Home Blog Page 60

संत मीरा पब्लिक स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात संपन्न

परांडा (प्रतिनिधी)परांडा येथिल संत मीरा पब्लिक स्कूल व डॉ.वेदप्रकाश विद्यामंदिर या शाळेत संस्थापक डॉ प्रतापसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘फन -फेअर ‘हा विध्यार्थ्यांच्या विविध कला -कौशल्याला वाव मिळावा हा मनोरंजनात्माक व आनंददायी उपक्रम अतिशय उत्साहत पार पडला.
यावेळी या ‘आनंद मेळाव्यात ‘एकूण २१२ विद्यार्थ्यांनी १०६ स्टॉल लावले होते.यामध्ये भाजीपाला,फळे,मसालेदार पदार्थ,सौंदर्य प्रसाधने,बाईक शोरूम,खेळ व खेळणी इ.ची अतिशय उत्कृष्ट मांडणी करून खूप मोठे मोठे आकर्षक स्टॉल लागले होते.विद्यार्थ्यांना व्यवहार कौशल्य,नेतृत्व गुण,मार्केटिंग स्किल,सवांद कौशल्य,संघटन कौशल्य समजावे व शिक्षणातून मनोरंजन व्हावे या हेतूने या ‘फन -फेअर ‘ उपक्रमाचे आयोजन केले होते.
यात विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य दाखवत लाखो रुपयांची उलाढाल केली.या स्पर्धात्मक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना १०० पैकी गुण देण्यात येणार आहेत, याबद्दल विद्यार्थ्यांना शाळेत या स्पर्धेचे प्रशिक्षण देण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार,नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर,माजी सभापती अनुजा दैन,सुचिता सिद्धेश्वर पाटील,अॅड.झहीर चौधरी, भोत्राच्या सरपंच उर्मिला पाटील, विस्तार अधिकारी सूर्यभान हाके, अशोक खुळे,अॅड.पै.विशाल देवकर,अजय खरसडे,डॉ. अब्बास मुजावर,एव्हरेस्ट देशमुख,जफर जिनेरी,इरफान शेख,समीर पठाण,जयदेव गोफने,शीतल खराडे,संजीवनी पाटील, बाळासाहेब गोडगे,पंजाब घाडगे, सागर ठाकूर,जावेद पठाण, प्राचार्य संतोष भांडवलकर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व स्टॉल ला भेटी देऊन कौतुक केले व आनंद घेतला.
मार्केट डे चे संयोजक म्हणून संतोष शेरे,विकास शेळके,राणी भिल्लारे,दादासाहेब गिरवले व सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी यांनी काम पहिले.निरीक्षक म्हणून विकास सुरवसे व सुमित कोकाटे यांनी काम पाहीले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा गव्हाळे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी दिवसभरातून परंडा व तालुक्यातील अनेक पालक व शिक्षण प्रेमी नागरीकांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून कौतुक केले.

दैनिक जनमत Dainik Janmat 23 December 2023

0

अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा,चार महिलांची सुटका, दलालासह लॉजचालक व मॅनेजर विरुध्द गुन्हा दाखल

धारशिव – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 21डिसेंबर रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि,  धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर ४.०० वा. सु. छापा टाकला असता लॉज मध्ये चार महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव,दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, हे दोघेजण नमुद लॉजचे मालक 1)नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव  यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले. यावरुन पथकाने लॉज मॅनेजर  नामे- 1) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे, रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल-2) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, ॲटोरिक्षा क्र एमएच 09 जे 8134, रोख रक्कम 16,130 व निरोधची  पाकीटे असा एकुण 71,130 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन (लॉजमालक) 1)नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव, लॉज मॅनेजर-2) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल- 3) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांचेविरुध्द गुरनं 352/2023 भा.दं.वि. सं. कलम- 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5 अन्वये धाराशिव ग्रामीण  पोलीस ठाण्यात  दि. 21.12.2023 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- वासुदेव मोरे, पोलीस हावलदार- अश्विनकुमार जाधव, दिलीप जगदाळे, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, शोभा बांगर, शैला टेळे, पोलीस अमंलदार- साईनाथ आशमोड, योगेश कोळी,  रंजना होळकर, चालक पोलीस अमंलदार- भोसले, अरब यांच्या पथकाने केली

