Home Blog Page 304

दैनिक जनमत २४ जानेवारी E Paper

महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांचा मतदानाचा अधिकार काढला

उस्मानाबाद – विठ्ठल एडके
राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार आल्यानंतर राज्यातील सहकार क्षेत्रावरील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणुन तत्कालीन सहकार मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना कृषी उत्तन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अधिकार दिला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजपने चंचु प्रवेश केला मात्र नव्याने सत्तेत आलेल्या महाविकस आघाडी सरकारने बाजार समितीच्या निवडणुकीत असणारा शेतकर्‍याचा मतदानाचा अधिकार काढून घेतला आहे.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकत शेतकर्‍यांना असलेला अधिकार काढून घेत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पूर्वीप्रमाणेच कार्यकारी सहकारी संस्थांमधून सदस्य निवडणार करण्यात येणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी २०१७ मध्ये केलेली सुधारणा रद्द करून पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास व त्यादृष्टीने अध्यादेश प्रख्यापित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासाठी शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार आहे. यामुळे मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बाजार समित्यांच्या निवडणुकीचा खर्च देखिल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या समित्यांना शासनातर्फे कोणतेही अनुदान दिले जात नाही. केवळ बाजार फी मधून या समित्या आपला खर्च भागवतात. काही बाजार समित्यांच्या निवडणुका वेळीच न घेतल्याने उच्च न्यायालयाने देखील नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले-११, ग्रामपंचायत सदस्यांमधून-४, अशा एकूण १५ शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण्यात येईल. २०१७ मध्ये बाजार क्षेत्रात राहणार्‍या किमान १० आर इतकी जमीन धारण करणार्‍या आणि बाजार समितीमध्ये आपल्या कृषी उत्पन्नाची विक्री करणार्‍या शेतकर्‍याला मतदानाचा अधिकार देण्याची सुधारणा करण्यात आली होती. ती आता अध्यादेशाद्वारे रद्द करण्यात येईल.

दैनिक जनमत २३ जानेवारी E paper

दैनिक जनमत २२ जानेवारी E Paper

टक्केवारीचे वाढते प्रमाण ( अग्रलेख )

देशातील आर्थीक, सामाजिक परिस्थीतीची टक्केवारी गेल्या काही वर्षांत खालावत आहे. मंदी, बेरोजगारी, महागाई हे त्याच आकडेवारीतून दिसते. मात्र भ्रष्टाचाराची आकडेवारी स्पष्टपणे समोर आली नसली तरी त्याचे काही निदर्शक आहेत. दस्तुंरखुद्द केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीच ही गोष्ट समोर आणल्याने त्यात तथ्यता वाटते. रस्त्याची कामे करणार्‍या कंपन्यांना त्या त्या भागातील लोकप्रतिनीधींनी पैसे मागीतले. दुष्काळी भाग असणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींचाही त्यात समावेश आहे. १०० कोटींच्या कामात २ टक्के म्हणजेच २ कोटी एवढी ती रक्कम आहे. ही माहीती कंपन्यानीच गडकरींना दिल्याने त्यांनी सी. बी. आय. मार्फत याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यात गडकरींचे अभिनंदन करावे लागेल. अनेकदा लोप्रतिनीधी नेमकेे कशासाठी आंदोलन करतात याची खडानखडा माहिती नेत्यांना असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कंत्राटदाराकडून कोट्यावधी रूपये लोप्रतिनीधी घेत असतील तर त्यांना कुठलाच नैतिक अधिकार रहात नाही. ज्या कामात त्यांनी पैसे मागीतले त्याचा दर्जा ढासळलेलाच रहाणार. उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय तीन टोलनाके आहेत त्याच्यापैकी दोन टोलनाक्यावर शिवसेनेच्या खासदार आमदारंानी विविध मागण्यासाठी आंदोलन केले आंदोलनातील मागण्या रास्त आहेत. मात्र खासदार हे देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे प्रतिनिधीत्व करतात त्यांनी या मागण्यांसाठी तिथे नेमका काय पाठपुरावा केला? यासाठी संबंधित विभागाच्या नेत्यांची कितीवेळा भेट घेतली, अधिकार्‍यांशी काय चर्चा केली काय पाठपुरावा केला हे ही नागरीकांना सांगायला हवे होते. मात्र कार्यकर्त्यांच्या गर्दीचा वापर निवळ्ळ दबावासाठी केला गेला की काय असे यातून वाटते. आंदोलनात उपस्थित केलेले प्रश्‍न सोडवण्यासाठी ठराविक वेळ टोल कंपनीला दिला गेला होता तो अवधीही निघून गेला आहे. मग आंदोलन करणारे लोकप्रतिनिधी गप्प का? केंद्रीय मंत्री गडकरींना याच लोकप्रतिनीधींकडे बोट दाखवायचे होते का असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. यात आजी- माजी लोकप्रतिनिधींची नावे गुपित आहेत. रस्त्याच्या कामात टक्केवारी मागणारे जिल्ह्यातील इतर कामात मागत नसतील याची काय शाश्‍वती. मात्र हे टक्केवारी मागण्याचे प्रमाण कमी व्हायला हवे 

