Home Blog Page 42

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिजाऊ गुरुकुल चा दबदबा

४३ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी(रिधोरे)
युवक कल्याण व क्रीडा संचालनालय,महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय,सोलापूर आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिजाऊ गुरुकुलच्या खेळाडूंनी कौशल्य दाखवत यश संपादन केले.या स्पर्धेतून गुरुकुलच्या एकूण ४३ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड झालेले खेळाडू: १४ वर्षे मुले: राज पवार,सोमनाथ लोकरे, श्रेयश राखुंडे,आर्यन सागर,वीर घाडगे,रोहन भोसले,आर्यन भोसले,सोमनाथ लोकरे, पृथ्वीराज घावटे,आर्यन सागर यांनी यश संपादन केले.
१७ वर्षे मुली गटात राजनंदनी घोलप,१७ वर्षीय मुले गटात गौरव धालगडे,आशिष धचडगे,रोहित मैदाड,हर्ष लोखंडे,रोहित लिमकर,सोहम जव्हेरी,ओम पाटील,रोहित लिमकर,गौरव धालगडे,अभिनव निकम,सोहम जव्हेरी,पृथ्वीराज हासवले,मयूर,सुयोग यादव,रोहित मैंदाड,रोहित मैंदाड,हर्ष लोखंडे हर्ष लोखंडे, गौरव धालगडे,गौरव धालगडे,अभिनव निकम,ओम पाटील,आशिष धबडगे, ओम पाटील, समर्थ ढोबळे,सिद्धेश्वर कारंडे,विनायक कदम,सिद्धेश्वर कारंडे,पृथ्वीराज बागल व सुयोग यादव,१९ वर्षीय मुली गटात वर्षा सोनटक्के,धनश्री सातपुते,वर्षा सोनटक्के,१९ वर्षीय मुले गटात स्वप्निल लोहार,शुभम खैरे, अजिंक्य गायकवाड,विघ्नेश गुरव, महेश चौरे,स्वप्नील लोहार,सुयोग यादव,अक्षय शेंबडे,समर्थ कोकाटे,साहिल केसरे,स्वप्निल लोहार,स्वप्निल लोहार,अक्षय शेंबडे व महेश चौरे,महेश चौरे, अक्षय शेंबडे,अक्षय शेंबडे व महेश चौरे,शिवम खैरे,सुमित लोंढे, महेश शिरगिरे यांनी यश संपादन केले.
या खेळाडूंचे क्रीडा मार्गदर्शक जे.बी.शिंदे,गणेश वडेकर, बालाजी जाधवर,अभिषेक कुणाल यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे यांच्या वतीने करण्यात आला.यावेळी सचिव वर्षाताई घाडगे,प्राचार्य संदेश कदम,प्रशासकीय अधिकारी किशोर कदम उपस्थित होते.

आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्सहात संपन्न

परंडा येथे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमास महिलांचा

परंडा (प्रतिनिधी) गौरी गणपती निमित्त खास लाडक्या बहिणींसाठी क्रांतीनाना मळेगावकर व सह्याद्री मळेगावकर प्रस्तुत खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून धनंजय सावंत मित्र परिवार परंडा,भुम,वाशी यांच्या वतीने दि.१३सप्टेंबर रोजी परंडा येथील राजवीरा लॉन्स येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाच्या माध्यमातुन महिलांना एक अगळे वेगळे व्यासपिठ मिळाले.यावेळी वेगवेगळे मनोरंजनात्मक खेळ महिलांसाठी घेण्यात आले. यावेळी संगिताच्या तालावर महीलांनी ठेका धरला होता. मोठ्या संख्येने महीला गाण्याच्या तालावर थिरकल्या होत्या.परंडा शहरात महीलांसाठी परंडा येथे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन सावंत यांच्या वतीने करण्यात आले होते.माहिलां साठी मनोरंजक कार्यक्रम परंडा शहरात प्रथम घेण्यात आल्या मुळे या कार्यक्रमाला परंडा शहरासह तालुक्यातील महीलांची मोठी गर्दी झाली होती.
या कार्यक्रमात पाच मोठया बक्षीसावेती रिक्त उपस्थित प्रत्येक महिलेस एक पैठणी भेट देण्यात आली.या प्रथम बक्षिस फ्रिजच्या शोभा सुर्यकांत सांगळे,व्दितीय बक्षिस एलईडी टीव्हीच्या मनिषा आमोल क्षिरसागर,तृतीय बक्षिस वॉशिंग मशीन निकीता मिलींद बनसाडे,चतुर्थ बक्षीस आटा चक्की वैष्णावी केतन भोसले, पाचवे बक्षिस शिलाई मशीन पारीतोशीकाच्या मानकरी आर्चना बालाजी गायकवाड ठरल्या आहेत.तर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमात सहभागी झालेल प्रत्येक महीलेला पैठणीसाडी भेट देण्यात आली.
या कार्यक्रमात परंडा शहरासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम यशस्विपार पाडण्यासाठी युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहूल डोके व त्याच्या सहकाऱ्यानी परिश्नम घेतले.

