शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरीता सुरू झालेल्या शालेय पोषण आहारावर शाळेनेच डल्ला मारला असून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
महात्मा गांधी विद्यालय केसर जवळगा ता. उमरगा या शाळेत हा प्रकार घडला असून राजशेखर सिद्रामप्पा चिंचोरे यांनी याबाबत तक्रार केली आहे.
या प्रकरणात भ्रष्टाचार झालेला असल्याने आणि लहान मुलांच्या पोषण आहारावर डल्ला मारून स्वतःच्या स्वार्थासाठी, पैसे मिळवण्यासाठी, लाभासाठी, शासनाला -वरिष्ठांना खोटे अहवाल पाठवून, खोटे पटसंख्या दाखवून, बँकेतील स्टेटमेंट कोणतेही जुळत नसताना देखील त्याबाबतची बिले काढून, स्वतःच्या लाभासाठी संबंधित मुख्याध्यापक, संबंधित गटशिक्षणाधिकारी, संबंधित गटविकास अधिकारी आणि शालेय पोषण आहार व तद संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संघटित रित्या गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखून शासनाचे नुकसान केले आहे. त्याचप्रमाणे शासनाचे आर्थिक नुकसान केलेले आहे, तसेच लहान मुलांच्या मूलभूत हक्काचा शालेय पोषण आहार त्यांना दिला गेला नाही असे तक्रारीत म्हटले आहे.
शालेय पोषण आहारावर शाळेचा डल्ला, शासनाची फसवणूक केल्याची तक्रार
भाजपने लोकसभा निवडणुकीचा शड्डू ठोकला, १९५ उमेदवार केले जाहीर, नरेंद्र मोदी वाराणसीतूनच लढणार
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने पहिला डाव टाकला असून तब्बल १९५ उमेदवार जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणासीतून लढणार आहेत, अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची नावे आहेत. दोन माजी मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. 28 महिलांना यावेळी लोकसभेचं तिकीट देण्यात आल्याची घोषणाही भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केली आहे. भाजपने पहिल्या यादीत सोशल इंजिनिअरींगवर भर दिला आहे. भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराला यापूर्वीच सुरुवात केली आहे. विरोधकांच्या आघाडीचे जागा वाटप निश्चित होण्यापूर्वी उमेदवार जाहीर करून भाजपने खेळी खेळली आहे.
भाजपचे महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजंत पांडा आणि माध्यम प्रमूख अनिल बलोनी यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांची यादी आज घोषित करण्यात येत असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं. या यादीत एकूण 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांना तिकीट देण्यात आलं आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. मोदींना वाराणासीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अमित शाह हे गांधीनगरमधून लढणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अंदमान निकोबारमधून विष्णू पडारे, अरुणाचल प्रदेश वेस्टमधून किरण रिजीजू, अरुणाचल ईस्टमधून तापीर गांवता निवडणूक लढणार आहेत.
भाजपच्या पहिल्या यादीत विविध राज्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 26, मध्यप्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, केरळमधील 12, तेलंगनातील 9, आसाममधील 14, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 5, जम्मू-काश्मीरमधील दोन, उत्तराखंडमधील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन, गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी एका उमेदवाराचं नाव आहे.
आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्पातील सायकलचे वाटप
जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते विद्यार्थीनीना चारशे सायकलचे वाटप
सायकलीमुळे विद्यार्थीनींची शाळेत उपस्थिती वाढून मुलीच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे – गटशिक्षण अधिकारी अर्जून जाधव
परंडा प्रतिनिधी -आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतील दुसऱ्या टप्पातील गरजू चारशे विद्यार्थीनीना जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते दि.२ मार्च रोजी गटशिक्षण कार्यालय परंडा येथे सायकलीचे वाटप करण्यात आले.
आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नामुळे परंडा, भूम,वाशी या तीन तालुक्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना १००० सायकलीचे वाटप करण्यात येत आसुन यातील पहिल्या टप्प्यात २०० सायकलीचे २५ जानेवारी रोजी विद्यार्थीनीना आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते.
उर्वरित आठशे सायकली वाटपास प्रारंभ झाला असून दुसऱ्या टप्प्यात परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी शाळेतील ४०० गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटपाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे.
सदर सायकली मुळे शाळेत विद्यार्थिनींची उपस्थिती वाढून,मुलींच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस त्यांच्या चांगला परिणाम होणार असल्याचे गटशिक्षणा धिकारी अर्जुन जाधव यांनी बोलताना सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुके,पंचायत समितीचे मा.सभापती गौतम लटके, मा. नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर, जयदेव गोपणे,गुलाब शिंदे,विष्णू सांगडे,बालाजी नेटके,मोल नलावडे यांच्या सह पात्र शाळेचे मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख,पालक व लाभार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थिती होत्या.
