अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे- गजानन सुसर
उस्मानाबाद :-
शिक्षण हे समाजोन्नतीचे सर्वोत्तम साधन असून शिक्षणामूळेच अल्पसंख्याक समाजातील जालना जिल्हयातील रिक्षा चालकाचा मूलगा अन्सार शेख हा आय.ए.एस. होऊ शकला. त्यामूळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे असे उदगार जिल्हा परिषद उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी (माध्य) गजानन सुसर यांनी काढले. ते अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्रा) सविता भोसले, उपशिक्षणाधिकारी (माध्य) रत्नमाला गायकवाड, ऋषिकेश पिंपळे अधिक्षक, पंचायत विभाग, बालाजी मरे, सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्र उस्मानाबाद महेश ढवळशंख, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग यांनी अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांची माहिती दिली.
तसेच सिटी प्राईड इंग्लीश स्कूलचे संस्थापक शब्बीर सय्यद यांनी अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक जनजागृतीसाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे जाहिर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान पर्यवेक्षक तारेख काझी, मीर एजाज अली, मोमीन परवेझ व खाजगी उर्दू शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
श्वानाने काढला माग, १२ तासात गुन्हा उघडकीस
उस्मानाबाद – गुन्ह्याचा तपास करताना श्वान किती महत्वाचे असतात याचा प्रत्यय उस्मानाबाद मध्ये आला. याबाबत हकीकत अशी की, संतोष धुमाळ रा. उंडेगाव ता. परंडा यांच्या घरी ता. १५ रोजी दुपारी दीडच्या सुमारास चोरी झाली. धुमाळ शेतातून घराकडे येत असताना अज्ञात इसम घरातून पळ काढत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी लागलीच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो फरार झाला. त्यानंतर धुमाळ यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातून घरातील ऐवज आणि पैसे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी अंबी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली. या चोरीचा तपास करण्यासाठी आंबी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले.श्वान पथक रात्री ११ वा घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी संशयित आरोपीची व चप्पल मिळून आली असल्याने डॉग हँडलर ढोणे आणि कोरडे यांनी श्वान प्लूटो यास दिला असता श्वान प्लूटो अंदाजे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरोपीच्या घरापर्यंत पोहोचला आणि गुन्हा उघडकीस आणला.

















































































