Home Blog Page 242

दैनिक जनमत २८ एप्रिल E paper

 

खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाने सांगली जिल्ह्याला मिळाला ऑक्‍सिजनचा टॅंकर

तासगाव प्रतिनिधी

: सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाने

जिल्ह्याला नियमित ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध झाला आहे. यामुळे कोरोना महामारीच्या संकटात ऑक्‍सिजनची गरज असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे. कनार्टकमधील जेएसडब्ल्यू कंपनीकडून हा ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासाठी सहकार्य केले, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाने गंभीर होणाऱ्या या रुग्णांसाठी ऑक्‍सिजनची गरज असते. मात्र सध्या ऑक्‍सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनची गरज भागवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी संपर्क साधून ऑक्‍सिजन उपलब्ध करण्याची

विनंती केली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकातील जेएसडब्ल्यू कंपनीशी संपर्क साधून खासदार संजयकाका पाटील यांच्या मागणीनुसार सांगली जिल्ह्यात ऑक्‍सिजन टॅंकर पुरवण्याचे सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जेएसडब्ल्यू

कंपनीच्या व्यवस्थापनाने खासदार संजयकाका पाटील यांना सांगलीजिल्ह्यासाठी ऑक्‍सिजन टॅंकर देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार जिल्ह्याला आज एक ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध झाला आहे. इथून पुढे हा ऑक्सिजन टॅंकरचा पुरवठा असाच सुरु ठेवण्याबद्दलही जेएसडब्ल्यू कंपनीकडून ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला असल्याचेही खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.

दैनिक जनमत २७ एप्रिल E paper

 

तासगाव मध्ये कोरोनाच्या पार्श्व भूमीवर संपूर्ण शहरात, काँग्रेस व राष्ट्रवादी काँ.च्या वतीने औषध फवारणी


काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एॅड. गजानन खुजट ऍक्शन मोडमध्ये

