Home Blog Page 312

शिल्पकलेच्या उत्तम नमुन्याचा आरवडे येथे कार्यक्रम ; राहुल कुंभार यांची नेत्रदीपक शिल्पकला

सायली गवळी / चिंचणी :*

सांगली जिल्ह्यातील आरवडे गावामध्ये संस्कारभारती दीपावली परिवार मेळाव्यामध्ये राहुल कुंभार या शिल्पकाराने आपली शिल्पकला दाखवली . मिरज  येथील कुंभार यांनी अनेक शिल्पकला तसेच मातीची खेळणी इत्यादी बनविले आहेत . त्यांची मिरजमध्ये कुंभार म्हणून  ओळख आहे .

त्यांनी जी डी आर्ट मधून आपले शिक्षण घेतले आहे . तसेच कोल्हापूर मधूनही त्यांनी पुढील आर्ट शिल्पकलेचे शिक्षण घेतले आहे .  त्यांचे शिल्प जगभरात प्रसिध्द आहे . पुर्व  सीमा  विकास प्रतिष्टानची .   भैय्याजी   काणे   विध्यालय   मणिपूर  येथे नुकतीच त्यांनी बनविलेले कै. भैय्याजी  काणे  यांचे  मुर्ती  शिल्प  बसविण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे     सुहास  काणे व  गिरीश जी   कुबेर,   सुंदर  लक्षमण , प्रदिप  कदम   व  जयवंत  कोंडविलकर  यांचे    शिल्प   मिरजेतील   शिल्पकार  राहुल  कुंभार   यांनी तयार केले आहे .
भारताच्या शेवटच्या टोकाला म्हणजेच मणिपूर या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता म्हणून शंकर दिनकर उर्फ भैय्याजी काणे यांची मूर्ती बनविली आहे . ती बक्षिसास पात्र ठरली . राहुल कुंभार हे मार्बल , फायबर , ब्रॉंझ , सिमेंट व पी ओ पी अश्या माध्यमात मुर्त्या बनवितात . ते अनेक कार्यक्रमामध्ये शाडूच्या मातीने मूर्तीचे डेमोन्सट्रेशन दाखवतात आणि मूर्ती हुबेहूब जशीच्या तशी बनवितात . ते दिवाळीच्या सणाला मातीच्या पणत्या , मातीची खेळणी  बनवितात आणि विक्रीसाठी ठेवतात . 
          ज्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचे पूजा केली ते धौंडीराम कांबळे यांची मूर्ति बनविली . जत मध्ये शांताबाई होनमाने , मेजर – कौंडिबा काशिद तसेच कर्नाटकमध्ये भोज येथे बसवेश्वरांचा 5.5 फूटी शिल्पकला बनविली आहे .  
             पुण्यामध्ये संस्कारभारती कार्यक्रमाध्ये साम चैनल करिता बालाजी तांबे यांची मूर्ति साकरली आहे . सांगली येथे कलापी इंडस्ट्री कंपनी यानी अश्वारूढ़ शिवजी महाराजांचा पुतळा राहुल कुंभार यांच्यकडुन करवून घेतला आहे . 
         सांगालीच्या तरंगमैफिल या कार्यक्रमात त्यानी फ़िल्म मध्ये अँक्टिंग करणारे सुप्रसिद्ध यानी जोगवा , पोलिस , ढग , पेज 3 तसेच पोलिस या फ़िल्म मध्ये काम करणाऱ्या उपेंद्र लिमये यांच्याही मूर्तिचे डेमोंस्ट्रेशन करुन दाखविले आहे .

