Home Blog Page 309

दैनिक जनमत E Paper १० डिसेंबर

दैनिक जनमत E Paper ८ डिसेंबर

दैनिक जनमत ७ डिसेंबर E Paper

आ. राणाजगजितसिंह पाटील भाजपसोबतच.. महाविकास आघाडीच्या चर्चांना विराम…

उस्मानाबाद – राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर तुळजापूर चे आ. राणाजगजितसिंह पाटील पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीत येतील अशी चर्चा रंगली होती. काही कार्यकर्त्यांनी दादा परत राष्ट्रवादीत या अश्या पोस्ट ही सोशल मीडियावर केल्या होत्या मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आ. पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये आपली भविष्यातील भूमिका मांडली आहे.

मल्हार पाटील यांची पोस्ट
आम्ही कायम आपल्या सोबतच…


गेल्या १० वर्षांपासून जिल्ह्याच्या विकासाचा गाडा रुतलेला होता. उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्याच्या जिव्हाळ्याच्या कृष्णा -मराठवाडा सिंचन योजनेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मा.देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेस भरीव निधीची तरतूद केली होती. वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देऊन प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी त्वरित केंद्र सरकारकडे पाठवला. कौडगाव येथील प्रलंबित सौर ऊर्जा प्रकल्पाची निविदा काढल्याने हा प्रकल्प लवकरच सुरु होणार आहे. टेक्निकल टेक्स्टाईल हबला मंजुरी तसेच उस्मानाबाद-लोहारा सोयाबीन पिकविम्याचा प्रश्न मार्गी लावणे, अशी अनेक मोठी कामे आहेत जे मा.देवेंद्रजी यांनी त्वरित मार्गी लावली. सर्वात महत्वाचे म्हणजे नदी जोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प मागच्या सरकारने हाती घेतला होता. आ.राणादादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मा.देवेंद्रजी यांनी मंजूर केलेली कामे नवीन सरकार पूर्ण करणार कि सुडाचे राजकारण करून प्रलंबित ठेवणार ? हे बघावे लागेल.  

सत्ता असो अथवा नसो लोकांसाठी संघर्ष करणे हा आमचा पिंडच आहे. गेली १० वर्ष आपण लोकांसाठी संघर्ष करतच आलो आहोत. मागच्या आघाडी सरकारच्या काळात आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील जिल्ह्यातील विकासाची कामे होत नव्हती, तीच कामे मा.देवेंद्रजी यांनी करून दाखवली त्यामुळे त्यांना कायम साथ राहणार आहे. आदरणीय डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांचा संघर्षाचा, लोक कल्याण व जनसेवेचे वारसा पुढे न्यायचा आहे. येत्या काळात जिल्ह्यात भाजपची संघटन शक्ती अधिक वाढवण्यासाठी सर्वानी मिळून कष्ट घ्यायचे आहेत. भविष्यातील येणारा एक दिवस नक्कीच आपला असेल !

ही पोस्ट टाकताना मल्हार पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पोस्ट केला  आहे



अग्रलेख – धन’नाशक’

धन’नाशक

शेतकऱ्याने पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या पिकाला हानिकारक ठरते ते तण आणि ते तण काढण्यासाठी वापरात येणारे तणनाशक शेतकऱ्यांसाठी परत हानिकारक ठरत आहे.   पिकांवरील कीटकांनाही जगण्याचा हक्क. एव्हाना कीटक अन्नसाखळीचा घटक आहेत. तो आपला जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्याने फवारलेल्या कीटकनाशकांना पचवण्याची क्षमता (रेजिस्टन्स) विकसित करतो. यातूनच जहाल कीटकनाशकांच्या वापराचे दुष्टचक्र भारतीय शेतीत उभे झाले अन् शेतीवर विसंबून असलेल्या शेतकरी, मजुरांच्या आरोग्याचे प्रश्र बिकट झाले आहेत.
इन्सेक्टिसाइड अॅक्ट १९६८ हा कायदा कीटकनाशक नियंत्रणासाठी भारतात अस्तित्वात आला तेव्हा देशात २० कीटकनाशक उत्पादक कंपन्या होत्या. सध्याच्या घडीला भारतात ३५
हजार कोटींची उलाढाल करणान्या ३१२ कीटकनाशक कंपन्या आहेत. कीटकनाशकाच्या फवारणीतून मानवाच्या लैंगिक
क्षमतेवरच भयावह परिणाम होत असल्याची बाब
निदर्शनास आली आहे.  ग्लायफोसेट, मोनोक्रोटोफॉस यासारख्या जहाल विषांच्या प्रभावातून बहुसंख्य शेतकऱ्यांमध्ये नपुंसकत्व येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. इतकेच नव्हे
तर नवजात बालकात शारीरिक व बौद्धिक व्यंगत्व तसेच कर्करोग, हृदयरोग, अॅनिमिया अशा आजारांची मालिकाच या फवारणीमुळे सुरू होत असल्याचा निष्कर्ष ‘पेस्टीसाइड अॅक्शन नेटवर्क ऑफ इंडियाचे’ हैद्राबाद येथील संशोधक डॉ. नरसिंव्हा रेड्डी यांनी काढले आहेत.कीटकनाशकांचे परिणाम मानवी
मेंदूवर होत असल्याने सुरुवातीला थकवा
येतो. त्यानंतर शरीराच्या रक्तवाहिन्या
कमकुवत पडू लागतात. 
२००० ते २०१५ या कालावधीत एकट्या महाराष्ट्रातील कीटकनाशकांचा वापर तीन हजार २३९ टनांवरून ११हजार ६६५ टनांपर्यंत पोहोचल्याची
थकादायक माहिती पुढे आली. शेतकऱ्यांचा 
कीटकनाशक वापराबाबत पूर्ण विश्वास कृषी केंद्रचालकांवर आहे. त्यातून हव्या त्या प्रकारची घातक कीटकनाशके शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात.याला पर्याय उरतो केवळ सेंद्रिय शेतीचा मात्र सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळत नाहीत. सरकारकडून त्यांना वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत. सेंद्रिय कीटक नाशक प्रभाव लवकर दाखवत नसल्याने शेतकरी त्याचा वापर करत नाहीत. पंजाब आणि हरियाणा सारख्या शेतीमध्ये प्रगत समजल्या जाणाऱ्या राज्यात कीटनाशकांचा अतिवापर केल्याने अनेक जण कर्करोगाला बळी पडले आहेत. पंजाब मधून बिकानेर राजस्थान मध्ये एक रेल्वे ला कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखले जाते. या रेल्वे मधून शेकडो कॅन्सरग्रस्त उपचारासाठी प्रवास करतात. आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना नेहमी करावा लागतो भविष्यात कीटकनाशक आणि तणनाशक यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल आणि हे शेतकऱ्यांसाठी धननाशक असेल