तासगाव प्रतिनिधी/राहुल कांबळे

:तासगाव शहरात कोरोनाच्या वाढत्या  पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वतीने  तालुकाध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी पुढाकार घेत काँग्रेस आपल्या दारी या उपक्रमांतर्गत तासगाव शहरातील विविध भागांमध्ये औषध फवारणी करण्याचे काम सुरु केले होते यामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, एसटी स्टँड चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर व गुरुवार पेठ, सिद्धेश्वर रोड, वरचे गल्ली इत्यादी भागांमध्ये औषध फवारणी केली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ज्येष्ठ नेते गजानन काका कुत्ते, जिल्हा उपाध्यक्ष रविशेठ साळुंखे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील भाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष अजय पवार, माजी नगरसेवक बाबुराव माळी,संभाजी आप्पा सूर्यवंशी, दशरथ चव्हाण, गजानन गेळे, सुनील गायकवाड, चंद्रकांत माळी, अशोक गुरव, तासगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील, इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सध्या तासगाव शहरातील काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये असून तासगाव तालुका अध्यक्ष महादेव पाटील व त्यांचे सर्व काँग्रेस पक्षाचे सहकारी रस्त्यावर उतरून  तासगाव शहरातील नागरिकांच्या संपर्कात येत असल्याचे चित्र दिसत आहे.या सर्व औषध फवारणी चे सुरुवात काँग्रेस भवन येथून करण्यात आली होती. शुक्रवारी तासगांव कवठे महांकाळ विधानसभा मतदार संघा च्या आम.सुमनताई पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तासगाव शहरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता संपूर्ण शहरात  ट्रॅकटर च्या माध्यमातून औषध फवारणी  करण्यात आली आहे..मार्केट कमिटी मधील राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यालय पासुन त्याची सुरुवात करण्यात आली. ह्या सर्व ट्रॅक्टरच्या माध्यमातून संपूर्ण शहरात औषध फवारणी करण्यात आली. यावेळी तासगाव शहर राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष ऍड गजानन खुजट, माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे, नगरसेवक बाळासाहेब सावंत,  ऍड तुकाराम कुंभार,नगरसेवक अभिजित माळी,  कमलेश तांबेकर, , युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष अभिजित पाटील,यांच्या उपस्थितीत सदर चा औषध  औषध फवारणी चा कार्यक्रम पार पडला यावेळी नगरसेवक वैभव भाट,करण पवार, उदय पाटील, संदीप भैय्या पाटील, सचिन पाटील, माजी शहराध्यक्ष खंडू कदम, इद्रिस मुल्ला, युवा नेते अक्षय धाबुगडे,इ. कार्यकर्ते उपस्थित होते.तासगाव नगरपालिकेच्या निवडणुका सहा ते सात महिन्यावर येऊन ठेपल्या असून त्या अनुषंगाने विरोधी असणारे म्हणजेच तासगाव नगरपालिकेत  भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे तासगाव नगरपालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्ष यांनी आपली जबाबदारी ओळखून तासगाव शहरातील जनतेच्या प्रश्नासंदर्भात रस्त्यावर उतरण्याचे धोरण अवलंबू आल्याचे दिसत आहे. चार दिवसापूर्वी पागा गल्ली येथे स्थानिक पत्रकार, व तेथील सुज्ञ नागरिकांनी तेथील भुयारी गटार योजनेच्या भ्रष्टाचार उघड केला होता.त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी स्वतः जातीने तिथे उपस्थित राहून सदरच्या ठेकेदाराला धारेवर धरुन तेथील चुकीच्या पद्धतीने भोगस व भ्रष्टाचारी काम बंद पाडले होते व ते चांगल्या पद्धतीने पुन्हा काम करण्याची ताकीत ठेकेदाराला दिली होती, तासगाव नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील यांनीसुद्धा तातडीने तेथील बोगस व भ्रष्टाचारी कामाचा पंचनामा करून पुन्हा योग्य प्रकारे काम करण्याचे आदेश संबंधित नोबेल कंपनीच्या ठेकेदाराला दिले आहे. शुक्रवारपासून तेथील काम पुन्हा पाईप बदलणे व चांगल्या जेके कंपनीच्या सिमेंट मध्ये चेंबर बांधणे इत्यादी काम सुरू झाले आहे.सत्ताधारी भाजपच्या गोटात सध्या शांतता आहे, सत्ताधारी भाजपचे एक नगरसेवक जाफर भाई मुजावर हे लोक संपर्कात असून ते पुन्हा येणाऱ्या पाच सहा महिने वरील तासगाव नगर पालिकेच्या निवडणुकीची तयारी करीत असून वाढत्या कोरोणा पार्श्वभूमीवर शहरातील वाढत्या रुग्ण संख्येच्या अनुषंगाने काम करीत आहेत त्यांच्या वार्डमधील लोकांसाठी किंवा गरजू नागरिकांसाठी त्यांनी ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिली आहे हे विशेष होय. तासगाव नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे नेते व इच्छुक उमेदवार येन केन प्रकारे जनतेच्या संपर्कात येत असल्याचे चित्र सध्या तासगाव शहरांमध्ये दिसून येत आहे. जे विद्यमान नगरसेवक इच्छुक नाहीत त्यांची मात्र भूमिका शांत राहण्याची सद्यस्थितीत दिसत आहे. 