एनव्हीपी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे पेमेंट १६ व्या दिवशी देण्याचे सातत्य ठेवून आदर्श निर्माण केला – खा. राजेनिंबाळकर
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) – तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. या कारखान्यास गळपासाठी ऊस दिलेल्या शेतकऱ्यांचे बील दर १६ व्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. तर ऊस तोडणी ठेकेदार व मजुर, कर्मचारी यांचे पेमेंट देखील नियमितपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम कारखाना सुरू केल्यापासून पहिल्या १६ व्या दिवसांपासून चालू केले आहे. ते बिल व पेमेंट देण्याचे सातत्य कायम ठेवून शेतकऱ्यांना भरोसा व विश्वास देण्याचे महत्त्वाचे काम करण्याबरोबरच इतर कारखान्यांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.१ मार्च रोजी केले.
धाराशिव तालुक्यातील जागजी शिवारामध्ये असलेल्या एनव्हीपी शुगर प्रा. लि., या कारखान्याने आजपर्यंत १ लाख १ टन उसाचे गाळप केले आहे. तर त्यापासून ३० किलो वजनाच्या ४ लाख ९१ हजार गुळ पावडर पोत्यांचे पूजन खा राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आप्पासाहेब पाटील, कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब उर्फ बालाजी पाटील, सी.ए. सचिन शिंदे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, राजाभाऊ देशमुख, अक्षय पाटील, प्रशासकीय अधिकारी सुनिल लोमटे, चिफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, मे.चिफ केमिस्ट बिक्कड, पॅन इन्चार्ज राजेंद्र शिंदे, नरसिंह मोरे, समाधान शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, एनव्हीपी शुगर कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख १ टन शेतकऱ्यांच्या उसाचे यशस्वी गाळप करण्याचे काम झाले आहे. त्याच्यामध्ये आनंदाची दुसरी गोष्ट अशी की ज्या शेतकऱ्यांनी ऊस गळपास घातला. त्या शेतकऱ्यांच्या उसाचे बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव या बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे. विशेष म्हणजे काल दि.२९ फेब्रुवारीपर्यंत जो
ऊस गाळप करण्यात आला. त्या उसाचे बिलाची रक्कम देखील संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या दिवशीच जमा झाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच पेमेंट देण्याचा देखील या कारखान्याने क्रम ठरविला असून प्रथम क्रम ऊस उत्पादक शेतकरी तर दुसरा क्रम ऊस तोडणी करणारे ठेकेदार व ऊस तोड मजूर तसेच तिसरा क्रम सर्व कामगारांचा ठेवला असून चौथा क्रम कारखानदाराचा असल्याचा त्यांनी सांगितले. यावेळी खा राजेनिंबाळकर यांनी कारखान्यातील वेगवेगळ्या प्लांटची प्रत्यक्ष पत्रकारांसमवेत पाहणी केली. यावेळी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्यासह जागजी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……………………………
२८ ऑक्टोबर २०२३ पासून कारखान्याचे गाळप सुरू केले असून आजपर्यंत १ लाख २ टन उसाचे गाळप या कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कारखान्यास गाळपासाठी दिलेल्या उसाचे बिल १६ व्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सातत्याने केले जात आहे. पहिल्यापासून शेतकऱ्यांना प्राधान्य दिले असून उसास २ हजार ८०० रुपये दर दिला असून शेतकऱ्यांनी देखील या कारखान्यास ऊस देऊन चांगले सहकार्य केले असल्याचे कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी सांगितले. तसेच २५ मार्चपर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. विशेष ज्या कालपर्यंत गळपासाठी ऊस दिलेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचे बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को- ऑफ सोसायटी लि., या बँकेमध्ये जमा करण्यात आले असून त्या बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी ती रक्कम उचलावी. तसेच शेतकऱ्यांनी देखील आपला ऊस या कारखान्यास गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले
