पाडोळी/ बातमीदार
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथे (दि६) तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या आग्रहाखातर तुळजाभवानी मातेची आरती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते आदित्य गोरे यांनी हजेरी लावली होती, यावेळी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये गोरे यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आ. मधुकर देवराव चव्हाण यांना सर्व मतभेद विसरून आघाडी धर्म पळून सर्वाधिक मतांनी विजयी करण्याचे आव्हान केले आहे. त्याच बरोबर काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देने अपेक्षित आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बूथ निहाय काम करावे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (आय)च्या कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद विसरून, अंग झटकून शक्य होईल तेवढी लीड आघाडीचे उमेदवार यांना द्यावी असे आव्हान केले.
यावेळी तुळजाभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आदित्य गोरे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ओबीसी तालुकाध्यक्ष प्रशांत सोनटक्के, भारत सोनटक्के, शिवशांत काकडे, शहाजहान पठाण, हरिराम खटके, तंटामुक्तीचे अध्यक्ष काकासाहेब सोनटक्के, सुरज लातुरे,श्रीधर नरवडे, व्यंकट लोखंडे, दत्ता शिंदे,लहू मोरे,अमोल सूर्यवंशी, रवी मोरे,महेश नरवडे,अमोल मोरे,बिलाल शेख, नंदकिशोर हजारे, बळीराम खटके, पशुमिया शेख,जुबेर पठाण, दयानंद सोनटक्के, पिंटू खटके, संदीप सोनटक्के, नितीन खटके यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळावा- आदित्य गोरे
निवडून आल्यानंतर पाच वर्षात उजनीचे २१ टीएमसी पैकी ७ टीएमसी पाणी जिल्ह्यात आणले नाही तर राजकारण सोडून देईन-राणाजगजितसिंह पाटील
शासनासोबत २७ कोटीची फसवणूक; वैष्णोदेवी फूडच्या अध्यक्षांसह इतरांवर गुन्हा दाखल
नळदुर्ग (लतीफ मामा शेख):- नियंत्रण अधिकारी व शासनाच्या प्रतिनिधी यांच्या परस्पर शासनाच्या मालकीची मलाई विरहित दूध भुकटी व देशी कुकिंग बटरची विक्री करून 27 कोटी 19 लाख 70 हजार 561 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव पोस्ट ईटकळ येथील वैष्णोदेवी फूड प्रॉडक्ट लिमिटेड च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकासह दोन वरिष्ठ महा व्यवस्थापकांसह करणाऱ्या इतर लोकांविरोधात 4 ऑक्टोबर रोजी नळदर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाणे कडून मिळालेली माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील वैष्णोदेवी फूड प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे समीर गोविंदा काकांनी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक रा. सोलापूर, विजय विश्वनाथ मुळे वरिष्ठ महा व्यवस्थापक रा. सोलापूर, सदर फसवेगिरी मध्ये सदर प्रकल्पाचे आर्थिक व्यवहार व रेकॉर्ड सांभाळणारे श्रीकांत जोशी वरिष्ठ महाव्यवस्थापक (प्रशासन) रा पुणे व या तिघांना सहाय्य करणाऱ्या इतर लोकांनी शासनाच्या मालकीची मलाई विरहित दूध भुकटी 610.791 मे टन व देशी कुकिंग वॉटर 452.616 मे टन असा एकूण 27 कोटी 19 लाख 70 हजार 561 रुपयांचा माल 5 -9 -2018 रोजी रात्री 8 ते 21- 8- 2019 रोजी 3 वाजण्याच्या दरम्यान आरोपींनी संगणमत करून नियंत्रण अधिकारी व शासनाचे प्रतिनिधी यांच्या परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी प्रशांत प्रभाकर मोहोड रा. औरंगाबाद यांनी 4 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांसह इतर आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 288/ 2019 कलम 420, 406, 407 ,34 भादवी प्रमाणे दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांच्या आदेशानुसार तपास अंजुम शेख पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा उस्मानाबाद हे करीत आहेत.
किल्ला लढवला निष्ठावंतांनी उमेदवारी मिळाली विरोधकाला!