भैरवनाथ उद्योग समुहाच्या वतीने वाकडी येथे शेत रस्ता कामास प्रारंभ

परंडा (प्रतिनिधी) आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतुन व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली परंडा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याची कामे भैरवनाथ उद्योग समुहाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येत आहेत.
दि.१२ सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील वाकडी येथे शेतरस्ता कामास सुरुवात करण्यात आली.रस्ता परिसरातील शेतकऱ्यांना या रस्त्याची गरज होती.परंतु हा रस्ता शासकिय नियमात बसत नव्हता म्हणुन भैरवनाथ उद्योग समुहाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या सोईसाठी करूण देण्यात येत आहे.
वाकडी येथील शेतकऱ्यांनी शेत रस्त्याची मागणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या कडे केली होती, शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी कसल्याही प्रकारचा विलंब न लावता स्वखर्चातून या रस्ता कामास दि.१२ सप्टेंबर रोजी आपली यंत्रणा कामाला लावून रस्ता कामाला सुरुवात केली.सदरील रस्ता काम सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

परंडा येथे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन

परंडा (प्रतिनिधी)
गौरी गणपती निमित्त खास लाडक्या बहिणीं साठी सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत व बाल गायिका टिव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर प्रस्तुत खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय सावंत मित्र परिवार परंडा,भुम वाशी यांच्या वतीने दि१३सप्टेंबर रोजी परंडा येथील राजवीरा लॉन्स येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रथम बक्षिस फ्रिज,व्दितीय बक्षिस एलईडी टीव्ही,तृतीय बक्षिस वॉशिंग मशीन,चतुर्थ बक्षीस आटा चक्की,पाचवे बक्षिस शिलाई मशीन असे असणार आहे.तर या खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महीला भगिणीस आकर्षक साडी बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.
न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारे टिव्ही फेम बालगायिका सह्याद्री मळेगावकर व सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर हे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
तरी सदरील कार्यक्रमात परंडा,भुम,वाशी तालुक्यातील सर्व लाडक्या महीला भगिणीनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घेऊन शोभा वाढवावी अशी विनंती धनंजय सावंत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन, बस सेवेबाबत संभ्रम


धाराशिव – प्रलंबित मागण्यासाठी एस. टी. कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. उद्या पासून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे १४ संघटनाच्या एकत्रित कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी कर्मचारी कामावर जाणार की नाही याबाबत ठोस भूमिका अद्याप जाहीर केली नाही. मात्र या आंदोलनाच्या माध्यमातून कामावर न जाण्याचा काही कर्मचाऱ्यांचा पवित्रा असल्याने त्याचा बसेसवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

या आहेत मागण्या

राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे रा.प. कामगारांना वेतन देण्यात यावे.

२) महागाई भत्याची माहे जुलै, २०१८ ते जानेवारी, २०२४ या कालावधीची थकबाकी अद्याप रा.प. कामगारांना मिळोलली नाही. सदरची सर्व थकबाकी कामगारांना त्वरीत मिळणे आवश्यक आहे.

३) शासकीय कर्मचा-यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर रा.प. कामगारांना लागू करण्याची कामगार करारात तरतुद असतानाही त्यामध्ये प्रशासनाने घरभाडे भत्याचा दर ८,१६,२४ टक्क्याऐवजी ७,१४,२१ टक्के व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्याऐवजी २ टक्के असा एकतर्फी कमी करून कामगार कराराच्या तरतुदीचा भंग केलेला आहे. याबाबत रा.प. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने घरभाडे भत्याचा दर शासकीय दरानुसार ८,१६,२४ टक्के माहे ऑक्टोबर २०२१ पासून व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के माहे नोव्हेंबर २०२१ पासून रा.प. कामगारांना लागू केला. परंतु माहे एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२९ या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची व घरभाडे भत्याची थकबाकी रा.प. कामगारांना अ‌द्याप मिळालेली नाही ती त्वरीत देण्यात यावी.