*चौकट*

सध्या तासगावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने तासगाव तालुक्यातील व शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या साठी खासदार संजयकाका पाटील यांच्या पुढाकाराने महिला तंत्रनिकेतन येथे ३५ बेडचे व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन सहित कोरोना रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील माने पाटील व स्वच्छता व आरोग्य अधिकारी प्रताप घाडगे, आयुब मनेर व त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर असून आहे.सदरचे कोरना बाधित रुग्णांच्या साठी  रुग्णालय हे शहरातील कस्तुरबा गांधी रुग्णालय इमारतीच्या ठिकाणी नवी झालेल्या इमारती मध्ये सुरू व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांनी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना निवेदन दिले आहे.तीच मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे तासगाव शहरातील व  तालुक्‍यातील नागरिकांची नागरिकांची सुद्धा हीच इच्छा असून तेथील इमारतीमध्ये रुग्णांची व्यवस्था झाली तर त्याचा फायदा कोरोना बाधित रुग्णांना होईल,तर दत्त माळ येथील ग्रामीण रुग्णालय येथे नागरिकांना लस देण्याचे काम अविरतपणे सुरू आहे हे तेथेही द्यावे परंतु वयस्कर लोकांची सोय म्हणून तासगाव शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये  नागरिकांची लस देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे. ग्रामीण रुग्णालय शेजारी आय.टी.आय. कॉलेजच्या इमारतीत तासगाव कवठेमंकाळ च्या आमदार सुमनताई आर आर पाटील व युवा नेते रोहितदादा पाटील यांच्या पुढाकाराने तेथेही कोरोना रुग्णासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सहित कोव्हिड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्या व्यवस्थेची पाहणी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते रोहित दादा पाटील यांनी केली आहे.

तासगाव पागा गल्ली येथे भुयारी गटार योजनेतील बोगस काम सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राहुल कांबळे यांनी केले उघड


पागागल्ली येथे बोगस काम सुरू असल्याचे समजतात काँग्रेस पक्षाचे नेते महादेव पाटील नगरपालिका विरुद्ध आक्रमक

