महागाईची साडेसाती ( अग्रलेख)
माणसाच्या आयुष्यात सारख्या वाईट घटना घडत असतील तर आपण त्याला साडेसाती लागलीय असे म्हणतो. मग त्यावर अनेक उपाय करण्याचा सल्लाही दिला जातो. साडेसाती असते की नाही हा संशोधनाचा विषय आहे. मात्र तरीही त्यावर उपाय केला जातो. देशातही अशीच काही अवस्था सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी अनेक औद्योगीक आणि आयटी ंकंपन्या बंद पडल्याच्या बातम्या आल्या. कोट्यावधी लोकांच्या नोकर्या गेल्याचे दाखले दिले गले मात्र तो निवडणुक प्रचाराचा मुद्दा आहे. असे भासवून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता भारताची अर्थव्यवस्था ही मंदीच्या सावटाखाली आहे. असे अनेक अर्थतज्ञ सांगत होते तरीही सत्ताधार्यांनी अर्थशास्त्रज्ञांच्या मताकडे दुर्लक्ष केले. मात्र गेल्या दोन दिवसांत महागाईचा दर ७.३७ टक्क्यावर असल्याचे समोर आले आहे. मात्र सत्ताधारी मंडळी आर्थिक दिवाळखोरीकडे दुर्लक्ष करण्यासाठी भावनीक राजकारण करत असल्याचे समोर येत आहे. देशातील ढासळती आर्थिक स्थिती पहाता याला आर्थीक स्थितीतील साडेसाती का म्हणू नये. केवळ कांदा महागला हे महागाईचे परिमापक होऊ शकत नाही. कांद्याचे भाव आता खाली येऊ लागले आहेत याचा अर्थ स्वस्ताई आली असा होत नाही. इंधनाचे दर चंद्रकोरीप्रमाणे वाढत आहे. स्टेटबँकेच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात काही लाख तरुणांच्या नोकर्या गेल्या आहेत. वाहन, घरबांघणी, वस्तु उत्पादन यासारखे अनेक उद्योग घायकुतीला आले आहेत. देशात नव्याने आर्थिक गुतवणुक होताना दिसत नाही. त्यामुळे नविन रोजगार निर्मीती ठप्प आहे. आणि त्यात महागाईचा हा समोर आलेला दर आणि जागतीक पातळीवर रुपयाचे होणारे अवमुल्यन. अश्या अनेक संकटात देशाची आर्थव्यवस्था वाटचाल करत आहे. काही दिवसात देशाचा अर्थसंकल्प सादर होईल त्यात काही तरी ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. या सर्व परिस्थीतीवर सर्वसामान्य नागरिक बोलायला तयार नहीत. या पुर्वी देशात महागाई वाढली, रुपयाचे अवमुल्यन झाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढे, गॅसचे दर वाढले की मोठ मोठे मोर्चे निघत होते. सध्या देशात सर्वसामान्य नागरिकाचे नागरिकत्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरीकत्व दुरूस्ती कायद्यावरून मोर्चे निघत आहेत आणि ते केवळ त्यासाठीच निघावेत. अशी सत्ताधार्यांची अपेक्षा आहे. जर महागाईच्या विरोधात मोर्चे निघाले तर सरकारला उत्तर द्यावेच लागेल वर उपाय योजनाही कराव्या लागतील. नागरीकत्व कायद्यावरून भाजपच्या किरीट सोमय्या यांना एका पत्रकाराने अनेक प्रश्न विचारले त्यावर ते केवळ एकच उत्तर देत होते ‘मैने आपको बता दिया है’ असे महागाईच्या बाबतीत होऊ नये. सरकारला प्रश्न विचारल्यावर सरकार म्हणेल आम्ही उपाययोजना केल्या आहेत. आणि सारे काही सुरळीत होईल. या भाबड्या आशेवर नागरीकांनी बसू नये. नागरीकांनी सजग होऊन या नव्या निर्माण झालेल्या आर्थीक साडेसातीच्या निर्मुलनासाठी सरकावरवर नैतिक दबाव वाढवला पाहीजे.
शहरात ३१० किलो प्लास्टिक व्यापार्यांकडून जप्त
प्लास्टिक बंदीसाठी नगरपरिषदेची धडक मोहिम
उस्मानाबाद/प्रतिनिधी
महाराष्ट्र प्लास्टिक ५० मायक्रोन पेक्षा कमी व सिंगल युज प्लास्टिक वर बंदी आणून देखील नागरिकांकडून प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद शहरात प्लास्टिक बंदीची धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी शहरात ३१० किलो प्लास्टिक व्यापार्यांकडून जप्त करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत बस स्थानकासमोरील फळ मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर ह्या ठिकाणी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणार्या व्यापार्यांजवळील प्लास्टिक जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. जवळपास ३१० किलो सिंगल युज प्लास्टिक व्यापार्यांकडून जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. उस्मानाबाद शहरात ग्रीनी टीमद्वारे अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी संदर्भात जनजागृतीचे काम सुरू आहे. प्लास्टिक वापराचे तोटे व पर्यायी व्यवस्था ह्या विषयी व्यापार्यांना व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले होते. वारंवार प्लास्टिकचा वापरू नका हे सांगून देखील व्यापार्यांकडून कायद्याचे उल्लंघन होताना दिसते. याचाच परिणाम म्हणून नगरपरिषदेच्या कर्मचार्यांकडून व्यापार्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली, तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी व्यापार्यांना कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक वापरू नये असे आवाहन केले. ह्या वेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपमुख्यख्याधिकरी पृथ्वीराज पवार, गट नेते युवराज नळे, स्वच्छता निरक्षक कांबळे, कार्यालयीन अधिक्षक कुलकर्णी, व न. प. उस्मानाबाद चे कर्मचारी उपस्थित होते..











































