४) सन २०१६-२०२० या कालावधीसाठी वेतनवाढीपोटी रु.४८४९ कोटी जाहिर केले. सदर रु.४८४९ कोटीचे पुर्ण वाटपही झालेले नाही. तरी रु.४८४९ कोटी मधील शिल्लक रक्कमेचे कामगारांना वाटप करण्यात यावे.

५) एस.टी. कामगारांचे वेतन इतर महामंडळाच्या तुलनेत कमी आहे ही बाब विचारात घेऊन शासनाने कामगारांच्या सेवा कालावधीनुसार त्यांच्या मूळ वेतनात माहे नोव्हेंबर २०२१ पासून अनुक्रमे रु.५०००/-, रु.४०००/- व रु.२५००/- वाढ करण्यात आली. परंतु अशी वाढ देताना सेवा जेष्ठ कामगारांच्या मूळ वेतनात मोठ्या प्रमाणात विसंगती निर्माण झालेल्या आहेत. सदरच्या विसंगती दूर करण्यासाठी सर्वच कामगारांना सरसकट रु.५०००/- लागू करण्यात यावेत.

६) सध्या एस.टी. कामगारांना लागू असलेल्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या योजने ऐवजी कॅशलेस योजना (इनडोर/आऊटडोर) एस.टी. कामगारांना लागू करण्यात यावी.

७) एस.टी. कामगारांना व त्यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या एस. टी. बसेस मध्ये मोफत पासची सवलत फरक न भरता लागू करण्यात यावी. तसेच सेवानिवृत्त एस.टी. कामगारांना ६ महिन्या ऐवजी १ वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या एस.टी. बसेस मध्ये उपलब्ध करून देण्यात यावा. अश्या मागण्या एस. टी. कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच निवेदनाद्वारे केल्या आहेत.

अवैध पिस्टल सह तीन आरोपीना अटक परंडा शहरातील घटना;परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परंडा ( प्रतिनिधी ) अवैध पिस्टल बाळगणाऱ्या परंडा शहरातील तिन तरुणांना विरोधात
परंडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीनीही आरोपीना अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिस निरिक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक कवीता मुसळे हे दि ३०ऑगष्ट रोजी रात्री गस्त घालत असताना माळी गल्ली परिसरात काही तरुणाने अवैध पिस्टल बाळगले असल्याची माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या अधारावर पोलिस पथकाने माळी गल्ली परिसरातून आरोपी ओंकार शंकर सुतार,ऋषीकेश तानाजी गायकवाड,शहाजी बाळू माळी सर्व राहणार परंडा यांना रात्री ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासणी केली असता आरोपी कडे अवैध पणे बाळगलेले पिस्टल पोलिसांना आढळून आले पिस्टल जप्त करून सर्व आरोपी विरूद्ध दि ३१ ऑगष्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीना ३१ ऑगष्ट रोजी परंडा न्यायालयात हजर केले असता तिन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे
पोलिस अधिक्षक संजय जाधव,अप्पर पोलिस अधिक्षक गौहर हसन,उपविभागीय पोलिस अधिकारी हिरेमठ यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास सपोनि कविता मुसळे करीत आहेत.

जोतिबाचीवाडी येथे श्रावण महोत्सवानिमित्त रविवारी विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले यांच्या किर्तनाचे आयोजन

ईट सोमेश्वर स्वामी:
भुम तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथे तिसऱ्या श्रावण रविवारच्या निमित्ताने विनोदाचार्य हभप पांडुरंग महाराज उगले यांच्या किर्तनाचे आयोजन दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जोतिबा मंदिर परिसरात करण्यात आले आहे.
किर्तनाच्या माध्यमातून जनमानसांत प्रबोधनाचा वारसा रुजवण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून जोतिबाचीवाडी येथील गावकऱ्यांच्या वतीने लोकवर्गणीतुन जोतिबाचीवाडी येथे श्रावण महोत्सवात
अखंड हरिनाम सप्ताह तसेच तिसऱ्या श्रावण रविवारी जोतिबा मंदिर परिसरात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
पंचक्रोशीतील हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात.
किर्तन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी ही जास्तीत जास्त भाविकांनी किर्तन सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जोतिबाचीवाडी भजनी मंडळ तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

