Home Blog Page 307

विध्याभवन हायस्कुल येथे 42 वा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

लोहारा/प्रतिनिधी
कळंब येथील विध्याभवन हायस्कुल येथे 42 वा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या जिल्हास्तरीय प्रदर्शनात लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जि.प.शाळेचे शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी यांच्या शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक गटातुन कृतिशील संवंयअध्ययन साहित्यास प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शिक्षक आ.विक्रम काळे होते.यावेळी ओदुंबर उकीरडे शिक्षणाधिकारी माध्यमिक,नलावडे उपशिक्षणाधिकारी,जोशी  उपशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी यांना हा पुरस्कार देण्यात आला.42व्या राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांच्या  साहित्याची निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे गटशिक्षणाधीकारी कमलाकर धुरगुडे(लोहारा),विस्तार अधिकारी बी.के.यरमुनवाड,केंद्र प्रमुख आर.एन.गरड,मुख्याध्यापक एम.आर.गवळी यांनी अभिनंदन केले आहे.

पत्रकारासाठी सरंक्षण कायदा करण्यासाठी भूमाता ब्रिगेड रस्त्यावर उतरणार _ तृप्ती देसाई



कळंब -समाजाचे हित जोपासण्यासाठी वअंधरात घडणाऱ्या घटना उजेडात आणन्यासाठी पत्रकार हा आपला जीव पणाला लावून आज काम करत आहे ,आशा पत्रकारांना सरक्षण कायदा वपेन्शन योजना चालू करण्यासाठी आगामी काळात भूमाता ब्रिगेड रसत्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे परवड मत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कंळब येथे प्रत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्न केले ,
कंळब येथे दि ६ रोजी श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालक आश्रम शाळेत जेष्ठ नागरिक संघाच्या वतिने पत्रकरांना सेवा दर्पन परस्कार देऊन गौरवण्यात आले 
यावेळी व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे ,तृप्ती देसाई ,डाॅ माणिकराव डिकले ,अच्यूत माने ,रमेश बोर्डकर ,योगीराज लांडगे आदी उपास्थित होते,
यावेळी देसाई यांच्या हस्ते पत्रकार प्राशर्वनाथ बाळापूरे ,पेमेश्वर पालकर ,मंगेश यादव ,दिपक बारकुल ,स्वानंद देशमुख ,यांना यावेळी गौरवण्यात आले ,
यावेळी देसाई पूढे म्हणाल्या की यापूढे महाराष्द्रात दारूबंदी ,व पत्रकार सरक्षण कायदा करण्यासाठी माझे आंदोलन असतील ,सरकारला सांगुन किंवा निवेदन देऊन जर कायदे होत नसतील तर पत्रकार बांधवानी सरकारी कार्यक्रमावर बहीसकार घालून बातम्या देणे बंद करावे ,नाक दाबल्या शिवाय तोंड उधडत नाही ,तर च सरकारचेडोळे उघडतील ,जर उन्हाळी आधिबेशनात कायदा मांडला किंवा पास झाला नाही तर मात्र भूमाता ब्रिगेड ही रसत्यावर नत्कीच उतरून आंदोलन करेल यात मात्र शंका नाही असा ईशाराही यावेळी सरकारला दिला ,
यावेळी कार्यक्रमाचे सुत्र संचालन डि,के,कलकर्णी यांनी केले तर आभार ह,भ प महादेव महाराज आडसूळ यांनी मानले ,या कार्यक्रमासाठी त्रिबंक मनागिरे,विलास करंजकर ,माधवसिंग राजपूत ,कमलाकर मुळीक ,सह तालूक्यातील पत्रकार बांधव मोठया संख्यने हजर होते ,

दर्पण दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

दर्पण दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

उस्मानाबाद: जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पनदिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला़शहरातील पत्रकार भवनमध्ये दर्पणदिनामित्त जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ कार्यक्रमास जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, प्रांत प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा, सचिव संतोष जाधव, सहसचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेते शोएब मोमीन, अजित जगताप, सलिम मोमीन, श्रीकांत पवार, किशोर सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी संघटक प्रशांत कावरे, विनोद बाकले, मल्लिकार्जुन सोनवणे, तालुकाध्यक्ष सुभाष कदम, तालुका सचिव आकाश नरोटे, पत्रकार उपेंद्र कटके,  प्रविण पवार, विजय मुंडे, किशोर माळी, लक्ष्मीकांत बनसोडे, अजहर शेख, शारूख सय्यद, संतोष खुने आदींसह पदाधिकारी, सदस्य, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते़