Home Blog Page 243

तासगाव शहरासह तालुक्यात आदेश मोडल्यास कडक कारवाई करणार पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे

तासगाव आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हॉटेल चालकावर गुन्हा दाखल

तासगाव प्रतिनिधी

सांगली जिल्हा स्थलसीमेत  जिल्हाधिकारी सो सांगली यांचे ब्रेक द चेन सी.आर.पी.सी. कलम१४४ अन्वये जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी आदेश पारित केले आहेत. सदर आदेश लागू असताना तासगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १५/४/२०२१ रोजी २०:००  वा नंतर 

गोल्डवन नाष्टा सेंटर ,पाटील वाडा ढाबा,हॉटेल टर्निंग पॉईंट,साई यश ढाबा,हॉटेल जाई यांनी सदर आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी त्यांचेवर भा द वि कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच तासगाव पोलीस ठाणे हद्दीत करीत असताना शशिकांत तुकाराम शेंडगे वय ३० रा.पेड ता.तासगाव यांच्या ताब्यातील स्विफ्ट गाडी क्रमांक एम.एच.०९ २५३६ गाडीमध्ये देशी दारू बाळगताना मिळून आल्याने त्या चार व त्याचे साथीदार तुषार पांडुरंग शेंडगे रोहन सदाशिव गलांडे यांच्यावर मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून एकूण एक लाख तीन हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर दुसर्‍या घटनेत अधिनियम कलम ३७(१) (३) अन्वये बंदी आदेश लागू आहेत पोलीस ठाणे हद्दीत १६ रोजी तासगाव पोलिस गस्त घालीत असताना पेड हद्दीत एक संशयित इसम तुषार पांडुरंग शेंडगे वय २१ राहणार वरचे गल्ली तासगाव त्याच्याजवळ दोन बेकायदेशीर तलवारी मिळून आले असून सदर तलवारी  जागेवर जप्त करून भारतीय हत्यार कायदा अधिनियम कलम४.२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*चौकट*

सध्या जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशानुसार तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तासगाव शहर व तालुक्यामध्ये कडक कारवाई करण्यात येत असून, विनाकारण फिरणारे वाहन चालक विना मास्क घेणारे नागरिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तासगाव पोलिसांनी एक आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्राफिक विभागाच्या सर्व कर्मचा-यांचे या बद्दल अभिनंदन कौतुक होत आहे परंतु तासगाव शहरातील अवैध धंद्या कडे सध्या पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे तासगाव शहरांमध्ये छुप्या पद्धतीने देशी दारू विक्री होत असून, मटका खुलेआम सुरू आहे.याचे केंद्रबिंदू तासगाव शहरातील सांगली नाका परिसर असून तासगाव पोलिस  सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्या भागातील नागरिक करीत आहेत. नुकतेच पंधरा दिवसापूर्वी तासगाव पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. तासगाव शहरात सुरू असलेल्या सर्व अवैध धंद्यावर पोलीस निरीक्षक झाडे साहेब हे कारवाई करतील अशी अपेक्षा तासगावकर  नागरिक व्यक्त करीत आहेत,परंतु या अवैध धंद्यांच्या व्यवसायावर कोणती कारवाई तासगाव पोलिसांच्या कडून होताना दिसत नाही ही तासगावकर नागरिक खंत व्यक्त करीत आहेत, परंतु पंधरा दिवस झाले अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई  खुलेआम मटका, दिवसा व रात्री राजरोस वाळू चोरी,जुगार, चोरून देशी दारूची विक्री शहरात परिसरात व तालुक्यात सुरू आहे. तरी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी तातडीने आदेश देऊन या सर्व अनेक अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी तासगावकर नागरिक करीत आहेत.

दैनिक जनमत १७ एप्रिल E paper

 

दैनिक जनमत १६ एप्रिल E paper

 

उस्मानाबाद येथील प्रभाग १५ मधील विकास कामांची प्रशासकीय मान्यता कोणी व का डावलली ?

 

संबंधितावर कारवाई न केल्यास आत्मदहनाचा  शिवसेनेचे नगरसेवक सुरज साळुंके यांचा इशारा

उस्मानाबाद दि.१० (प्रतिनिधी) – उस्मानाबाद नगर परिषद अंतर्गत नागरी दलित्तेतर वस्ती सुधार योजने अंतर्गत २०१९-२० मध्ये नगर परिषद कार्यालयाने संपूर्ण प्रशासकीय मंजुरीसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय मान्यतेसाठी दि.२० ऑगस्ट २०२० रोजी दाखल केला होता. मात्र त्या प्रस्तावास मंजुरी न देता राजकीय दबाव वापरुन रातोरात त्या कामास डावलून अधिकाऱ्यांनी संगणमत करुन इतर कामास मंजुरी दिली. त्यामुळे प्रभाग क्र.१५ मधील विकास कामास कात्री लावल्याने या भागातील नागरिकांवर एक प्रकारे अन्यायच केला आहे. याचा खुलासा प्रशासनाने करुन योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोणत्याही दिवशी व वेळी आत्मदहन करणार असल्याचा थेट इशाराच माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुरज राजेश साळुंके यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. 