रेल्वे मार्गाच्या भुसंपादनातील चुकीचे निवाडे दुरुस्त करुन सबंधितावर कारवाई करण्याची आमदार कैलास पाटील यांची महसुलमंत्र्यांकडे मागणी
धाराशिव – धाराशिव तुळजापुर-सोलापुर रेल्वे प्रकल्पा अंतर्गत मार्गातील भुसंपादनाचे चुकीचे निवाडे करणाऱ्या अधिकार्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच चुकीच्या पध्दतीने केलेले निवाडयाची दुरुस्ती करुन सुधारीत निवाडा करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे. यावर मंत्रीमहोदय त्यावर विभागीय आयुक्त यांना अहवाल देण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
धाराशिव-तुळजापुर-सोलापुर रेल्वे प्रकल्पासाठी बांधीत शेतकऱ्यांच्या (धाराशिव व तुळजापुर तालुक्यातील) गावाचे निवाडे जाहिर करण्यात आले आहेत. त्यात गावातील २०१८ ते २०२१ मधिल जमिन खरेदी विक्री व्यवहार ग्रहित धरताना फक्त उच्चतम रकमेचे व्यवहार हे अवाजवी दर व ४० गुंठयापेक्ष कमी या कारणामुळे वगळण्यात आले आहेत. वगळण्यात आलेले व्यवहार हे भुसंपादन अणि पुनर्वसन कायद्यामधील नियमांच्या तरतुदीचे उल्लंघन ठरत आहे.जमिनीचे सरासरी मुल्यांकन फारच कमी झाले असुन एकुण द्यायचा मावेजा जमिनीच्या चालु बाजार भावापेक्षा कितीतरी कमी झाला आहे. जाहीर केलेले अंतिम निवाडे यांच्यातील मोबदला व प्रारुप निवाडे यामध्ये बराच मोठी तफावत असुन परिणामी शेतकऱ्यांना मोबदला खुपच कमी मिळत आहे. या निवाडयामध्ये बागायत जमिनीस जिरायती जमिनीचे दर दिलेआहेत. जमिनीतील पाईपलाईन, विहिर, विंधन विहीर, फळबाग, पत्रा शेड यांचेही मुल्यांकन कमी केलेले आहे. या अन्यायकारक व बेकायदेशिर निवाडयाची चौकशी करावी, निवाडयामध्ये करण्यात आलेल्या गंभीर चुकांची दुरुस्ती करुन सुधारीत निवाडे करावेत अशी मागणी केली आहे. तसेच अशी बेकायदेशीर व चुकीचे निवाडे करणार्या अधिकार्यांना शासन होण्याची अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. यापुढेही जिल्ह्यातुन मोठे प्रकल्प तसेच मार्ग जाणार आहेत. त्यांच्यावर आताच कारवाईचा बडगा उगारला तर भविष्यात या यंत्रणेकडून अशी बेकायदेशीर प्रक्रीया होणार नाही त्यामुळे या अधिकार्यांचे तात्काळ निलंबन करावे अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी महसुलमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
बेछूट आरोप करायचे बंद करा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, टेबल लावून टक्केवारी गोळा करतानाचा व्हिडिओ योग्य वेळ आल्यावर दाखवू – सतिषकुमार सोमाणी
धाराशिव – भाजप आणि शिवसेनेतील(उबाठा)१७४ कोटींच्या विकासकामांच्या उद्घटनावरून सुरू झालेल्या आरोपांच्या फैरी अद्याप थांबलेल्या नाहीत त्याचा पुढचा अंक आज तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी यांनी केलेल्या टिकेवरून दिसून आला त्यालाही भाजपकडून लागलीच प्रत्युत्तर दिल्याने हा सिलसिला निवडणुका होईपर्यंत थांबणार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवर बेछूट आरोप करायचे बंद करा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा सतिषकुमार सोमाणी यांनी दिला. तसेच येत्या काळात योग्य वेळ आल्यानंतर टेबल लावून टक्केवारी गोळा करतानाचे व्हिडिओ देखील दाखवू असे सोमाणी यावेळी म्हणाले.
धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली डॉ.पद्मसिंह पाटील हे अब्जाधीश खासदारांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर आले, परंतु धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत तिसर्या क्रमांकावर आला. अशा कर्तृत्त्ववान नेत्याचे लांगूलचालन करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे करत आहेत. डॉ.पद्मसिंह पाटील यांनी धाराशिव येथे मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय स्वतःच्या संस्थेच्या घशात घातले. सुतगिरणी, कुकुट्टपालन उद्योगही बुडविले. हजारो बेरोजगारांचा रोजगार बुडवून विकासाची भाषा करणार्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जनाची नाही तरी मनाची लाज बाळगावी, त्यांच्या या कामाची कीव येत असल्याचेही सोमाणी म्हणाले.
