३० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिनचे सावंत,साळुके यांच्या हस्ते उपजिलहा रुग्णालयात लोकार्पण
परंडा (प्रतिनिधी)कोरोना संकट काळात परंडा तालुक्यातील रुग्णाची वाढती संख्या व त्या प्रमानात ऑक्सिजनचा तुटवडा हे लक्षात घेता. माजी मंत्री आमदार, प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी स्वखर्चाने 30 ऑक्सिजन काँन्सनट्रेटर मशीन खरेदी करुन परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या या ऑक्सिजन काँन्सनट्रेटर मशीनचे लोकार्पण जि.प. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अरोग्य सभापती धनंजय सावंत व जिल्हा परिषदेचे क्रर्षी व पशुसंवर्धन.सभापती दत्ता साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके,माजी नगरअध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव,नगरसेवक रत्नाकांत शिंदे,मकरंद जोशी, अब्बास मुजावर,दत्ता रनभोर, नायब तहसिलदार मिलींद गायकवाड ,डॉ.पवार,डॉ.पाटील व वैद्यकीय पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेले डॉ.गुळभिले
आमचं फॅमिली डॉक्टर गुळभिले डॉ यांच्या शी गेली पंधरा वर्षे म्हणजे आमचं आज्जी आजोबा होते तेव्हा पासून ऋणानुबंध आहेत. अतिशय समजुन साांगत पेशंटला धीर देणे तु लवकर बरा होणार काळजी करु नको मी आहे ना म्हणून पेशंटशी घरातील सदस्यांप्रमाणे एकरुप होणारे डॉ म्हणून मी डॉक्टर मिलिंद गुळभिले यांना मानतो…त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून निम्म्यारात्री पेशटचा फोन उचलणारे त्यांचे चिरंजीव डॉ तुषार गुळभिले यांची ओळख पिलीव भागात झाली आहे… कधी खिशात रुपया नसला तरी मोठे डाक्टर यांनी लोकांना ॲडमीट करून पैसे परत घेतले पैशासाठी कधीही अडवणूक न होणारे डॉ म्हणून मोठे डाक्टर यांचा परिचय आहे…पिलीव सारख्या भागात मुतखडा व इतर आपरेशन होतात हे पिलीवच्या शिरपेचात डॉ तुषार गुळभिले यांनी मानाचा तुरा रोवला…. आज मोठ्या डॉ चा वाढदिवस होता खुप इच्छा होती भेटायची पण मी बाहेरगावी असलेमुळे भेटु शकलो नाही…. एक लहानपणी चा किस्सा सांगतो मी दहा वर्षाचा होतो साधारण एकोणिशे पंच्च्यानव शहान्नवचा काळ असेल माजी आज्जी आजारी पडली की मोठं डॉ सुझुकी गाडीवरुन बचेरीत एक नंबर तलाव जवळ माझ्या घरी येऊन सलाईन लावायाचे आम्हाला डॉ सलाईन मोटारसायकल याचं खुप नवल वाटायचं असो सांगायचा उद्देश येवढाच आज अक्षय हास्पीटलचे वटवृक्षात रूपांतर झाले यापाठीमागे मोठं डॉ यांचं खुप त्याग कष्ट चिकाटी आहे तेव्हा हे दिवस आले खरच मोठे डाक्टर म्हणजेच मिलिंद गुळभिले तुमचं कौतुक करायला माझ्याकडं शब्द अपुरे आहेत… अशीच सेवा आम्हा युवा पिढीला भविष्यात छोटे डॉ तुषार गुळभिले देतील येवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो पुन्हा एकदा तुमच्या सर्व परिवाराला मानाचा मुजरा पत्रकार विश्वजीत गोरड (M.A.b.ed) व सदस्य ग्रामपंचायत बचेरी
एचआरसीटी स्कोअर 18, ऑक्सिजन लेव्हल 70 आसताना होमगार्डसाठी देवदूत हाेऊन आले अतिरिक्त पाेलीस अधिक्षक अतूल झेंडे
मगरवाडी/प्रतिनिधी
पंढरपूर येथे पोटनिवडणुकीच्या निकालादिवशी कर्तव्य बजावत असताना, वडिलांना कोरोनाची (Covid-19) लागण झाली. एचआरसीटी स्कोअर (HRCT Score) 18 तर ऑक्सिजन लेव्हल (Oxygen Level) 70 इतके आले. त्यामुळे प्रकृती खालावली. वेळेवर बेड मिळेना, ना इंजेक्शन. त्यात कोरोना महामारीच्या घटना कानावर येत असल्याने समोर सर्वत्र काळोख दिसत होता. अशा संकटात असताना खाकी वर्दीतील माणुसकी मदतीला धावून आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे तातडीने उपचारासाठी सर्व सोयी उपलब्ध झाल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दररोज आरोग्याची विचारपूस करून मानसिक आधार दिल्याने, सर्वांच्या सहकार्यामुळे या महामारीच्या काळात माझ्या वडिलांचा पुनर्जन्म झाला.
पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पंढरपूर येथे करमाळा तालुक्यातील होमगार्ड कर्मचारी सोमनाथ महादेव ढेपे (वय 43) हे गेले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्या उपचारासाठी दवाखान्यात धाव घेतली. एचआरसीटी केली असता स्कोअर 18 इतका आला तर ऑक्सिजन पातळी 70 वर व आणखी कमी होत असल्याने, बेड मिळवण्यासाठी कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यात कुटुंबप्रमुख असलेले ढेपे यांनाच कोरोनाने घेरले. तर दुसरीकडे दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांच्या नवनवीन घटना ऐकायला मिळत असल्याने कुटुंब पूर्णपणे हवालदिल झाले.”आम्ही आहोत तुमच्यासोबत !’ रुग्ण, नातेवाईक, रुग्णालयांच्या मदतीसाठी सहा तरुणांची धडपड
अशा कठीण परिस्थितीत खाकी वर्दीतील माणुसकी मदतीला धावून आली. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूरचे पोलिस उपअधीक्षक विक्रम कदम व पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी स्वतःहून पुढाकार घेत पंढरपुरात बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध केले. परंतु होमगार्ड ढेपे यांना तत्काळ इंजेक्शन व महागड्या गोळ्या- औषधांची गरज होती. यासाठी स्वतः होमगार्डचे जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांनी अवघ्या दोन तासांत रेमडेसिव्हिर इंजेक्शनची सोय करून दिली. तर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस कल्याण निधीतून महागड्या गोळ्या- औषधांच्या खरेदीसाठी मोठी आर्थिक मदत केली.
अत्यंत नाजूक अशी परिस्थिती असलेल्या होमगार्ड ढेपे यांच्या प्रकृतीबद्दल स्वतः अप्पर पोलिस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अतुल झेंडे व पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, होमगार्ड कार्यालयातील मोरे, ठाकूर, घाडगे यांनी जातीने लक्ष घालून दैनंदिन माहिती घेऊन, कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी मानसिक पाठबळ व आधार दिला. एका कर्मचाऱ्याच्या उपचाराच्या खबरदारीसाठी स्वतःहून होमगार्ड जिल्हा समादेशकसह पोलिस प्रशासन एवढी तत्परता दाखवत असल्याने सोमनाथ ढेपे व कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला. सर्वांच्या मानसिक आधारामुळे व्हेंटिलेटरवर आरोग्याची नाजूक परिस्थिती असताना देखील, होमगार्ड सोमनाथ ढेपे यांनी दहा दिवसांत कोरोनावर मात केली आहे.
सध्या या महामारीच्या काळात नागरिकांना दररोज कित्येक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत असताना, अशात एचआरसीटी स्कोअर 18 तर ऑक्सिजन 70 असे कोरोनाबाधित असलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्यासाठी होमगार्ड जिल्हा समादेशक ते सर्व पंढरपूर पोलिस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केल्यामुळे होमगार्ड ढेपे यांनी कोरोनावर मात केली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केल्याने, तसेच पंढरपूर पोलिसांनीही होमगार्ड ढेपे यांच्या उपचारासाठी अथक प्रयत्न केल्यामुळे व ढेपे यांनी कोरोना झाल्यानंतर दाखवलेली मानसिक स्थितीही महत्त्वाची होती. त्यामुळे ते लवकर कोरोनामुक्त झाले. पोलिस कर्मचारी व होमगार्ड असा कोणताही दुजाभाव नसतो. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यांसाठीही आम्ही सदैव तत्पर आहोत.
– अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण








































