उस्मानाबाद- एकेकाळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा उस्मानाबाद जिल्हा आता बालेकिल्ला राहिला नाही. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी शिल्लक राहते कि नाही अशी अवस्था होती मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः सभा घेऊन पक्षाचे डॅमेज कंट्रोल केले. अनेकांनी पक्षात नेतृत्वाची संधी मिळेल या आशेवर पक्ष बदलला नाही. मात्र विधानसभेची उमेदवारी संजय निंबाळकर यांना जाहीर झाल्यानंतर पक्षातील खदखद बाहेर आली. पक्षात अनेकजण इच्छुक असताना भाजप- शिवसेना असा प्रवास करून आलेल्या निंबाळकरांना प्रवेश देऊन उमेदवारी दिल्याने अनेकांना धक्का बसला आणि निष्ठावंतांच्या पायाखालची वाळू सरकली. राष्ट्रवादीचे अनेक नेते उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थितीत नसल्याने तसेच खुद्द पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केलेल्या सुरेश पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने राष्ट्रवादी नाराजांची मनधरणी कशी करते ते पाहावे लागेल.
पवारांचा तो शब्द कोणी डावलला?
मी आता युवकांना संधी देणार आहे असा शब्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर सभेत दिला होता. पक्षात उमेदवारीसाठी अनेक युवक इच्छुक असताना साठीत असलेल्या संजय निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने पक्षाध्यक्षांचा तो शब्द कोणी डावलला असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्ते विचारत आहेत.
राणाजगजितसिंह पाटील यांचा ट्रॅक क्लीअर!
राणाजगजितसिंह पाटील यांचा ट्रॅक क्लीअर!
देवानंद रोचकरींचा मिळाला पाठींबा!!
तुळजापूर –
भाजपा नेते देवानंद रोचकरी यांनी आज कार्यकर्ता मेळावा घेऊन महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
गेल्या तिन विधानसभा निवडणुकत रोचकरी यांनी लक्षणीय मतदान घेतले होते. 30 हजाराचा टप्पा ते कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर घेतात हा आजवरचा अनुभव आहे. यंदा तेही पक्षाकडुन इच्छुक होते. भाजपची उमेदवारी पाटील यांना मिळाल्यानंतर ते बंडखोरी करतील असा अंदाज वर्तवला जात होता मात्र त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचेच काम करणार असल्याचे सांगीतल्यानंतर भाजप समोरची अडचण कमी झाली आहे.
वंचितचि उमेदवारी जगदाळेंना, तुळजापूर मतदारसंघात चुरस वाढणार!
उस्मानाबाद – वंचित बहुजन आघाडीची तुळजापूर मतदारसंघाची उमेदवारी अशोक जगदाळेंना जाहीर झाली आहे. यांनतर तुळजापूर मतदार संघात तंगडी फाईट होणार हे आता नक्की आहे. भाजपची उमेदवारी राणाजगजितसिंह पाटील याना जाहीर झाल्यानंतर अशोक जगदाळे वंचित आघाडीकडे गेले होते. अनेक मिन्नतवाऱ्या करून त्यांनी हि उमेदवारी मिळवल्याचे चर्चा आहे. वंचितकडून या पूर्वी गणेश सोनटक्के, महेंद्र धुरगुडे यांनी मुलाखती दिल्या होत्या दोघांपैकी एकास उमेदवारी मिळणार हे निश्चित असताना वेगळीच ‘दाळ’ शिजल्याने त्यांचा पत्ता कट झाला. धुरगुडे आणि सोनटक्के यांचे राजकारण चव्हाण विरोधी राहिले आहे ते आता नेमकी काय भूमिका घेतात हे आता पहावे लागणार आहे.
सिंह एकला ! तुळजापूर मतदारसंघात होणार रोमांचक लढत!!
