Home Blog Page 240

एचआरसीटी स्कोअर 18, ऑक्‍सिजन लेव्हल 70 आसताना होमगार्डसाठी देवदूत हाेऊन आले अतिरिक्त पाेलीस अधिक्षक अतूल झेंडे

 

 मगरवाडी/प्रतिनिधी

पंढरपूर येथे पोटनिवडणुकीच्या निकालादिवशी कर्तव्य बजावत असताना, वडिलांना कोरोनाची (Covid-19) लागण झाली. एचआरसीटी स्कोअर (HRCT Score) 18 तर ऑक्‍सिजन लेव्हल (Oxygen Level) 70 इतके आले. त्यामुळे प्रकृती खालावली. वेळेवर बेड मिळेना, ना इंजेक्‍शन. त्यात कोरोना महामारीच्या घटना कानावर येत असल्याने समोर सर्वत्र काळोख दिसत होता. अशा संकटात असताना खाकी वर्दीतील माणुसकी मदतीला धावून आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे तातडीने उपचारासाठी सर्व सोयी उपलब्ध झाल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दररोज आरोग्याची विचारपूस करून मानसिक आधार दिल्याने, सर्वांच्या सहकार्यामुळे या महामारीच्या काळात माझ्या वडिलांचा पुनर्जन्म झाला.

पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पंढरपूर येथे करमाळा तालुक्‍यातील होमगार्ड कर्मचारी सोमनाथ महादेव ढेपे (वय 43) हे गेले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्या उपचारासाठी दवाखान्यात धाव घेतली. एचआरसीटी केली असता स्कोअर 18 इतका आला तर ऑक्‍सिजन पातळी 70 वर व आणखी कमी होत असल्याने, बेड मिळवण्यासाठी कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यात कुटुंबप्रमुख असलेले ढेपे यांनाच कोरोनाने घेरले. तर दुसरीकडे दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांच्या नवनवीन घटना ऐकायला मिळत असल्याने कुटुंब पूर्णपणे हवालदिल झाले.”आम्ही आहोत तुमच्यासोबत !’ रुग्ण, नातेवाईक, रुग्णालयांच्या मदतीसाठी सहा तरुणांची धडपड

अशा कठीण परिस्थितीत खाकी वर्दीतील माणुसकी मदतीला धावून आली. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूरचे पोलिस उपअधीक्षक विक्रम कदम व पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी स्वतःहून पुढाकार घेत पंढरपुरात बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध केले. परंतु होमगार्ड ढेपे यांना तत्काळ इंजेक्‍शन व महागड्या गोळ्या- औषधांची गरज होती. यासाठी स्वतः होमगार्डचे जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांनी अवघ्या दोन तासांत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची सोय करून दिली. तर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस कल्याण निधीतून महागड्या गोळ्या- औषधांच्या खरेदीसाठी मोठी आर्थिक मदत केली.

अत्यंत नाजूक अशी परिस्थिती असलेल्या होमगार्ड ढेपे यांच्या प्रकृतीबद्दल स्वतः अप्पर पोलिस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अतुल झेंडे व पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, होमगार्ड कार्यालयातील मोरे, ठाकूर, घाडगे यांनी जातीने लक्ष घालून दैनंदिन माहिती घेऊन, कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी मानसिक पाठबळ व आधार दिला. एका कर्मचाऱ्याच्या उपचाराच्या खबरदारीसाठी स्वतःहून होमगार्ड जिल्हा समादेशकसह पोलिस प्रशासन एवढी तत्परता दाखवत असल्याने सोमनाथ ढेपे व कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला. सर्वांच्या मानसिक आधारामुळे व्हेंटिलेटरवर आरोग्याची नाजूक परिस्थिती असताना देखील, होमगार्ड सोमनाथ ढेपे यांनी दहा दिवसांत कोरोनावर मात केली आहे.

सध्या या महामारीच्या काळात नागरिकांना दररोज कित्येक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत असताना, अशात एचआरसीटी स्कोअर 18 तर ऑक्‍सिजन 70 असे कोरोनाबाधित असलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्यासाठी होमगार्ड जिल्हा समादेशक ते सर्व पंढरपूर पोलिस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केल्यामुळे होमगार्ड ढेपे यांनी कोरोनावर मात केली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केल्याने, तसेच पंढरपूर पोलिसांनीही होमगार्ड ढेपे यांच्या उपचारासाठी अथक प्रयत्न केल्यामुळे व ढेपे यांनी कोरोना झाल्यानंतर दाखवलेली मानसिक स्थितीही महत्त्वाची होती. त्यामुळे ते लवकर कोरोनामुक्त झाले. पोलिस कर्मचारी व होमगार्ड असा कोणताही दुजाभाव नसतो. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यांसाठीही आम्ही सदैव तत्पर आहोत.


– अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

दैनिक जनमत १४ मे E paper

दैनिक जनमत १३ मे E paper

जनता कर्फ्यु; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची परंडा शहरासह तालुक्यात कडक अंमलबजावणी सुरू

 

परंडा ( दि ८ मे) उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा संसर्ग दिवसेन् दिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखन्या साठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने दि ८ मे ते १३ मे पर्यंत संपुर्ण उस्मानाबाद  जिल्हात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे .

          या जनता कर्फ्यू काळात दवाखाने,मेडीकल,चष्मा दुकान शासकीय विमा कार्यालय यांना पुर्ण वेळ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे .

तर सर्व अस्थापणे,शहर हद्दीतील पेट्रोल पंप पुर्ण पणे  बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत

              जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या अनुशंगाने परंडा शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यूचीची महसुल,पोलिस, नगरपरिषद प्रशासनाने कडक अमल बाजावणी सुरू केली असून पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे,नायब तहसिलदार मीलींद गायकवाड,नायब तहसिलदार गणेश सुपे,नायब तहसिलदार सुजित वाबळे,व नगर परिषद यांच्या पथकाने जनता कर्फ्यू आदेशाचे उलंघन करणाऱ्यां नागरीकांवर दंडात्मक कारवाई केली .   कोरोना चा संसर्ग परंडा शहरासह ग्रामीण भागात मोठया प्रमाणात वाढल्याने रुग्णालयात बेड अपुरे पडत असल्याने रुग्णास अडमीट करुन घेताना आरोग्य यंत्रनेस मोठी कसरत करावी लागत आहे.अशी भयान परिस्थीती तालुक्यातनिर्माण झाली आहे .  दि८ मे पर्यत परंडा तालूक्यात कोरोनाचे ४९४ रुग्ण आसुन परंडा उप जिल्हा रुग्णालयात ६० रूग्णावर तर डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्ती गृह येथील कोवीड सेंटर मध्ये ६९ रुग्णावर तर संत मीरा स्कुल येथील कोवीड सेंटर मध्ये ५५ अश्या एकुन १८९  रुग्णावर उपचार सुरू असुन ३०५ रुग्णावर गृह विलगीकरण करून अरोग्य विभाच्या वतीने उपचार करण्यात येत आहेत.तर १२ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे

कोरोना व सारी रुग्ण मुत्यूच्या आकड्यात दिवसेन दिवस वाढ होत असुन आज पर्यंत ९८ रूग्णांचा कारोना मुळे तर सारी मुळे १३ असे एकुन १११ रूग्णांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला आहे .दि ७ मे रोजी सायंकाळी ३ रुग्णाचा मुत्यु झाला या मध्ये देवगाव खुर्द,मलकापुर,सोनारी येथील रूग्णाचा समावेश आहे तर दि ८ रोजी सकाळी कंडारी येथील एका रुग्णाचा मुत्यू झाला आहे .

       परंडा तालूक्यातील १०गावे मागील तीन दिवसा पूर्वी हॉट स्पॉट झोनमध्ये होती त्यात भर पडुन तीन दिवसात अनखी६गवे हॉट स्पॉट झोनमध्ये आली असुन परंडा तालुक्यातील एकुन १६गावे हॉट स्पॉट झोन झाली आहेत.या मुळे अरोग्य विभावर मोठा तान आला आहे.

 चौकट..नागरीकांनी प्रशासनाच्या सुचनाचे काटेकोर पालन करावे…

    तालुक्यात कीरोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी तालुक्यातील प्रत्यक नागरीकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सुरक्षीता बाळगत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे

अहवाहान पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे यांनी तालुक्यातील नागरीकांना केले आहे.

तासगांव शहरातील कस्तुरबा गांधींच्या नूतन इमारतीस काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांची पाहणी

नूतन इमारतीमध्ये आठ दिवसात शंभर बेडचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सहित कोव्हीड सेंटर सुरू करण्यासंदर्भात मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याशी चर्चा

कोव्हिड रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन

आठ दिवसात नूतन कस्तुरबा रुग्णालयात मोफत कोव्हिड सेंटर सुरू न झाल्यास तासगावातील जनतेच्या रोषास सामोरे जावे लागण्याची शक्यता