सोमनाथ गुरव यांनी लावला तो व्हिडिओ
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी एका सभेत बोलताना आ. पाटील यांच्यावर टीका करताना मोठ्या आवेशात भाषण करताना फाईव फाईव वन वन या क्रमांकावरून खिल्ली उडवली होती. तोच व्हिडिओ सोमनाथ गुरव यांनी दाखवला. तसेच नगर पालिकेच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून धाराशिव शहरातील बायपास रोडवरील पर्यायी रस्ता व पथदिवे यासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला.
गोरगरिबांच्या हक्काचा रेशनाचा गहू व तांदूळ चोरीचे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांना तालुकाप्रमुख का केलं? आमदार,खासदारांनी उत्तर द्यावे- अभय इंगळे
गोरगरिब नागरिकांना पोटभर अन्न मिळावे यासाठी सरकारने दिलेला रेशनचा तांदूळ व गहू चोरून त्याची विक्री करण्याचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीला स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून राज्यभर ओळख असलेल्या राणा दादांवर बोलण्याचा अधिकार आहे का..? हे सगळं माहिती असताना सोमानींना तालुका प्रमुख करण्यामागे खासदार व आमदारांना नेमकं कोणाचं हित साधायचं होत याच त्यांनी उत्तर द्यावे असा घणाघात भाजपचे शहर अध्यक्ष अभय इंगळे यांनी केला आहे.
सोमाणी यांनी पत्र परिषदेत केलेल्या आरोपांना उत्तर देताना इंगळे यांनी त्यांच्यावर रेशनचा माल चोरीचे असलेल्या गुन्ह्याची उजळणी करून देऊन जोरदार प्रतिहल्ला केला आहे.अधिकारी,कंत्राटदार यांच्याकडून टक्केवारी घेणे ही तुमची संस्कृती आहे म्हणत इंगळे यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा सामान्य कार्यकर्ता तुम्हाला तुमची जागा दाखवेल अस म्हटले आहे.
पाच वर्षात धाराशिव शहरात भ्रष्ट कारभार केल्याने शहरातील नागरिकांचे होणाऱ्या हालअपेष्टाला तुमचे नेते जबाबदार असून तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्पांना एक रुपया आणू शकला नाहीत हे तुमचे कर्तृत्व सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे.तुमच्या नेत्यांनी कोणाकडून किती वसुली केली याची पुराव्यानिशी माहिती लवकरच जनतेसमोर आणली जाईल.
चालू तेरणा कारखाना बंद पाडणे, चालू जिल्हा बँक डबघाईला आणणे हे तुमच्या नेत्यांचे कार्य संबंध जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे.या पापात तुम्ही देखील भागीदार आहात.महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातील महत्वाचे सर्वच विषय मार्गि लागत आहेत,मोठ्या प्रमाणात सरकार निधी उपलब्ध करून देत आहे म्हणून तुमचा पोटशूळ उठला आहे हे सर्वश्रुत आहे.त्यामुळे इथून पुढे तोंड सांभाळून बोला अन्यथा तुमचे व तुमच्या नेत्यांचे काळे कारनामे लवकरच बाहेर काढले जातील असा इशारा अभय इंगळे यांनी दिला आहे.
श्रीराम सार्वजनिक वाचनालय भोंजा यांच्या वतीने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
परंडा प्रतिनिधी -भोंजा येथील श्रीराम सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून भोंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्याना वाचनालयाचे चालक कृष्णा मांजरे सर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिवजयंती निमित्त भोजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्याच्या विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या यात वकृत्व स्पर्धा,पाढे पाठांतर स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धा, शिवजयंती सजावट स्पर्धा या स्पर्धेत विजेत्यां विद्यार्थ्याना कृष्णा मांजरे सर यांच्या वतीने पॅड,कंपास,पेन्सिल,रजिस्टर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.पारितोशीक स्विकारल्या नंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मार्गदर्शन पुस्तकाचे उपस्थित पालकांना वाटप करण्यात आले.
यावेळी भोंजा ग्रामपंचायतीच्या सरपंच राणी समाधान कोळी,उपाध्यक्ष नवनाथ नेटके,बिरमल कोंडलकर,खंडू मोरे,हनुमंत जगताप,महादेव काशीद,बाळासाहेब नेटके, पल्लवी सावंत,रणजित नेटके, राजू सुतार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब घोगरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अधीकराव शेळवणे सर यांनी कले.कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षिका ज्योती माळी,राऊत मॅडम,सोमनाथ पवार परिश्रम घेतले.
उदघटना नंतरचे उद्घाटन,बारा वाजले तरी उद्घाटन नाही
धाराशिव – केंद्रीय मंत्र्यांनी एखाद्या कामाचे उद्घाटन केले असेल आणि नंतर त्याच कामाचे श्रेय घेण्यासाठी एखादे उद्घाटन करण्याचा प्रकार क्वचितच घडला असेल.