बालाघाटच्या डोंगर रांगेत सौंदर्याने खुललेलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं ज्योतिबा मंदिर भाविकांना आकर्षित करत आहे.विलोभनीय निसर्गाचा आविष्कार लाभलेलं भुम तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथील हे जोतिबा मंदिर कोल्हापूरच्या जोतिबाच अधिष्ठान म्हणून ओळखले जाते.
चैत्र महिन्यात मोठ्या स्वरूपात जोतिबा याञा भरते तेव्हा मोठ्या प्रमाणात येथे भाविकांची गर्दी पहावयास मिळते.
या गावात मांसाहार करण्यास वर्ज आहे.
वारकरी संप्रदायाची संस्कृती जपणार आणि शुद्ध शाकाहारी गाव म्हणून या गावाची एक विशेष ओळख आहे.

गेली अनेक वर्षापासून श्रावण रविवार हा जोतिबाचीवाडी आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरत आहे बहरलेला निसर्ग आणि प्रबोधनात्मक विचारांची मांदीआळी या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. नोकरी, व्यवसायासाठी बाहेरगावी असलेले गावकरी श्रावण महोत्सवा निमित्ताने जोतिबा दरबारी एकत्रित येतात. अनेक अन्नदाते समाजाप्रती सामाजिक दायित्व भावनेतून अन्नदान करतात.
हजारो भाविक तिसरा श्रावण रविवारच्या सोहळ्यात आनंदाने सहभागी होतात.

लक्ष्मण जाधव
(जोतिबाचीवाडी)

श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालय हे CBSE दर्जा प्राप्त करणारे राज्यातील पहिले विद्यालय

धाराशिव :- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास केंद्रीय शिक्षा माध्यमिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी अभ्यासक्रम चालू करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे असा मानस होता. त्यासाठी त्यांनी स्वतः राज्य व केंद्र पातळीवरती विशेष प्रयत्न केल्याने CBSE बोर्डाची मान्यता मिळालेली आहे. राज्य शासनाच्या अनुदानित शाळेस CBSE अभ्यासक्रम चालू करणारी महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ठरली आहे.

महाराष्ट्रातील सैनिकी विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी सैन्य दलात दाखल व्हावेत व देशसेवा करावी, या उद्देशाने सन 1996 पासून सैनिकी शाळा सुरु झाल्या. तेव्हा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान या संस्थेस महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सुरु करण्याचा मान मिळाला होता. परंतु सदरील सैनिकी शाळामध्ये राज्य शासनाचा अभ्यासक्रम चालू असल्याने सैन्य दलामध्ये समाविष्ट होण्याचे प्रमाण कमी असल्याने डॉ.सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात CBSE अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला व विद्यालयामार्फत CBSE अभ्यासक्रम चालू करण्याकरीतेची प्रक्रिया सप्टेंबर 2023 पासून सुरु करण्यात आली. या मध्ये विद्यालयाने सर्व बाबींची पूर्तता केल्याने CBSE बोर्डाकडुन (दि.19ऑगस्ट) रोजी विद्यालयास मान्यता मिळाली आहे.

जिल्हाधिकारी यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे असा मानस होता. त्यासाठी त्यांनी स्वतः राज्य व केंद्र पातळीवरती विशेष प्रयत्न केल्याने CBSE बोर्डाची मान्यता मिळालेली आहे.

या साठी डॉ.सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचे फेटा बांधुन पुस्तक देऊन विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांनी सत्कार केला. त्याचबरोबर अरविंद बोळंगे तहसिलदार तथा विश्वस्त, श्रीमती माया माने तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचाही पुस्तक भेट देवून सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे CBSE अभ्यासक्रम सुरु झाल्याबद्दल अभिनंदन करुन मार्गदर्शन केले. CBSE अभ्यासक्रमाच्या प्रक्रियेमध्ये प्राध्यापक गणेश मोटे अभियांत्रिकी महाविद्यालय, व विद्यालयातील सहशिक्षक श्रीनिवास कदम, संगणक निदेशक श्रीमती ज्योती नाशे यांचा पुष्पगुच्छ देवुन जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच जिल्हाधिकारी महोदयांनी विद्यालयाचे प्राचार्यांना पेढा भरवुन विशेष अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या व त्याचबरोबर विद्यालयातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

दोन हजाराची लाच स्वीकारली कंत्राटी लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

