामार्फत भरणार 

( वैद्यकीय शिक्षण)

 मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.

 

( वस्त्रोद्योग विभाग)   

 गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार 

( इतर मागास बहुजन कल्याण )

 विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा

( सहकार विभाग) 

 मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार 

( पर्यटन विभाग) 

बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार 

( गृह विभाग)

 महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार

( पशुसंवर्धन) 

 नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व  दंड माफ 

( सार्वजनिक बांधकाम विभाग)