तासगाव प्रतिनिधी /राहुल कांबळे

 तासगाव शहरांमध्ये जुन्या काळातील शासकीय महाविद्यालय मिरज संलग्नीत कस्तुरबा रुग्णालय नावाने रुग्णालय सुरू होते. परंतु तेथे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सुरू करण्यासाठी गेले दोन ते तीन वर्षे पाच ते सहा कोटी रुपये खर्चून काम सुरू असून ते सध्या पूर्णत्वास आले आहे. सद्यस्थितीत शहरातील कोरोना रुग्णांसाठी ते सुरू करता येऊ शकते, सांगली जिल्ह्यात व तासगाव शहरासह तालुक्यात कोरोनाबाधीत रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना रुग्णांसाठी बेड ची व्यवस्था होत नसल्याने तासगांव शहरातील कस्तुरबा गांधी दवाखाना  लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत कोव्हिड रुग्णांसाठी मोफत सेवेसाठी हॉस्पिटल सुरु करावे यासाठी तासगांव शहर काँग्रेस, शिवसेना,संभाजी ब्रिगेड, माहिती अधिकार चे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे व तासगाव शहरातील विविध सामाजिक संघटना यांनी खूप दिवसांपासून नूतन इमारतीमध्ये कोव्हीड सेंटर सुरू करण्यात यावे यासाठी ची मागणी  लावून धरली आहे. सदरचे काम नोबेल प्रा.ली. कंपनीकडे असून ते काम सत्ताधारी गटातील एका वजनदार मोठ्या नगरसेवकाने घेतले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच त्या ठेकेदाराने सब कॉन्ट्रॅक्टर नेमले असून सदरचे इमारतीचे काम पूर्ण झाले असून फक्त प्लंबिंग व लाईट फिटिंग चे काम बाकी आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे नेते महादेवनाना पाटील शिवसेनेचे नेते माजी नगराध्यक्ष अविनाश काका पाटील व शहरप्रमुख संजय दाजी चव्हाण, शिवसेना नेते अरुण नाना खरमाटे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमोल कदम, रवी शेठ साळुंखे, शरद शेळके, यांनी तासगाव शहरातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना सोबत घेऊन सदरची बाब निदर्शनास आणून दिली यावेळी त्यांनी तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील व इंजिनियर नदाफ यांना समक्ष नूतन इमारतीमध्ये बोलावून घेऊन येते लवकरात लवकर सर्व सामान्य नागरिक यांच्यासाठी मोफत उपचारासाठी कोव्हीड सेंटर सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली यावेळी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी तातडीने हॉस्पिटल सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या असताना सुद्धा जाणून-बुजून चालढकलपणा करीत राजकारण करीत असल्याचा व तासगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचारापासून वंचित ठेवण्याचा आरोप सत्ताधारी गटावर केलेला आहे.सदरच्या जुन्या कस्तुरबा रुग्णालय मध्ये शासकीय स्टाफ सुद्धा मंजूर असून सदर चे रुग्णालय तात्पुरते छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये सध्या कार्यरत आहे.यावेळी बोलताना सर्वपक्षीय नेते म्हणाले की आम्हाला या संदर्भात कोणतेही राजकारण करायचे नाही परंतु सर्वसामान्य नागरिकांचा उपचाराविना जीव तडफडत असून कित्येक नागरिक उपचाराविना मृत्यू पावल्याची घटना शहरात घडली आहे नागरिकांना उपचारासाठी पैसे नसल्याने घरीच उपचार नागरिक घेत असून त्यांची उपचाराविना फरपट होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे तरी आठ ते दहा दिवसांमध्ये सदरचे कस्तुरबा रुग्णालय सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांना भेटण्यासाठी सदर सर्वपक्षीय शिष्टमंडळ सांगली येथे  कस्तुरबा रुग्णालयाच्या नूतन इमारतीमध्ये कोव्हीड सेंटर सुरू करण्याच्या संदर्भात चे निवेदन देण्यात आले आहे यावेळी तासगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव पाटील युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद शेळके , शिवसेनेचे नेते अरुणनाना खरमाटे,माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, तासगाव शिवसेना शहरप्रमुख संजय दाजी चव्हाण, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, महेश पाटील, संभाजी ब्रिगेड ची तालुकाध्यक्ष अमोल कदम इ. उपस्थित होते. तरी तासगाव तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या प्रमुख तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांना जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी तातडीचे आदेश देऊन येत्या आठवडाभरात कस्तुरबा रुग्णालय नूतन इमारतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या साठी १०० बेडचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सहित कोव्हिड हॉस्पिटल सुरू करायच्या सूचना द्याव्यात अशी अपेक्षा तासगावकर नागरिक व्यक्त करीत आहेत. हॉस्पिटल सुरू करण्यासाठीची जी काही मदत लागेल ते पालकमंत्री ना.जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम करतील सध्या कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असल्याने यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एका विचाराने सदरचे नूतन कस्तुरबा रुग्णालय सुरु करून तासगावकर नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता तासगावकर नागरिकांच्यातून जोर धरू लागली आहे. 

*चौकट*

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव शहर अध्यक्ष एड. गजानन खुजट     यांच्याशी कस्तुरबा रुग्णालय तातडीने सुरु करण्या संदर्भात संपर्क केला असता त्यांनी असे सांगितले की गेल्या आठवड्यात पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांचे सोबत आढावा बैठकीमध्ये आमदार सुमनताई पाटील यांनी हा विषय उपस्थित केला होता. यावेळी तहसीलदार व मुख्याधिकारी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे व माहिती अधिकाराचे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांनी या बाबतीत हॉस्पिटल सुरू होण्याच्या संदर्भात  मागणी केली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी सो सांगली यांना  तातडीने कस्तुरबा रुग्णालय नूतन इमारतीमध्ये कोव्हिड सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून प्रसंगी ज्यादाचे ४ ठेकेदार नियुक्त करून आठ ते दहा दिवसात काम पूर्ण करून तेथे तातडीने रुग्णालय सुरू करण्याची सूचना दिल्याची माहिती  एॅड.खुजट यांनी दैनिक जनमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.