धाराशिव – अडीच हजाराची लाच मागणी करून दोन हजार स्वीकारल्याने परांडा पंचायत समितीतील विकास विजयकुमार बनसोडे, वय-35 वर्षे, क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांचे भावाचे नावे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत मौजे सोनारी येथे शेत गट नंबर 92 मध्ये लागवड केलेल्या केळी या फळबागेचे 39,852/- रुपयाचे कुशल बिल ऑनलाईन अपलोड करण्यासाठी व तक्रारदार यांचे पुढील महिन्यात निघणारे दोन मस्टरचे बिल ऑनलाईन अपलोड करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 2500/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 2000/-रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून 2000/- हजार रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वतः स्विकारली असता आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे परंडा येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी म्हणून विकास राठोड पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले तर सापळा पथकात
पोलीस अमलदार इप्तिकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके, चालक -दत्तात्रेय करडे यांचा समावेश होता.

मागास भागात नाट्य चळवळ वाढीसाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत – नरेश गडेकर

धाराशिव – महाराष्ट्राच्या नाट्यभूमीला ऐतिहासिक वारसा आणि परंपरा आहे.महाराष्ट्रात नाट्य चळवळ ही मोठ्या शहरातच अधिक वाढत आहे. मागास भागात नाट्य चळवळ, नाट्यगृह,आणि नाट्य रसिक वाढीसाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत  असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष  नरेश गडेकर यांनी केले.

ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक महोत्सवात बोलत होते. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रविवार, 18 ऑगस्ट रोजी समारोप  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करून व सिने अभिनेते दिवंगत विजय कदम यांना श्रध्दांजली वाहून उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष धनंजय शिंगाडे,नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे, दादा साळुंके, सुमित फुलमागडे, माजी  नियामक मंडळ सदस्य घाणेकर सर, किरण फडके, सुशांत कुलकर्णी,उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवलेल्या सहभागी धाराशिव नाट्य परिषद शाखेच्या कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना गडेकर म्हणाले की, शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटक हे मनोरंजना सोबतच समाज प्रबोधनाचे काम ही मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक करताना स्वागताध्यक्ष धनंजय (नाना)शिंगाडे म्हणाले की,97 वे अखिल भारतीय मराठी  नाट्य संमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले. मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये नाट्य चळवळ वाढत आहे. जिल्ह्यातील कलावंतांना वाव  मिळत आहे.परंतु शहरात अधिक नाटक व्हावेत यासाठी नाट्य शाखा प्रयत्न करीत आहे.  धाराशिव शहरामध्ये नाट्य परिषदेसाठी जागा शासनाने द्यावी अशी मागणी यावेळी शिंगाडे यांनी केली.

या कार्यक्रमाचे विशाल शिंगाडे यांनी तर आभार सतीश ओहळ  यांनी मानले.यावेळी शहरातील नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी  अर्चना टिळक, सुगत सोनवणे,सागर चव्हाण उपाध्यक्ष (उपक्रम),शरणम शिंगाडे सल्लागार राजेंद्र अत्रे, डॉ. अभय शहापूरकर, सदस्य धनंजय कुलकर्णी, दयानंद साबळे, सुरेश देवकुळे, प्रमोद जोगदंड, श्रीकांत साठे, अर्जुन धावारे, विशाल टोले, भैरू कदम,प्रसेनजित शिंगाडे, ताहेर शेख, दिग्विजय शिंगाडे, शुभम खोत, विजय उंबरे, सुमित शिंगाडे, विश्वनाथ काळे, सुमेध चिलवंत, ऋषीकेश गवळी, यशवंत शिंगाडे, संकेत नागणे, अक्षय दिवटे, सौरभ शिंगाडे, प्रविण सोनवणे, प्रसाद वाघमारे, प्रज्ञावंत ओहाळ, प्रशांत कांबळे, सारिपुत शिंगाडे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

यावेळी झाडीपट्टी तील गद्दार हे नाटक सादर करण्यात आले.  या नाटकाचे लेखक- आनंद भिमटे, दिग्दर्शक नरेश गडेकर,  निर्माता नितू बुध्दे पाटील, नेपथ्य प्रमोद ढोंगे,संगीत राकेश राऊत यांनी दिले आहे.या नाटकातआसावरी तिडके,  सुनिल अष्टकर,अरविंद झाडे, रत्नदीप रंगारी,  शुभम मसराम, चैतन्य दुबे, सोनाली निस्ताने,या कलाकारांनी अभिनय केला.