उस्मानाबाद जिल्ह्याचे राजकारण नेहमी व्यक्तीविरोधी राहीले आहे एव्हाना ते परिवार विरोधी राहीले आहे. ज्या काळात उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे विकासाची कामे पदरात पाडून घेत होती त्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. नुकसान मात्र जिल्ह्याचे झाले. मंत्री असताना देखिल भावनिकतेच्या लाटेचा फटका बसल्याने हाती असलेला कौडगाव एम.आय.डी.सी.चा प्रकल्प रखडला गेला त्या कालावधीत जिल्ह्याकडे मधुकरराव चव्हाण यांच्या रूपाने पालकमंत्री पद असतानाही फाईल पुढे सरकली नाही. २०१४ च्या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी परत विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मित्रपक्ष असलेली काँग्रेस सोयिस्कर रित्या सेनेला सोबत घेत सत्ता उपभोगत होती. पाटील परिवार विरूद्ध इतर सर्व असे समीकरण जिल्ह्याने वेळोवेळी पाहीले. ३ वर्षापूर्वी झालेल्या नगरपालिका आणि त्यानंतर झालेल्या जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी विरोधकांना धूळ चारली आणि स्वतःची ताकद सिद्ध केली.
येत्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघापैकी तिन मतदारसंघ उस्मानाबाद, भूम, उमरगा हे शिवसेनेकडे तर एकमेव तुळजापूर हा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपने ही जबाबदारी राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे देण्यामागे जिल्ह्याच्या दृष्टीने चांगली कारणे असू शकतात. आजवर हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. एखादा गड ताब्यात घ्यायचा असेल तर त्यासाठी सिंहाची ताकद असलेला व्यक्ती लागतो असा इतिहास आहे. तुळजापूर तालुक्यात गेल्या पाच वर्षांत भाजपची वाढलेली ताकद पहाता पाटील विरूद्ध चव्हाण ही लढत रोमांचक होणार आहे.
राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापूर मतदार संघातून उमेदवारी!
उस्मानाबाद – माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपने तुळजापूर मतदार संघाततून उमेदवारी दिली असून या मतदारसंघात पाटील विरूद्ध चव्हाण असा सामना रंगणार आहे. राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती मात्र उस्मानाबाद च्या जागा शिवसेनेकडे कायम ठेवण्यात आली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावे तुळजापूर मतदारसंघात आहेत. खुद्द राणाजगजितसिंह पाटील यांचे तेर हे गावही याच मतदारसंघात असल्याने ‘आयात उमेदवार’ दिला अश्या चर्चांना आता विराम मिळाला आहे. दोन माजी मंत्र्यामधे आता काट्याची टक्कर होणार आहे. तर वंचित आघाडी कोणाला उमेदवारी देणार याकडे लोकांच्या नजरा आहेत.
उस्मानाबादेत तृतीयपंथीयांसाठी बनले पहीले स्वच्छतागृह
स्वच्छतागृह म्हटले की, स्त्रीयांसाठी वेगळे आणि पुरूषांसाठी वेगळे असे दोन प्रकार आहेत. मात्र तृतीयपंथीयांसाठी वेगळे स्वच्छतागृह बांधण्याची ही पहीलीच वेळ आहे. भारतात तृतीयपंथीयांसाठीचे पहीले स्वच्छतागृह २ ऑक्टोबर २०१७ साली भोपाळ येथे बांधण्यात आले होते.
उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातील कोणत्याच शासकीय कार्यालयाच्या आवारात तृतीयपंथीयांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही मात्र न्यायालयात ही सोय झाल्याने तृतीयपंथीयांसाठी एका अर्थाने ‘सामाजिक न्याय’ मिळाल्याची भावना आहे. मात्र अद्याप हे स्वच्छतागृह वापरासाठी खुले करण्यात आले नाही.