धाराशिव शहरात डी मार्ट जवळ राष्ट्रीय महामार्गावर अंडर पास मंजूर झाला त्याचे आणि इतर कामाचे असे १७४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लातूर येथून केले. मात्र शिवसेनेच्या वतीने आज पुन्हा याच कामाचे उद्घाटन करण्याचा घाट घालण्यात आला आहे मात्र बारा वाजले तरी देखील या कामाचे उद्घाटन करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि त्यांचे सहकारी न आल्याने परिसरातून बोलावलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना कालच्या कार्यक्रमाचे निमंत्रण होते, कार्यक्रम पत्रिकेवर त्यांचे नाव देखील होते मात्र शहरात असून देखील त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.
शिवसैनिक पुरवतात हट्ट
येणारी लोकसभा त्यापूर्वी सरकारने जनतेच्या मान्य केलेल्या मागण्या यावरून भाजप सरकारने मागणी मान्य केली मात्र याचे श्रेय भाजपाला मिळत आहेत या उद्विग्नेतून खासदारांच्या समर्थकांनी हा कार्यक्रम घेत हट्ट पूर्ण केल्याचे कार्यक्रम स्थळी बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाले तुतारी चिन्ह
मुंबई – राष्ट्रवादीतील फुटी नंतर अपेक्षित पणे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाले मात्र ज्यांनी पक्ष स्थापन केला त्या शरद पवार यांच्या पक्षाला कोणते चिन्ह मिळते याची उत्सुकता अनेकांना होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. पक्षाच्या वतीने फेसबुक वरील ऑफशियल पेजवर एक पोस्ट करत हे चिन्ह मिळाल्याचे सांगितले आहे.
पोस्ट मध्ये म्हटले आहे की,
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”

चक्काजाम करणाऱ्या ३४ जणांवर गुन्हा दाखल, जमावबंदी शस्त्रबंदीचे उल्लंघन

धाराशिव – छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू असलेल्या चक्काजाम करणाऱ्या सांजा येथील आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे नोंदवले आहेत.
-बाजीराव बप्पा सुर्यवंशी, रा. सांजा 2) ओम भुजंग सुर्यवंशी, 3)संतोष सुर्यवंशी, 4) अभिजीत काका सुर्यवंशी, 5) सतिश मोहिते, 6) संताजी सुर्यवंशी, 7) बालाजी बप्पा सुर्यवंशी, 8)विशाल मोन्या सुर्यवंशी, 9) सतिश बप्पा सुर्यवंशी, 10) सोहम सुर्यवंशी, 11) काका पाटील, 12) बाळू कदम, 13) सुनिल नाना सुर्यवंशी, 14) नंदु पाटील, 15) प्रशांत सुर्यवंशी, 16) प्रविण कदम, 17) बालाजी सुर्यवंशी, 18) अक्षय पौळे, 19) ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत, 20) धर्मराज आण्णासाहेब सुर्यवंशी, 21) सागर शेळके, 22) अजय सुर्यवंशी, 23) नागेश शिंदे, 24) जिवन जाधव सर्व रा. सांजा, 25) बलराज श्रीमंतराव रणदिवे, रा. म.गांधीनगर, 26) सत्यजित पडवळ, रा. शाहुनगर, 27) निखील जगताप रा. इंगळे गल्ली, 28) मनोज जाधव, रा. मेडसिंगा, 29) अमोल जाधव रा. कारी, 30) अक्षय अंकुश नाईकवाडी, रा कौडगाव, 31) धैर्यशिल बाळासाहेब सस्ते, रा. धाराशिव, 32 हनुमंत यादव, रा. गणेश नगर, 33) अविनाश खानापुरे रा. तांबरी विभाग, 34) व्यंकटेश पडिले रा. बालाजीनगर व इतर 30 ते 40 इसमांनी दि. 15.02.2024 रोजी 11.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे मराठा समाजाच्या आरक्षाणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येणारे जाणारे रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे करुन तसेच बैलांना डांबरी रस्त्यावर तिन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रुरतेने वागणुक देवून बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माध होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडून सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन सुरुच ठेवून मा. जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हनुमंत जालींदर म्हेत्रे, वय 36 पोलीस नाईक 1474 नेमणुक पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.18.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 341,283,188 भा.दं.वि.सं. सह म.पो.का. 119,135 सह कलम 11(1)(क) प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.