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रभाव क्र.१५ मधील विकास कामापासून वंचित व मागास राहिलेल्या या भागात यापूर्वी मागील २० वर्षापासून कोणत्याही प्रकारची विकासकामे न झाल्याने ते करणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे या कामाबाबत नगरपरिषदेत कार्यालयामार्फत नगर परिषद उस्मानाबादेचा ठराव, एस्टिमेट, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची तांत्रिक मान्यता, मुख्य अधिकारी यांचे प्रशासकीय मंजुरी मिळण्याबाबत पत्र यासह संपूर्ण कागदपत्राची संचिका जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय मंजुरीसाठी रीतसर थपाठविली होती. परंतू दि.२८ मार्च २०२१ रोजी वितरित करण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता आदेशाच्या यादीमध्ये उस्मानाबाद नगर परिषदेने  सादर केलेल्या प्रभाग क्र. १५ मधील कामांचा समावेश करण्यात आलेला नाही. या प्रस्तावाची छाननी केली असता सदर चे प्रस्ताव हे रातोरात जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय दबाव वापरुन सादर केलेल्या प्रस्तावासच मागील प्रस्तावाचा विचार न करता प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांचे मोठे आर्थिक हित जोपासले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तसेच उस्मानाबाद नगर परिषदे मार्फत अनेक विकास कामांचे प्रस्ताव आपल्या कार्यालयामध्ये तांत्रिक मान्यता करुन प्रस्ताव रखडलेले आहेत. त्या प्रस्तावाची तांत्रिक मान्यता करण्यासाठी एकूण रकमेच्या एक (१) टक्के  रक्कम ही जनतेच्या पैशातून तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला वितरित केली जाते. अशा प्रकारच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी न दिल्यामुळे किती रक्कम वाया जात आहे ? याबाबत आपण चौकशी करून त्याचा आकडा निश्चित करावा व संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून महाराष्ट्र नागरी सेवा शास्ती अपील १९७९ च्या अधिनियमानुसार कारवाई करावी. 

प्रभाग क्र.१५ मधील रखडलेली विकास कामे

जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रशासकीय मान्यता न दिल्यामुळे प्रभाग क्र. १५ मधील कुंभार गल्ली येथील नाना मैराण यांचे घर ते वाघमोडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता व नाली करणे, पांढरी स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरण करणे, कसबा राम मंदिर ते लोहार मस्जिदपर्यंत नाली करणे, अंबादास दानवे यांचे घर ते जहिर काझी यांच्या घरापर्यंत नाली करणे, खरोसेकर यांचे घर ते भोसरीकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली तयार करणे, राजेंद्र पेठे यांच्या घरासमोरील सिमेंट रस्ता व नाली करणे, सूर्यवंशी दे कांबळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे व युन्नूस शेख यांचे घर ते बालाजी राऊत यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे आदी विकास कामे प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे रखडलेली आहेत. या कामास प्रशासकीय मंजुरी न देणे हे भारतीय संविधानानुसार नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणण्यासारखे असून राजकीय हेतूने प्रेरित होऊन आपण सदर कामांचे प्रशासकीय मंजुरी दिल्यामुळे आपल्या कार्यालयाकडून खुलासा योग्य त्या कायद्याच्या तरतुदी चा उल्लेख करून देखील देण्यात यावा तो न दिल्यास आपल्या दालनात कोणत्याही वेळी व कोणत्याही दिवशी आत्मदान करण्यात येईल व न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा थेट इशारा सुरज साळुंके यांनी दिला आहे. यामुळे नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेच्याच नगरसेवकाने थेट नगराध्यक्षावर आरोपांचे बाण सोडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावरून नगर परिषदेत सर्व काही आलबेल आहे असे चित्र रंगवले जात असले तरी वास्तव वेगळेच असल्याचे समोर येत आहे.

टॅक्टर ला साईट न देता धडक देऊन जातीवाचक शिवीगाळ करून मारहान पाच जना विरूध्द गुन्हा दाखल

    परंडा [दि १०एप्रील ]टॅक्टर ला साईट न देता ध्डक देऊन जातीवाचक शिवीगाळ करून आण्णा भोसले यांना  मारहान करण्यात आली ही घटणा दि ९ रोजी सायंकाळी परंडा तालूक्यातील आसू येथे घडली या प्रकरणी पाच जना विरूध्द दि १० रोजी परंडा पोलिसात ऑक्ट्रासिटी नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

        या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की आसू येथील टॅक्टर चालक राहुल भोसले हे दि ९ एप्रील रोजी टॅक्टर मध्ये गाळ भरून शेतामध्ये टाकन्या साठी जात असताना चाळशी तलावा जवळ आला असता समोरून योगेश वाघे हा टॅक्टर घेऊन तलावा कडे जात होता योगेश वाघेने राहुल भोसले यांच्या टॅक्टर ला साईट न देता धडक दिली व जातीवाचक  शिवीगाळ करून टॅक्टर मालक अविनाश जगताप व चालक  योगेश वाघे व नितीन वाघे यांनी  मारहान केली .

                या घटनेची माहिती मिळाल्यावर राहुल  भोसले यांचे वडील आण्णा भोसले यांनी जाब विचारन्या साठी रमेश जगताप यांना बोलावले व कश्या साठी माझ्या  मुलाला मारले असे विचारले असता जातीवर शिवीगाळ करीत तुम्हाला कश्याला एवढा माज असे म्हणत अविनाश रमेश जगताप,अमोल रमेश जगताप,रमेश जगताप , अमोल जगताप यांनी मारहान केली .

        या प्रकरणी आण्णा भोसले  यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वरिल सर्व आरोपी विरुद्ध अनुसुचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदया नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

       घटणेची माहिती मिळताच   उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ.विशाल खांबे,पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे,पोलिस उप निरिक्षक ससाने,पोलिस कॉन्स्टेबल गीते,चालक घोगरे यांनी घटणा स्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे .

पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे हे करीत आहेत .