वीर भगतसिंह – आजच्या तरुणांचे क्रांतिकारी प्रेरणास्थान
वीर भगतसिंह यांचे नाव आजतागायत शहीद झालेल्या क्रांतिकारकांमध्ये सर्वात प्रमुख म्हणून अग्रगण्याने घेतले जाते. भगतसिंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब मधील लायलपूर जिल्ह्यातील बंगा नामक गावात झाला होता. बंगा हे गाव सद्यस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये आहे. भगतसिंह हे शिख कुटुंबात जन्माला आले होते. ज्याचा अनुकूल प्रभाव त्यांच्यावर तो झाला होता. भगतसिंह यांच्या वडिलांचे नाव किशनसिंह तर आईचे नाव विद्यावती कौर होते. या शिख कुटुंबावरती आर्य समाजाच्या विचारांचा प्रभाव होता. यांचे कुटुंबावर आर्य समाज व महर्षी दयानंद यांच्या विचारधारेचा जास्त प्रभाव होता. भगतसिंहांच्या जन्मावेळी त्यांचे वडील सरदार किशनसिंग तसेच त्यांचे दोन चुलते अजित सिंह व स्वर्णसिंह हे इंग्रजांशी लढत असल्याने तुरूंगात होते. ज्या दिवशी भगतसिंहाचा जन्म झाला त्या दिवशी त्यांचे वडिल व काका या दोघांनाही जेलमधून सोडण्यात आलं होतं. भगतसिंहांच्या जन्मादिवशी वडील व काकांना तुरुंगातून सोडल्यामुळे त्यांच्या घरातील आनंद हा द्विगुणित झाला होता. भगतसिंहांच्या जन्मानंतर त्यांच्या आजीने त्यांचे नाव भाग्यवाला असे ठेवले होते याचा अर्थ चांगल्या नशीबचा होय. भाग्यवाला वरुन काही दिवसानंतर भगतसिंह या नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले. भगतसिंह वयाच्या 14 व्या वर्षापासूनच पंजाब मधील क्रांतीकारी संघटनांमध्ये काम करायला लागले होते शाळेमधून त्यांनी नवीच शिक्षण पूर्ण केलं.
1923 मध्ये दहावीची परीक्षा पास झाले त्यानंतर त्यांना लग्नामध्ये अडकवण्यासाठी घरातून तयारी सुरू झाली असता भगतसिंह घर सोडून लाहोरला पळून आले पुढे ते कानपूर मध्ये गेले. ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षात इतके गुंतले की त्यांनी स्वतःचं जीवन हे देशासाठी समर्पित केले होते. भगतसिंहानी स्वातंत्र्यासाठी शक्तिशाली असणाऱ्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात दाखवलं जे कर्तुत्व दाखवले ते आजच्या युवकांसाठी अत्यंत मोठा आदर्शवत प्रेरणादायी आहे. भगतसिंह यांना हिंदी, उर्दू, पंजाबी तसेच इंग्रजी व बंगला या भाषा येत असत. यातल्या काही भाषा त्यांचे मित्र बटुकेश्वर दत्त यांनी शिकवली होती. जेलमध्ये असताना त्यांनी लिहिलेल्या अनेक लेख तसेच पत्रांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा अंदाज लावता येऊ शकतो. त्यांच्या लिखाणातून त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये भाषा, जात आणि धर्म त्यामुळे आलेल्या भेदभावावर दुख व्यक्त केले आहे. त्यांनी कोणताही समाज हा कमजोर का असतो याचे छान लेखन केले आहे. इंग्रजांनी देशातील लोकांवर जितका अत्याचार केला नसेल त्यापेक्षा जास्त वैचारीक त्रास तत्कालीन धर्म पंडीतांनी दिला होता. भगतसिंहाना इतकं ठाऊक होतं की आपण आज देशासाठीचे योगदान देत आहोत त्यामध्ये जर मी देशासाठी शहीद झालो तर भारतातील जनसामान्य लोक हे आणखीन उग्र होऊन जातील व देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकजुटीने लढतील. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे स्वातंत्र्य शक्य नाही म्हणून यासाठीच त्यांनी स्वतःला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा माफीनामा लिहून देण्यास नकार दिला होता.
