Home Blog Page 251

सार्वजनिक शिवजन्मोत्सवानिमित्त आज कुर्डुवाडीत बैठक..

 

कुर्डुवाडी दि.३०(प्रतिनिधी)

साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या वतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सव  सोहळयाची आयोजन बैठक विठ्ठल मंदिर कुर्डुवाडी(ता.माढा) येथे करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष उमेश पाटील यांनी दैनिक जनमतशी बोलताना दिली 

दरवर्षीप्रमाणे यंदा महाराष्ट्रात सर्वात मोठा शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार कुर्डुवाडी शहरातील सर्व शिवभक्तांनी घेतला आहे याची पूर्व तयारी म्हणून आज सायं ६ वाजता कुर्डुवाडी शहरातील सर्व शिवभक्तांची आयोजित बैठकीत उपस्थित राहण्याचे आव्हान पाटील यांनी केले 

यामध्ये रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबीर,शस्त्रास्त्र प्रदर्शन,रांगोळी स्पर्धा,शिव आरती,महिलांसाठी विविध उपक्रम,तसेच शिवरायांची पालखी असे विविध सामाजिक उपक्रमांचे याहीवर्षी त्याचप्रमाणे कुर्डुवाडी शहरात शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे.

दैनिक जनमत ३० जानेवारी E paper

 

९ हजारांची लाच घेणारा वैद्यकीय अधिकारी अँटीकरप्शनच्या जाळयात

कुर्डुवाडी दि.२९(प्रतिनिधी) प्रसूतीसाठी लाचेची मागणी करणारे कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष आडगळे यांना ९ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शुक्रवार दि.२९ रोजी सकाळी ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी येथे करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदाराची पत्नी ही गर्भवती होती तिला प्रसूती वेदना होत असल्याने ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी ता.माढा येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. सदर ठिकाणी नेमणूकीस असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष आडगळे यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या प्रसूती साठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती मात्र तडजोडीनंतर शुक्रवारी सकाळी ९ हजार रुपये देण्याचे ठरले यानंतर तक्रारदाराने  लाचलुचपत विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून प्रसूतीकरीता डॉ. आडगळे यांना ९ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून चौकशीकरिता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई राजेश बनसोडे पोलिस अधिक्षक लाचलुचपत विभाग पुणे,सुरज गुरव अप्पर पोलिस अधिक्षक लाचलुचपत विभाग पुणे यांच्या व संजीव पाटील पोलिस उप अधिक्षक लाचलुचपत विभाग सोलापुर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक कविता मुसळे, पोलिस काॅन्स्टेबल उमेश पवार, पोलिस काॅन्स्टेबल स्वप्निल सणके यांनी केली.याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या

 

महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उस्मानाबाद – उस्मानाबाद येथे नव्याने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच च्या वतीने  मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यामार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले असून  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ हे उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी या ठिकाणी आहे. तसेच अहिल्यादेवी यांचे सामाजिक कार्य खुप मोठे आहे. वैद्यकीय महाविद्यालयास त्यांचे नाव दिल्यास भविष्यात त्यांचा आदर्श घेवून हे विद्यार्थी आपल्या सामाजिक, प्रशासकीय व वैद्यकीय व्यवसाय करतानाअहिल्यादेवी यांचा आदर्श घेवून आपले काम करतील म्हणून उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रा. सोमनाथ लांडगे, डॉ. संतोष पाटील, प्रा. मनोज डोलारे, नवनाथ काकडे,बिभीषण लोकरे, गणेश सोनटक्के, राहुल काकडे, नरसिंह मिटकरी, अशोक गाडेकर,  बालाजी तेरकर उपस्थित होते.

तहसीलदार माळी यांच्या विरोधात पंतगे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

 

                               उस्मानाबाद – शहरात दि.२३ जानेवारी  रोजी सांजा रोड कठारे दवाखाना समोर अभिजात नारायण पंतगे हे फोनवर बोलत असताना उस्मानाबाद येथील तहसीलदार गणेश माळी यांनी तू येथे का थांबला आहेस असे विचारून अभिजात पंतगे यास शिवीगाळ करत लाथबुक्कयांनी मारहाण केली तसेच तुझ्यावर ३५३ कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करतो अशी धमकी दिली याविरोधात अभिजित पंतगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.  तहसीलदार गणेश माळी यांच्या विरोधात कडक कारवाई करूनमला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.  जिल्हाधिकारी या तक्रारीवर तहसीलदार गणेश माळी यांच्याविरोधात काय कार्यवाही करतात याकडे सर्वाचे लक्ष्य लागले आहे.

आ.सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला जिल्हाप्रमुख गौतम लटके यांची पत्रकार परिषेदेत माहिती

 जिल्हा नियोजन बैठकीत अभिनंदन ठराव मंडण्यावरून झाला होता राडा 

परंडा :- उस्मानाबाद येथे दि 25 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा झाली  तर काही ठराव घेण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य यांनी नीरा भीमा स्थिरीकरण योजना मार्गी लावल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडणयात आला  यावेळी माजी मंत्री तथा  आ तानाजी सावंत यांनी  या ठरावात दुरुस्ती करण्याची सूचना केली  सावंत म्हणाले की ,मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी खास बाब म्हणून अतिशय तातडीने बैठक लावून लवकरात लवकर मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे याची सविस्तर माहिती नियोजन मंडळाला दिली व पाहिले उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची सूचना ,हट्ट धरला त्यामुळे यामध्ये फक्त जलसंपदा मंत्री यांचे अभिनंदन  करण्याच्या ठरावात बदल करून  मुख्यमंत्री व  जलसंपदा मंत्री यांचे अभिनंदन करण्याचा ठराव घ्या अशी सूचना करणे म्हणजे पक्ष विरोधी भूमिका असू शकत नाही. असे यावेळी जिल्हाप्रमुख  गौतम लटके यांनी स्पष्ट केले  

    एखाद्या कामात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ढिलाई केली तर जनतेचे प्रश्न सुटणार नसतील तर  लोकप्रतिनिधिनी त्या त्या वेळेस प्रशासनाला सूनवणे गरजेचे आहे जर प्रशासकीय अधिकारी  यांनी कामात दिरंगाई केली तर याचा दोष जनता सरकारला देते जनतेने सरकारला दोषी धरू नये म्हणून आम्ही अधिकाऱ्यांनी काम करणं गरजेचे ही काळजी आम्ही घेतोय असे सावंत याना वाटले  परंतु काहींनी याचा विपर्यास करून आ. सावंत यांना  बदनाम करण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा असल्याचे  मत शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके  यांनी परंडा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले 

 यावेळी या पत्रकार परिषदेत  जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव,सतीश मेहेर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते 

 आ. सावंत यांनी मांडले मुद्दे 

  जिल्हा नियोजन मधील निधी लोकसंख्या प्रमाणे वाटप व्हावा कोणत्याही तालुक्यावर अन्याय होऊ नये 

शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी महावितरण च्या अधीक्षक अभियंता यांनी लक्ष देणे  गरजे आहे

 नियोजन मंडळाने महावितरण ला देखभालिसाठी ज्यादा निधीची तरतूद करावी 

अतिवृष्टी झालेल्या तालुक्याला ज्यादा निधीची तरतूद करावी अश्या मागण्या केल्या