उस्मानाबाद नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांची कारणे दाखवा नोटीस

उस्मानाबाद नगरपालिका मुख्याधिकार्‍यांचा भोंगळ कारभार !
उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी कामकाजात कुचराई केल्यामुळे त्यांकडे लोकशाही दिनातील एकुण १८ प्रकरणे प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हाधिकार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाने उस्मानाबाद नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी शासन पातळीवर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या सोमवारी साजरा केला जातो. त्यामध्ये नागरिकांना असलेल्या तक्रारी दाखल कराव्यात आणि त्या संबंधीत विभागाने सोडवाव्यात असा नियम आहे. उस्मानाबाद नगरपालिके संदर्भातील अनेक तक्रारी लोकशाही दिनात दाखल झाल्या आहेत. मात्र नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयातील लोकशाही दिनात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने उस्मानाबाद नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे नगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे. या कारणे दाखवा नोटीसेला नगरपालिका मुख्याधिकारी कोणते उत्तर देतात हे पहाणे आवश्यक ठरणार आहे.

छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर हे अजिंक्य योद्धे – राम जवान

तुळजापूर – छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर हे
अजिंक्य योद्धे असल्याचे प्रतिपादन व्याख्याते राम जवान यांनी मांडले. खडकी येथे छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती उत्साहात  साजरी करण्यात आली.प्रथमता प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
पुढे बोलताना  राम जवान  म्हणाले की छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे झाला घरात लहान पणापासुन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे समाजकारण व देशभक्ती पाहुन यशवंतरावांना लहानपणापासून देशभक्ती व अन्यायाविरुद्ध लढण्याचे धडे घरातुनच मिळाले.यशवंतरावांनी आठराशेच्या सुरुवातीस पुण्यावर हजारो सैन्य सोबत घेऊन स्वारी केली होती, हे युध्द यशवंतराव व पेशवे यांच्यात पुण्यातील वानवाडीच्या मैदानावर लढले गेले. या लढाईत पेशवे हरले व पळुन पेशवे सातार्याला गेले. यावेळी पुण्यामध्ये एवढा मोठा नरसंहार होता कि हाडे पसरण्यास जागा नव्हती म्हणून पुण्यातील आजचे हडपसर हे नाव त्यावेळच्या घटनेवरूच पडले आहे.छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांच्या विरोधात बंड करून इंग्रजांना तब्बल अठरा वेळा पराभूत करून इंग्रजांची अभ्रु जगाच्या वेशीवर टांगली. इंग्रजांनी जगावर राज्य केले परंतू यशवंतराव होळकर यांच्या कडुन इंग्रजांना तब्बल अठरा वेळा पराभव स्वीकारावा लागला. आठराशे एक सुमारास भारत देशात सर्वात मोठी फौज व तोफखाना म्हणजेच एक लाखापेक्षा जास्त सैन्य यशवंतराव होळकर यांच्या कडे होता.त्यावेळी भारतात ऐवढे सैन्य कोणत्याही राजाकडे नव्हते. अशा या महान योध्दाने भारत भुमी इंग्रजांच्या ताब्यातून मिळवण्यासाठी उभं आयुष्य देशासाठी अर्पण केले.
यावेळी भरत जवान,सिध्दु सुरवसे,किशोर जवान,संभाजी शिंदे उमेश जवान,आविनाश जवान,राम जवान,भुताळी बनसोडे,आकाश जवान,संदेश जवान,मलिक कवडे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.