अमृतसर मध्ये 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाचा भगतसिंह यांच्या विचारांवर इतका मोठा प्रभाव झाला की लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये घेत असलेले शिक्षण सोडून दिले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी नौजवान भारत सभाची स्थापना केली. काकोरी हत्याकांडामध्ये रामप्रसाद बिस्मिलसह चार क्रांतिकारकांना फाशी व इतर सोळा जणांना तुरुंगवासाची शिक्षा दिल्यानंतर भगतसिंह इतके हतबल झाले की त्यांनी चंद्रशेखर आझाद यांची पार्टी असणाऱ्या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे नामांतर करीत त्यांनी एक नवीन नाव त्या संस्थेला दिलं त्याचं नाव होतं हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचा उद्देश सेवा, त्याग व त्रास सहन करू शकणारे नवयुवक तयार करणे. त्यानंतर भगतसिंह, राजगुरु सोबत मिळून 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक असणाऱ्या इंग्रज अधिकारी जे.पी. सॉंडर्सला गोळ्या घातल्या. ह्या कारवाईमुळे क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांनीही त्यांना पूर्ण सहकार्य केले. त्यानंतर भगतसिंह यांनी आपले क्रांतिकारी सहकारी बटुकेश्वर दत्त यांच्याशी मिळून दिल्लीमध्ये असणारे अलीपूर रोड येथे ब्रिटिश भारत मध्ये तत्कालीन असणाऱ्या सेंट्रल असेंबली मधील सभागृहांमत 8 एप्रिल 1919 रोजी इंग्रज सरकारला जागे करण्यासाठी बॉम्ब तसेच काही पत्रके फेकले. बॉम्ब फेकल्यानंतर त्याच ठिकाणी दोघांनी आपली अटक करून घेतली त्यानंतर “लाहोर कट” या गुन्ह्यांमध्ये भगतसिंह आणि त्यांचे दोन सहकारी असणारे राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. अनेक इतिहास अभ्यासकांच्या माध्यमातून सांगण्यात येते की भगतसिंह व त्यांचे दोन सहकारी असणाऱ्या राजगुरू व सुखदेव यांची फाशी 24 मार्च रोजी सकाळी देण्याचे नियोजित होते परंतु भारतीय लोकांचा या तिघांवरती असलेल्या सकारात्मक विचारांच्या प्रभावामुळे इंग्रज सरकारने घाबरून 23 व 24 मार्चच्या मध्यरात्रीच ह्या तीन वीर क्रांतीकारकांना फाशी देऊन त्यांच्या मृतदेहाला सतलज नदीच्याकाठी अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांच्या चिता पेटवून देण्यात आल्या. भगतसिंह यांचं त्यावेळेसच वय म्हणजे आयुष्य अवघं 23 वर्ष 5 महिने आणि 23 दिवसाचे होते आणि विशेष करून त्या दिवशी तारीख 23 मार्च हीच होती. फाशीची शिक्षा होण्याच्या अगोदर भगतसिंहाने इंग्रज सरकारला एक पत्रही लिहिले होते ज्यामध्ये भगतसिंह म्हणतात की भारतीय लोक हे युद्धाचे एक प्रतीक आहे. मी माफी मागणार नसुन मला फाशी देण्याच्या ऐवजी गोळी घालून मारलं तरी चालेल. परंतु असं झाले नाही भगतसिंहांच्या शहीद होण्याने भारतीय देशाला केवळ स्वातंत्र्य नाही मिळाले तर संघर्षाची गतीसुद्धा नवयुवकांमध्ये प्रेरणा स्थान बनलेला आहे ते देशासाठी व सर्व शहिदांसाठी ताईत बनले होते. त्यांच्या जीवनावर आधारित अनेक हिंदी चित्रपट सुद्धा बनलेली आहेत ज्यामध्ये द लिजेंड ऑफ भगतसिंह, शहीद, शहीद भगतसिंह आजही संपूर्ण देश त्यांच्या बलिदानासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गंभीरतेने सन्मान पूर्ण आठवण करतो. भारत आणि पाकिस्तानच्या लोकांमध्ये भगतसिंहांना “आजादी के दीवाने” या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. पाकीस्तानमध्येसुध्दा भगतसिंहांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. ज्यांनी आपले संपूर्ण तारुण्य व संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले होते. अशा वीर भगतसिंह यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या क्रांतीकारी कार्यास उत्तुंग विचारांचा अभेद्य सलाम…!!
मोहन जाधव – ९६८९८३३७२८.
(लेखक हे इतिहास अभ्यासक असुन वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत)