वाढीव मदत देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

उस्मानाबाद –

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे या पावसामुळे हाताशी आलेले पिक सततच्या पावसामुळे हातुन वाया गेले आहे.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानचे भान ठेवून शासनाने जाहीर केलेली रक्कम अतिशय तुटपुंजी आहे.
तरी शासनाने या मध्ये वाढ करुन जिरायत शेतीसाठी हेक्टरी ६० हजार रुपये तर फळ बागायत साठी हेक्टरी १ लाख रुपये मदत देण्यात यावी यासाठी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिवनराव गोरे  , राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष  सुरेश दाजी बिराजदार  , युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर , जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धायगुडे, अमित शिंदे , राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा  मंजुषा ताई मगर , नितीन बागल , प्रदीप घोणे , राष्ट्रवादी तुळजापूर तालुका महिला अध्यक्षा सौ. पवार  , दिनकर पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाकळी(बें) येथे तेरणा नदीचे जलपूजन

पाडोळी – प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथील तेरणा नदीवर काल (दि९)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती प्रदेशाध्यक्षा आणि जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
     चालू वर्षाच्या मे- जून महिन्यामध्ये येथील तेरणा नदीचे भारतीय जैन संघटना आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदच्या माध्यमातून जवळपास अडीच किलोमीटरचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले होते, आज मात्र परतीच्या पावसामुळे तेरणा नदीच मोठे पाणी येऊन गेले होते, आणि खोलीकरण झालेल्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जवळपास पाडोळी, टाकळी(बें) कनगरा,बोरखेडा आणि धुत्ता या गावचे चारशे ते पाचशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटणार आहे. हे काम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी या कामाचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता, त्यामुळे टाकळी(बें) येथील ग्रामस्थांच्या आग्रहाखातर सक्षणा सलगर यांनी गावास भेट देऊन तेरणा नदीच्या पात्रात साचलेल्या पाण्याचे जलपूजन केले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काकासाहेब सोनटक्के, शाहजहान पठाण, पाशुमिया शेख, अमोल सूर्यवंशी,सुरज लातुरे, अल्लाबक्ष पठाण, नजूमिया शेख, महमद शेख, आनंद कोळी यांच्या मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

जलपूजन झाल्यानंतर टाकळी(बें) येथील नागरिकांनी गावातील समस्यांचं पाढा वाचून दाखवला, गावातील पंचायत पाणी असून नळाला पाणी सोडत नाही, गावातील नाल्या अर्धवट साफ केल्या आहेत, गावातील दवाखाना सतत बंद असतो, याकडे लक्ष देऊन आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली. त्याच बरोबर सक्षणा सलगर यांनी टाकळी(बें) शिवारातील शेतरस्ते व्हावेत आणि तेरणा नदीवर बॅरेज होण्यासाठी आपण सतत पाठपुरावा करावा आणि निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी केली आहे.

वैराग येथील तरुणांच्या सर्तकतेमुळे लांडोर पक्ष्यास मिळाले जीवदान

बार्शी  प्रतिनिधी – गणेश घोलप

वैराग भागातील हत्तीज  – रातंजन शिवारात एका शेतात संतोष सुरवसे या युवकांस एक लांडोर पक्षी आजारी अवस्थेत आढळून आला त्यांनी लगेच वैरागचे रहिवाशी असलेले प्राणी मित्र शशिकांत भगुरे  यांना फोन करुन त्याची माहिती दिली. भगुरे यांनी तात्काळ वन विभागास कळविले. वन विभागाने याची त्वरीत दखल घेत कार्यालयात उपस्थित असलेले वन मजूर गुंड यांना त्याठिकाणी पाठवून तो आजारी  लांडोर घेऊन वन मजुर गुंड व प्राणीमित्र शशिकांत भगुरे वैरागच्या पशुवैद्यकीय दवाखाना येथे घेऊन आले. तेथे कर्तव्यावर हजर असलेले डॉक्टर मांजरे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. यावेळी डॉक्टर मांजरे यांनी लांडोर पक्षांस व्हायरल इन्फेक्शन झालेले आहे तरी त्याला किमान पंधरा ते वीस दिवस डॉक्टरांच्या निगराणी ठेवल्यास त्याचा आजार पुर्णपणे बरा होईल वैराग येथील पशुुवैद्यकिय दवाखानात किरकोळ उपचार करीत त्याच्या डोळ्यांच्या शेजारी झालेल्या जखमेची स्वच्छता केली व आतील घाण काढून टाकली तसेच पुढील उपचारासाठी या दवाखान्यात साधन सामुग्री उपलब्ध नसल्यानेे पुढील उपचारासाठी त्याला बार्शी येथील पशुुुवैद्यकिय दवाखान्यात पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर मांजरे यांनी दिली. यावेळी वैराग येथील प्राणीमित्र शशिकांत भगुरे, निलेश गवळी, संकेत ठेंगल, मोसिन शेख, कृष्णा चौगुले, मुन्ना सुतार व सोमेश्वर बहुउद्देेशीय संस्थेचे सदस्य उपस्थित होते. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन केले जात आहे .