तासगाव :-

सध्या तासगाव शहरांमध्ये भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून तासगाव शहरातील 50 ते 60 टक्के भागातील सांडपाणी वाहून सांगली नाका पागा गल्ली परिसरात आणून तेथून कापूर ओढ्याकडे तीनशे एमएम जाडीच्या सिमेंट पाईप मधून सदरचे सांडपाणी वाहून नेण्यात येणार आहे. सध्या त्या भागातील दोनशे ते तीनशे मीटर चे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून थोड्या कडून या कामाला सुरुवात झाली असून गेले आठ ते दहा दिवस ते काम सुरू आहे परंतु पागा गल्ली भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राहुल कांबळे यांच्या घराच्या परिसरामध्ये सदरचे काम सुरू होते. परंतु आज त्या भागातील अनुभवी गवंडीकाम करणाऱ्या व्यक्तीने चेंबरचे   बांधकाम हे बोगस असून सिमेंट हलक्या दर्जाचे व पाणी न मारता वीट न भिजवता केले असून एका दिवसांमध्ये 12 फुटाचे उंचीचे चेंबर उभा करून ते फुटलेल्या अवस्थेत मुजवण्याचा प्रयत्न आज सकाळी करण्यात आला होता. सदरची बाब पत्रकार राहुल कांबळे यांच्या निदर्शनास येताच त्या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांनी सदरच्या ठेकेदाराला धारेवर धरले आणि बोगस काम बंद करण्याचे सांगितले. सदाची हे बाप काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव नाना पाटील जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र शेठ साळुंखे यांच्या निदर्शनास आणून दिले असता तातडीने दोन्ही नेते तसेच डॉक्टर व युवा नेते शरद शेळके यांनी सदरच्या ठिकाणी धाव घेतली आणि सदरचे बोगस काम आहे हे सह्या सर्वांच्या लक्षात येताच शरद शेळके यांनी सदरची घटना फेसबुक वर लाईव्ह केली. तातडीने नगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी प्रताप घाडगे यांना दूर करून सदरची माहिती दिली व त्यांना बोलावून घेण्यात आले वस्तुस्थिती आल्यानंतर प्रताप घाडगे यांना सदर चे सर्व काम बोगस असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तातडीने सर्व गोष्टीचा पंचनामा केला. त्या पंचनाम्यावर पागा गल्ली भागातील शेकडो नागरिकांनी  उस्फूर्तपणे सह्या केल्या आहेत हे विशेष होय. पुन्हा सायंकाळी सहा वाजता तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने-पाटील, इंजिनीयर चेतनकुमार माळी, आरोग्य अधिकारी प्रताप घाडगे याने सदस्य कामावर पुन्हा भेट दिली यावेळी सदरचा प्रकार असा ओल्ड उघडकीस आणला याबद्दलची माहिती पत्रकार राहुल कांबळे यांनी पृथ्वीराज पाटील मुख्याधिकार्‍यांना दिली, यावेळी सदरचे ठेकेदाराचा सुपरवायझर व त्यांचे कर्मचारी हजर होते त्यावेळी एका चेंबूर पासून दुसऱ्या चेंबूर पर्यंत ३५० एम.एम.जाडीच्या पाइपच्या मध्ये तीन पाईप ३०० एम.एम.जाडीच्या पाईप घातल्याचे निदर्शनास आणून दिले, तसेच पेन्ना कंपनीच्या कमी प्रतीच्या सिमेंटचा वापर केल्याचे लक्षात आणून दिले. यावेळी एक केलेले निकृष्ट दर्जाचे चेंबर तातडीने जेसीबीने पाडण्यात आले. आणि हे चेंबर उत्कृष्ट सिमेंटच्या वापराने पुन्हा उद्या सकाळी बांधण्याचे आदेश दिले तसेच तीनशे एमएम जाडीच्या पाइप उद्या पुन्हा जेसीबीने उकडून कोटेशन प्रमाणे 300m जाडीच्या सिमेंट पाइप घालण्याचे तातडीचे आदेश दिले अन्यथा योग्य ती कारवाई करण्याची सक्त सूचना व आदेश कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सदर च्या ठेकेदाराला दिली आहे. सध्या तासगाव शहरात भुयारी गटार योजना सुरू असून प्रत्येक भागामध्ये कशा पद्धतीचे काम चालू आहे त्या त्या भागातील नागरिकांनी डोळ्यात तेल घालून पाणी गरजेचे आहे प्रत्येक भागातील नागरिक दबक्या आवाजात बोलत असतात की काम बरोबर नाही काम बोगस आहे. परंतु नागरिक पुढे येताना व तक्रार करताना दिसत नाहीत. मध्यंतरी संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष अमोल कदम यांनी शिंदे गल्ली भागांमध्ये सुरू असलेले बोगस काम बंद पाडले होते व एमजीपी अधिकाऱ्यांना बोलावून त्या गोष्टीचा पंचनामा करून पुन्हा ते काम करण्यास भाग पाडले होते हे विशेष होय तसेच गेल्या वर्षी सदरचे काही भागांमध्ये बोगस काम असल्याचे राष्ट्रवादीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या निदर्शनास आले होते ते काम त्यावेळी त्या नगरसेवकांनी बंद पाडले होते परंतु आता पुन्हा हे भुयारी गटार योजनेचे काम कसे काय सुरू झाले याची उघड चर्चा तासगावकर नागरिक करत आहेत.पागागल्ली येथील  भुयारी गटार योजनेतील बोगस बांधकामाचा प्रकार उघडकीस आल्याने याबाबतीत तासगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव नाना पाटील आक्रमक झाले असून उद्या अकरा वाजता मुख्याधिकारी तासगाव यांना आपल्या शिष्टमंडळ सहित भेटणार असून तासगाव शहरांमध्ये ज्या ज्या भागांमध्ये बोगस काम सुरू आहे असे नागरिकांच्या निदर्शनास आले असेल तर त्यांनी तातडीने आमच्याकडे  तक्रार करावी आम्ही सदरचे बोगस काम पुन्हा योग्य रीतीने करू कारण जनतेच्या पैशाचा अशा पद्धतीने  सत्ताधारी व विरोधी पक्ष मिलीभगत करून उधळपट्टी जर करत असेल तर कुठल्या परिस्थितीत तासगावकर नागरिक सहन करणार नाहीत. आज तासगाव शहरातील पागागल्ली येथील एक घटना उघडकीस आली आहे परंतु अशा इतर भागात घडू नये यासाठी तासगाव शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भुयारी गटार योजनेतील सांगली नाका पागा गल्ली परिसरातील बोगस काम सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राहुल कांबळे यांनी उघडकीस आणल्याने पागा गल्ली भागातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.