खवय्यांसाठी खाद्यपदार्थ, अध्यात्मिकांसाठी धार्मिक कार्यक्रम, बच्चे कंपनीसाठी मनोरंजन, महिलांसाठी संक्रात वान खरेदी, नववर्षात हिरकणी महोत्सव ठरणार धाराशिवकरांसाठी मेजवानी

धाराशिव – खवय्यांसाठी खाद्यपदार्थ, अध्यात्मिकांसाठी धार्मिक कार्यक्रम, बच्चे कंपनीसाठी मनोरंजन, महिलांसाठी संक्रात वान खरेदी, नववर्षात होणारा हिरकणी महोत्सव धाराशिवकरांसाठी मेजवानी ठरणार आहे.
५ ते १० जानेवारी दरम्यान लेडीज क्लब येथे या महोत्सव होणार असल्याची महिती लेडीज क्लब च्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने १० ते १५ वर्षांपूर्वी हा महोत्सव सुरू करण्यात आला होता. कोरोना काळात यात खंड पडला होता. राज्याचे ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात ५० खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहेत त्यात बासुंदी, पाणी पुरी, रगडा पॅटीस, भेळ, दही धपाटे, यासोबत चिकन समोसा, मटण, मच्छी यासारखे व्यंजन असणार आहेत. तसेच लहान मुलांच्या करमणुकीसाठी देखील काही स्टॉल असणार आहेत. तसेच संक्रांत सणाचे वान खरेदी करण्यासाठी देखील काही स्टॉल असणार असल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले.

असे असणार कार्यक्रम

५ जानेवारी रोजी नवदुर्गा कार्यक्रम असून देवीची नऊ रूपे नृत्याविष्कारामधून देवीच्या विविध गाण्यावर दाखवण्यात येणार आहेत. ६ जानेवारी रोजी ह भ प शिवलीलाताई पाटील यांची कीर्तन असणार आहे. ७ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील यशस्वी महिला उद्योजकांचा मार्गदर्शन कार्यक्रम आहे. ८ जानेवारी रोजी कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन असणार आहे. ९ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या श्रवणीय आवाजातील ग. दि. माडगूळकर यांची सुमधुर गाणी असलेले गीत रामायण नृत्याविष्कार हा कार्यक्रम आहे. तर १० जानेवारी रोजी आज लग्न संस्था नष्ट होतेय का या प्रश्नावर लग्न पहावे करून हा कार्यक्रम असणार आहे.

खासदारांचे निलंबन, सामाजिक संघटनांचे आंदोलन,९२ व्या वर्षी समाजवादी नेते पन्नालाल सुराणा आंदोलनात उतरले



धाराशिव – १४२ पेक्षा अधिक खासदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन करत राष्ट्रिय निषेध दिन पाळला. या आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी हिरीरीने सहभाग घेतला हे विशेष.

१३ डिसेंबर रोजी दोन युवकांनी प्रेक्षक गॅलरी तून उड्या मारत गदारोळ केला होता. त्यानंतर विरोधीपक्षाचे खासदार प्रचंड आक्रकम झाले होते. संसद भवनाच्या सुरक्षेचा मुद्दा देखील अनेकांनी यावेळी उचलून धरला होता. या घटनेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. याविरोधात देशभर आज आंदोलने सुरू आहेत.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालासमोर अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत आज आंदोलन केले. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, गुंडू पवार, ॲड. रेवण भोसले, ॲड. अजय वाघाळे, सिद्धेश्वर बेलुरे, गणेश वाघमारे, अब्दुल लतिफ, विजय गायकवाड, आदि उपस्थित होते. तसेच या आंदोलनात सोशलिस्ट पार्टी इंडिया, राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मुलन समिती आदी सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.

तांदुळवाडी येथे एस टी बस व दुचाकीचा भीषण अपघात
तिघांचा जागीच मृत्यू


कारी दि२१(प्रतिनिधी)बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुयश विद्यालयाजवळ गुरूवार ( दि२१) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एस टी बस आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला.

यामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. धाराशिव आगाराची पुणे-धाराशिव बस बार्शीमार्गे धाराशिवकडे जात होती. तर, धाराशिव येथून दुचाकीवरून तिघे बार्शीच्या दिशेने येत असताना तांदुळवाडी नजीक हा भीषण अपघात झाला. अपघातात कार्तिक रोहित यादव (वय १७रा गोरे गल्ली धाराशिव), ओंकार अनिल पवार (वय २०रा शींगोली ता धाराशिव), ओम दत्ता आतकरे (वय २२रा. शिंगोली ता धाराशिव) मृत व्यक्तीची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात वेळ काढूपणाची भूमिका घेऊ नये- डॉ.प्रतापसिंह पाटील

धाराशिव-सध्या राज्य सरकार हे मराठा आरक्षणासंदर्भात वेळ काढू पणाची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर योग्य ठोस भूमिका घ्यावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी दिले आहे.