मोहम्मद पैगंबर – इस्लाम व धार्मिक पंचसुत्रे

मोहम्मद पैगंबर जयंती / ईदमिलादूनबी विशेष 
चांदसाहेब शेख 
इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म ५७१ मध्ये मक्केतील कुरेशी या घराण्यात झाला वयाच्या चाळिसाव्या वर्षी जिब्राईल या देवदूताने त्यांना ईश्वरी संदेश दिला तो संदेश त्यांनी पवित्र ‘ कुराण शरीफ ‘ या धर्म ग्रंथात नमूद केला आहे मोहम्मद पैगंबर यांची राहणीमान , वर्तणूक , सभ्यता तथा त्यांची संपूर्ण जीवनशैलीची जडणघडण जशी झाली आहे त्याची इत्यंभूत माहिती ‘ हदीस ‘ या नावाने ओळखली जाते पवित्र ‘ कुराण शरीफ ‘ प्रमाणे  ‘हदीस ”  ग्रंथास सुद्धा इस्लाममध्ये तितकेच महत्व आहे 
इस्लाम धर्माचे अनुयायी मुस्लिम म्हणून ओळखले जातात इस्लाम धर्माचे ५ मुख्य स्तंभ आहेत त्यामध्ये  १) कलमा  –  लाईलाहाएल्लाहू मोहम्मदरहूं रसूललहा म्हणजे परमेश्वर एकच असून मोहम्मद पैगंबर हे त्यांचे प्रेषित आहेत  २) नमाज –  प्रत्येक इस्लाम धर्माच्या अनुयायांनी दिवसातून पाच वेळेस  इश्वराप्रति नतमस्तक व्हावे यालाच नमाज म्हणतात कुठल्याही परिस्थितीत नमाज मध्ये खंड पडू देऊ नये अशी सक्त ताकीद केली आहे ३) जकात –  जकात म्हणजे इस्लाम धर्माच्या अनुयायांनी आपल्या प्राप्तीच्या ( कमाईच्या ) अडीच टक्के दान धर्म करावा जेणेकरून गोरगरीब नागरिकांना याचा लाभ घेता येईल जकात ही सुद्धा बंधनकारक आहे  ४) रोजा  –  पवित्र रमजान महिन्याच्या प्रत्येक दिवशी  महिनाभर निर्जली उपवास करावा यालाच रोजा म्हणतात  ५) आयुष्यातुन एकदा तरी पवित्र मक्केच्या यात्रेस जावे व पुण्य पदरी पाडून घेणे बंधनकारक आहे यालाच हज यात्रा म्हणतात ही यात्रा बकरी ईदच्या पवित्र सनावेळी पार पडते  
याशिवाय इस्लाममध्ये मादक पदार्थांचे सेवन निषिद्ध असून मात्यापित्याविषयी आदर बाळगावा यासह सर्वच शंकाकुशकांचे सविस्तर वर्णन कुराण  – हदीस मध्ये केले आहे 
      इस्लाम धर्म प्रसार करत असताना मोहम्मद पैगंबर यांना मक्केत त्रास देण्यात येत होता यामुळे मोहम्मद पैगंबरानी  मक्केहून मदीनेस स्थलांतर केले यामुळे मक्केसह मदिना या पवित्र  स्थळास विशेष महत्त्व आहे तसेच मोहम्मद पैगंबर यांनी अखेरीचा श्वास मदिना येथेच घेतला आहे

