अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे- गजानन सुसर
उस्मानाबाद :-
शिक्षण हे समाजोन्नतीचे सर्वोत्तम साधन असून शिक्षणामूळेच अल्पसंख्याक समाजातील जालना जिल्हयातील रिक्षा चालकाचा मूलगा अन्सार शेख हा आय.ए.एस. होऊ शकला. त्यामूळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे असे उदगार जिल्हा परिषद उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी (माध्य) गजानन सुसर यांनी काढले. ते अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्रा) सविता भोसले, उपशिक्षणाधिकारी (माध्य) रत्नमाला गायकवाड, ऋषिकेश पिंपळे अधिक्षक, पंचायत विभाग, बालाजी मरे, सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्र उस्मानाबाद महेश ढवळशंख, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग यांनी अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांची माहिती दिली.
तसेच सिटी प्राईड इंग्लीश स्कूलचे संस्थापक शब्बीर सय्यद यांनी अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक जनजागृतीसाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे जाहिर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान पर्यवेक्षक तारेख काझी, मीर एजाज अली, मोमीन परवेझ व खाजगी उर्दू शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
श्वानाने काढला माग, १२ तासात गुन्हा उघडकीस
उस्मानाबाद – गुन्ह्याचा तपास करताना श्वान किती महत्वाचे असतात याचा प्रत्यय उस्मानाबाद मध्ये आला. याबाबत हकीकत अशी की, संतोष धुमाळ रा. उंडेगाव ता. परंडा यांच्या घरी ता. १५ रोजी दुपारी दीडच्या सुमारास चोरी झाली. धुमाळ शेतातून घराकडे येत असताना अज्ञात इसम घरातून पळ काढत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी लागलीच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो फरार झाला. त्यानंतर धुमाळ यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातून घरातील ऐवज आणि पैसे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी अंबी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली. या चोरीचा तपास करण्यासाठी आंबी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले.श्वान पथक रात्री ११ वा घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी संशयित आरोपीची व चप्पल मिळून आली असल्याने डॉग हँडलर ढोणे आणि कोरडे यांनी श्वान प्लूटो यास दिला असता श्वान प्लूटो अंदाजे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरोपीच्या घरापर्यंत पोहोचला आणि गुन्हा उघडकीस आणला.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सर्वाना सहभागी करुन घेतले – मकरंद राजेनिंबाळकर
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उस्मानाबाद शहरात स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून भित्तीचित्र स्पर्धा घेण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण केवळ नगरपालिकेपुरते मर्यादीत न रहाता सर्व समाज घटकांना सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले.
२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भित्तीचित्र स्पर्ध्येचे बक्षीस वितरण सोहळा आज शहराचे विद्यमान नगराध्यक्ष यांच्या ऑफिसमध्ये संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष निंबाळकर बोलत होते. सदर स्पर्धेचे आयोजन उस्मानाबाद नगरपालिका आणि ग्रीनी संस्थे मार्फत करण्यात आले आहे. ग्रीनी द ग्रेट पर्यावरणीय जीवनशैलीचा कृतीशील प्रचार करणारी व्यावसायिक संस्था असून उस्मानाबाद नगरपरिषदेने घनकचरा वर्गीकरणा संदर्भात सर्वेक्षण, जनजागृती आणि पाठपुरावा करण्यासाठी संस्थेची नेमणूक केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत ग्रीनी टीम द्वारे शहरात घनकचरा विषयी जनजागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रम शहरात घेतले जातात.
भित्तीचित्र स्पर्द्येसाठी शहरातील शाळा विद्यालयातील एकूण ४० विद्यार्थांनी या स्पर्द्येत सहभाग घेतला होता. या स्पर्ध्येत सहभागी स्पर्धकांनी आकर्षक असे संदेश देणारे चित्र काढली होती, त्यात परीक्षकांना मार्फत निवडलेल्या चित्रांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन विद्यार्थांना सन्मानित करण्यात आले.
ग्रीनी द ग्रेट चे प्रकल्प व्यवस्थापक अमोल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच पुढे घेण्यात येणार्या भित्तीचित्र स्पर्ध्येत जास्तीत जास्त विद्यार्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
छत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भित्तीचित्र स्पर्ध्येदरम्यान आलेले अनुभव मांडले व नागराध्य यांच्याकडे अशा प्रकारचे कार्यक्रम पुढेही व्हावे अशी विनंती केली.
कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, स्वप्नील चव्हाण, आरोग्य निरीक्षक – कांबळे , सिटी कॉर्डिनेटर पडवळ सर, रोटरी क्लब चे सुधाकर भोसले, क्रीडाई चे प्रदीप मुंढे, अजय सुर्यवंशी, पवार, गरड. जी.जी, भुतेकर आर. जी. नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रीनी टीम उपस्थित होती































