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा झाल्यानंतर मराठा समाज पेटून उठलेला आहे.मराठा समाजातील अनेक तरुण हे नैराश्यापोटी आत्महत्या करत आहेत त्यामुळे जर भविष्यात अशा गोष्टी टाळावयाचा असतील तर सरकारने वेळ मारुन न नेता मराठा आरक्षणासंदर्भात तात्काळ अध्यादेश काढावा व मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण द्यावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

सरकार मराठा आरक्षणासंदर्भात तारीख ते तारीख देत आहे मनोज जरांगे पाटील यांना आतापर्यंत दोन वेळा तारखा दिलेल्या आहेत.आता सरकारने दिलेली 24 डिसेंबर ही डेडलाईन तारीख जवळ आलेली असताना सरकार कुठलेही ठोस पावले उचलताना दिसत नाही.उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत बोलताना फेब्रुवारी अखेरपर्यंत आरक्षण देऊ असे म्हटले आहे त्यामुळे मराठा समाजात संभ्रमाची भूमिका निर्माण होत आहे असेही या निवेदनात म्हटले आहे.

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी वाढत असून भाविकांना सुलभ सुविधा मिळवण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व्यवस्था करावी

अक्कलकोट (प्रतिनिधी) – मार्गशिर्ष महिना व नाताळ सुट्टीमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी वाढत असून, यंदा १० लाखांहून अधिक भाविक येतील असा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने प्रशासनाकडून वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. भाविकांना सुलभ सुविधा मिळण्याकामी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी सकल स्वामी भक्तातून होत आहे.

सतत वाढत चाललेल्या गर्दीने वाहतुकीची कोंडी, निवासासाठी प्रतीक्षा व नाहक त्रास, अरुंद रस्ते व अस्वच्छता यामुळे भाविकांना अनेक अडचणीच्या सामोरे जावे लागले आहे. हे शासकीय यंत्रणाने पहिले, सलग आलेल्या सुट्यांमुळे अक्कलकोटमध्ये पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविकांची संख्या वाढणार असून सदर सुट्टीत प्रचंड गर्दी होणार आहे.

गत दिवाळीच्या सुट्टीमध्ये पहाटे तर दर्शनाची रांग राजे फत्तेसिंह चौक पार झाली होती. भाविकांना दर्शनासाठी आठ ते दहा तास लागत होते. हि पार्श्वभूमी पाहता आगामी सुट्यांच्या दिवशी वटवृक्ष देवस्थान, मुरलीधर मंदिर, समाधी मठ (चोळप्पा मठ), गुरु मंदिर (बाळप्पा मठ), राजेराय मठ, शिवपुरी, नवसाचा मारुती मंदिर, एकमुखी दत्त मंदिर व अन्नछत्र मंडळ व परिसरातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर येथे दर्शनासाठी व महाप्रसादाकरिता गर्दी होणार आहे.

दिवाळीच्या सुट्टीमध्ये पोलिस प्रशासनाने शहरातील वाहनांची कोंडी टाळावी म्हणून कमलाराजे चौक, कारंजा चौक, मैंदर्गी रोड या ठिकाणी बॅरिकेडिंग करून वाहनांना मंदिर परिसरात सोडले नाही. त्यामुळे भाविकांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने लावण्यात येत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडली होती. असे होता कामा नये याकरिता प्रशासनाने वादळा पूर्वीची शांतता म्हणून आत्तापासूनच काटेकोरपणे नियोजन करणे काळाची गरज आहे.

समाधी मठाजवळ दाटीवाटीने भक्तांना मंदिरापर्यंत पोहोचावे लागते, याबाबत प्रशासनाने सुटसुटीतपणा आणण्याकामी विशेष योजना आखणे गरजेचे आहे. यामध्ये येथील काही रस्ते वनवे करणे गरजेचे असून, तेथील रहिवाश्यांनी देखील होणार्या गर्दीमुळे प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे

दैनिक जनमत DAINIK JANMAT 21 december 2023 E paper