राज्यातील शेतकरी सुखी व्हावा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विठ्ठल चरणी साकडे

पंढरपूर, दि. ८ :-  राज्यातील  शेतकरी आणि सामान्य जनता  सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.
महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री. सुनील महादेव ओमासे आणि सौ. नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सौ. अंजली पाटील, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, प्रांतधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी , तहसिलदार वैशाली वाघमारे आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही  मदत  मागितली आहे’.
गेली तीन चार वर्षे वारी निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला.  वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

बेडग गावचे ओमासे
ठरले मानाचे वारकरी
 मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३ पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणी मुर्ती, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला.

मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

आज दि.३.११.१९ रोजी  उस्मानाबाद जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्यासह मनसेच्या पदाधिकार्यांनी मुंबई येथे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते मा.अजीत (दादा) पवार व प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांच्या हस्ते,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहिर प्रवेश केला.
    प्रशांत नवगिरे यांचेसोबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे  जिल्हाध्यक्ष महेश जाधव,उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार,मयूर गाढवे,राहूल गायकवाड, मनसे तुळजापूर तालूकाध्यक्ष धनाजी साठे,उपतालूकाध्यक्ष अविनाश कांबळे,  मनविसे तालुकाध्यक्ष रोहित दळवी या पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार व जि.प.सदस्य महेंद्र (काका)धुरगुडे उपस्थित होते.

नाविन्यपूर्ण उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवत असतात – उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे

उस्मानाबाद –

सातत्याने समाजात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडत असतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी केले.एकता फाउंडेशन उस्मानाबाद आणि संतकृपा बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित सद्गुरू जोग महाराज गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने वाघोली येथे आयोजित गोमाता पूजन व कीर्तन महोत्सवात ते बोलत होते.
          यावेळी जिल्हा सरकारी वकील अँड. शरद जाधवर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदकुमार रोडगे, ह.भ.प.अनिल पाटील, ह.भ.प. नवनाथ चिखलीकर, एकता फाउंडेशन अध्यक्ष अमित कदम, ह.भ.प.आकाश मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
          शेतकऱ्यांनी शेती सोबतच दुग्ध व्यवसाय करत आपल्या कडील जास्तीत जास्त देशी गायीचे संवर्धन करावे व त्याच बरोबर अशा कार्यक्रमांमुळे आपल्या संस्कृतीचे जतन होण्यास मदत होईल. एकता फाऊंडेशन व जोग महाराज गोशाळा यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबदल कौतुक केले.
          रामेश्वर रोडगे पुढे बोलताना म्हणाले की युवकांनी पुढे येऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत यासाठी प्रशासनाच्या वतीने जी काही मदत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. प्रशासन, वारकरी, युवकवर्ग यांच्या जो ञिवेणी संगम याठिकाणी घडवुन आणला ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे हि मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
          अँड शरद जाधवर यांनी बोलताना वसुबारस चे महत्व सांगत प्रत्येकाने आपल्या घरी देशी गायीचे संवर्धन करावे असे आवाहन यावेळी केले.देशी गायीचे दुध आपल्या आरोग्यास चांगले असुन संकरित दुधापासून होणाऱ्या आजारा पासून यामुळे आपणांस सुटका मिळेल.एकता फाऊंडेशन करत असलेले कार्य अतिशय उत्तम आहे असे ही यावेळी बोलताना म्हणाले.
          ह.भ.प अनिल पाटील महाराज यांनी धन्य आजि दिन झाले संताचे दर्शन जाली पापातापा तुटी दैन्य गेलें उठाउठीं या अभंगावर आपली किर्तन सेवा सादर केली.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात एकता फाऊंडेशनचे सचिव आभिलाष लोमटे यांनी  कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद करत आपली संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकाने असे कार्यक्रम आयोजीत करावे असे आवाहन यावेळी केले.
          कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजन करून करण्यात आली. यावेळी रामेश्वर रोडगे यांचा एकता परिवाराच्या वतीने शाल व सन्मानपञ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विविध क्षेत्रात निवड झालेल्या वाघोली गावातील गुणवंताचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
          यावेळी कार्याध्यक्ष विशाल थोरात, प्रसाद देशमुख,सरपंच बाळासाहेब गोगावे, श्रीकृष्ण धर्माधिकारी,अमर पवार, सचिन बारस्कर, आनंद खडके,अँड.विक्रम सांळुके,प्रशांत पाटील, दिपक साखरे,पंकज सुलाखे, एकता फाउंडेशन सदस्य, वैष्णव विचारधारा संघ, व्यसनमुक्त युवक संघ व ग्रामस्थ उपस्थित होते.

नळदुर्ग नगरपालीकेतील काँग्रेस पक्षाच्या राजकीय साम्राज्याला खिंडार दोन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

नळदुर्ग :- नळदुर्ग नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या पाच नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांनी ऐन विधानसभेच्या मतदानाच्या तोंडावर बंडाचा झेंडा घेत  तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 18 ऑक्टोबर रोजी महायुतीच्या नळदुर्ग शहरातील प्रचार कार्यालयात भाजपामध्ये प्रवेश केल्याने नळदुर्ग नगरपालिकेतील काँग्रेस पक्षासह आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या राजकीय साम्राज्याला मोठ्या प्रमाणात खिंडार पडले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कारण तीन वर्षापूर्वी नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  लढलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नय्यरपाशा जाहगिरदार, शहेबाज काजी, बसवराज धरणे, सुफिया कुरेशी, मन्नाबी कुरेशी हे पाच नगरसेवक निवडून आले होते. विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर गेल्या दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडले होते. त्यामुळे नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते असलेले नयरपाशा जागीरदार व नगरसेविका सुफिया कुरेशी यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाच्या नळदुर्ग नगरपालिकेतील वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे.कारण त्यांचे नळदुर्ग नगरपालिकेत तीनच नगरसेवक शिल्लक राहिले आहेत.तसेच नगरसेवक नयरपाशा जागीरदार व सुफिया कुरेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहराचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. कारण  नयरपाशा जागीरदार हे नळदुर्ग शहराच्या राजकारणामध्ये साम-दाम-दंड-भेद या युक्तीचा वापर करून काहीही उलटफेर करण्याची ख्याती राखतात अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे हि निवडणूक जरी विधानसभेची असली तरी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नळदुर्ग शहरातील राजकीय पटावरील अनेक दिग्गज नेत्यांची आव्हाने त्यांच्यासमोर राहणार आहेत. कारण या निवडणुकीनंतर नगरपालिकेतील अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्वाचे आहे.

युगारंभ यात्रेतून भाजप करणार शक्तिप्रदर्शन

तुळजापूर – विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. शक्तिप्रदर्शन आणि प्रचार करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. तुळजापूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आज दि.१८/१०/२०१९ रोजी सायं ठीक ०५ वा. हंगरगा (तीर्थ) पासून ‘युगारंभ यात्रा’ (रोड शो व रॅली) चे आयोजन करण्यात आले आहे ही यात्रा हंगरगा- तिर्थ(खु)- तिर्थ (बु) – बिजनवाडी – चिंचोली – आरळी (खु )- आरळी (बु ) – येवती- आरबळी –  इटकळ- केशेगाव – देवसिंगा- नीलेगवा – गुळहळी -दहीटना- शहापुर – गुजनुर – खुदावाडी मार्गे जाणार  असून अणदूर येथे रात्री ०९ वा. जाहीर सभा होणार आहे. या सभेला
भाजपा नेते देवानंदभाऊ रोचकरी, युवा नेते मल्हारदादा पाटील व महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत.
तरी या ‘युगारंभ यात्रेत’ मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.