महागाईची साडेसाती ( अग्रलेख)


माणसाच्या आयुष्यात सारख्या वाईट घटना घडत असतील तर आपण त्याला साडेसाती लागलीय असे म्हणतो. मग त्यावर अनेक उपाय करण्याचा सल्लाही दिला जातो. साडेसाती असते की नाही हा संशोधनाचा विषय आहे. मात्र तरीही त्यावर उपाय केला जातो. देशातही अशीच काही अवस्था सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी अनेक औद्योगीक आणि आयटी ंकंपन्या बंद पडल्याच्या बातम्या आल्या. कोट्यावधी लोकांच्या नोकर्‍या गेल्याचे दाखले दिले गले मात्र तो निवडणुक प्रचाराचा मुद्दा आहे. असे भासवून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता भारताची अर्थव्यवस्था ही  मंदीच्या सावटाखाली आहे. असे अनेक अर्थतज्ञ सांगत होते तरीही सत्ताधार्‍यांनी अर्थशास्त्रज्ञांच्या मताकडे दुर्लक्ष केले. मात्र गेल्या दोन दिवसांत महागाईचा दर ७.३७ टक्क्यावर असल्याचे समोर आले आहे. मात्र सत्ताधारी मंडळी आर्थिक दिवाळखोरीकडे दुर्लक्ष करण्यासाठी भावनीक राजकारण करत असल्याचे समोर येत आहे. देशातील ढासळती आर्थिक स्थिती पहाता  याला आर्थीक स्थितीतील साडेसाती का म्हणू नये. केवळ कांदा महागला हे महागाईचे परिमापक होऊ शकत नाही. कांद्याचे भाव आता खाली येऊ लागले आहेत याचा अर्थ स्वस्ताई आली असा होत नाही. इंधनाचे दर चंद्रकोरीप्रमाणे वाढत आहे. स्टेटबँकेच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात काही लाख तरुणांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. वाहन, घरबांघणी, वस्तु उत्पादन यासारखे अनेक उद्योग घायकुतीला आले आहेत. देशात नव्याने आर्थिक गुतवणुक होताना दिसत नाही. त्यामुळे नविन रोजगार निर्मीती ठप्प आहे. आणि त्यात महागाईचा हा समोर आलेला दर आणि जागतीक पातळीवर रुपयाचे होणारे अवमुल्यन. अश्या अनेक संकटात देशाची आर्थव्यवस्था वाटचाल करत आहे. काही दिवसात देशाचा अर्थसंकल्प सादर होईल त्यात काही तरी ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. या सर्व परिस्थीतीवर सर्वसामान्य नागरिक बोलायला तयार नहीत. या पुर्वी देशात महागाई वाढली, रुपयाचे अवमुल्यन झाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढे, गॅसचे दर वाढले की मोठ मोठे मोर्चे निघत होते. सध्या देशात सर्वसामान्य नागरिकाचे नागरिकत्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरीकत्व दुरूस्ती कायद्यावरून मोर्चे निघत आहेत आणि ते केवळ त्यासाठीच निघावेत. अशी सत्ताधार्‍यांची अपेक्षा आहे. जर महागाईच्या विरोधात मोर्चे निघाले तर सरकारला उत्तर द्यावेच लागेल वर  उपाय योजनाही कराव्या लागतील. नागरीकत्व कायद्यावरून भाजपच्या किरीट सोमय्या यांना एका पत्रकाराने  अनेक प्रश्‍न विचारले त्यावर ते केवळ एकच उत्तर देत होते ‘मैने आपको बता दिया है’ असे महागाईच्या बाबतीत होऊ नये. सरकारला प्रश्‍न विचारल्यावर सरकार म्हणेल आम्ही उपाययोजना केल्या आहेत. आणि सारे काही सुरळीत होईल. या भाबड्या आशेवर नागरीकांनी बसू नये. नागरीकांनी सजग होऊन या नव्या निर्माण झालेल्या आर्थीक साडेसातीच्या निर्मुलनासाठी सरकावरवर नैतिक दबाव वाढवला पाहीजे.