Home Blog Page 216

देवळाली मध्ये काँग्रेसने ग्रामस्थांसोबत केली महागाईवर चर्चा

उस्मानाबाद – कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईचा मोठा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढल्याने जनता त्रस्त झाली आहे. अगोदरच हाताला काम नाही त्यातच  खाद्यतेलापासून पेट्रोल डिझेलपर्यंत सर्वकाही महागलं आहे काँग्रेस सेवादलाच्या वतीने गावोगावी जाऊन  ग्रामस्थांबरोबर महागाई विषयी चर्चा करण्यात येत आहे  उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली येथे काॅंग्रेस सेवादल यांची महागाई विषयी बैठक घेण्यात आली या बैठकीला ग्रामस्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती या बैठकीला सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू,यंग ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रशांत डिकले,सेवादल तालुकाध्यक्ष मेहराज शेख,तसेच जयसिंग सूर्यवंशी,वसंत देशमुख,निजाम शेख,जर्नाधन माने,सचिन माने,प्रमोद पाटील,सुशील माने,संतोष पानढवळे,खाजाभाई शेख, मेहबूब देशमुख,दादा भोसले,आण्णा घोडके,बापू गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते

१३ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

  १३ सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १२  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक  १३ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिनांक १२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विशाल खांबे यांचा सत्कार



भूम (शब्बीर सापवाले)

भुम येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय (DYSP) पोलीस अधिकारी विशाल खांबे यांची बदली अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद येथे प्रतिनियुक्ती झाल्याबद्दल भारतीय मराठा महासंघच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय मराठा महासंघाचे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंके, भारतीय मराठा महासंघ सदस्य उमेश दुरूंदे,भारतीय मराठा महासंघ भुम तालुका सचिव शिवाजी टाळके, पांडुरंग कोरे इ.उपस्थित होते व पुढिल कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

पंधराव्या वित्त आयोगाचा सव्वीस कोटी रुपयांचा निधी अखर्चित

 पंधराव्या वित्त आयोगाचा सव्वीस कोटी रुपयांचा निधी अखर्चित

पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रत्येकी १० टक्के विकासनिधी एक वर्षापासून खात्यावरच

उस्मानाबाद :  पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेमधून पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येकी १० टक्के निधी खर्चाचे आर्थिक अधिकार महाराष्ट्र राज्य सरकारचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय अध्यादेश काढून जाहीर केले आणि त्याप्रमाणे जिल्हा परिषदेला बेसिक ग्रँटचे चार हप्ते देखील प्राप्त झालेले आहेत एकीकडे ग्रामपंचायतचा निधी वर्ग करून विकासकामे चालू केलेली आहेत परंतु गत एक वर्षात पंचायत समितीला फक्त बंधीत व अबंधीतचे तीन हप्ते वर्ग जमा केलेले आहेत परंतु दोन बंधीत व अबंधीताचे हप्ते वाटप वर्ग न करता जिल्हा परिषदेच्याच खात्यावर पडून असल्याने पंचायत समिती सदस्यांच्या व जिल्हा परिषद सदस्यांच्या गणातील विकास कामांना खीळ बसत असल्यामुळे याबाबत महाराष्ट्र पंचायत समिती संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे,शाम जाधव,संजय लोखंडे,आशिष नायकल,तसेच जिल्ह्यातील उस्मानाबाद,तुळजापूर,परांडा,भूम,वाशी,कळंब,उमरगा,लोहारा पंचायत समितीमधील सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्य यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत दाताळ साहेब यांची पंचायत समिती उस्मानाबाद या ठिकाणी बैठक आयोजित केली होती या बैठकीत पंचायत समितीच्या १० टक्के विकासनिधी खर्चाबाबत,पंचायत समिती सदस्याच्या विकासानिधीमधून केलेल्या कामाची देयके व त्याबाबत उद्भवणाऱ्या सर्व तृटीची पूर्तता गटविकास अधिकारी याना सांगून पूर्ण करू तसेच पंचायत समिती सदस्यांच्या 10 टक्के निधीमधील उर्वरीत बंधीत व अबंधीत दोन्ही हप्ते लवकरात लवकर जमा करून तातडीने तो खर्च करण्याकरीता कार्यवाही करू असे सांगितले.

तसेच येत्या काळात जिल्ह्यातील काही निवडणुका देखील असल्याने हा निधी खर्च करताना आचार संहितेच्या कचाट्यात देखील अडकू नये याकरिता लवकरात लवकर पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांच्या १० टक्के आर्थिक निधी वर्ग करून लवकरात लवकर खर्च करावा अशी मागणी सदस्यांमधून येत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना दहा टक्के वाटप सन २०२० – २०२१

जिल्हा परिषद उस्मानाबाद  – बंधीत व अबंधीत रक्कम १३१८६८०००

पंचायत समिती भूम = ११६५५४६४

पंचायत समिती कळंब = १८५८१६७२

पंचायत समिती लोहारा = १०३९२२२४

पंचायत समिती उमरगा = २०२०१०१२

पंचायत समिती उस्मानाबाद = २८७३०९६८

पंचायत समिती तुळजापूर = २२५८४९०४

पंचायत समिती परांडा = १२२०२१२०

पंचायत समिती वाशी = ७५१९६३६

एकीकडे निधी नाही म्हणून महाराष्ट्रभर पंचायत समिती सदस्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढा दिला परंतु निधी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या उदासीनतेमुळे निधी खर्च होत नाही व ज्यांनी खर्च केला त्यांची देयके प्रशासकीय बाबींची पंचायत समिती व जिल्हास्तरावर पूर्तता प्रशासनाकडून होत नसल्याने जमा होत नाहीत तरी लवकरात लवकर निधी खर्च करून पंचायत समिती,जिल्हापरिषद स्तरावर प्रशासकीय बाबींची पूर्तता करावी अन्यथा लक्षवेधी आंदोलन जिल्हापरिषद समोर करू असे मत गजेंद्र राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.



महाराष्ट्रभर पंचायत समिती सदस्यांचे संघटन उभा करून वेळोवेळी शासन दरबारी आंदोलने करून पंचायत समिती सदस्यांच्या लढ्याला यश मिळाले आहे परंतु निधी प्राप्त झालेला असताना जिल्हापरिषद व पंचायत समिती स्तरावर खर्च न करता खात्यावर ठेवल्याने ग्रामीण भागातील विकासाला आळा बसत आहे प्रत्येक तात्काळ निधीच्या कामांना मंजुरी देऊन निधी खर्च करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर पंचायत समिती सदस्यांचे आंदोलन उभा करू असे मत दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केले

शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब करुन उत्पन्न वाढवावे – अपर मुख्य सचिव नंदकुमार

      उस्मानाबाद,दि.11:- पाण्याचे अपव्यय टाळून आणि ठिबक सिंचनाचा वापर करुन शेती करणारा प्रत्येक शेतकरी लखपती बनू शकतो. ठिबक लावल्याने प्रती एकर 30 ते 40 टक्के उत्पन्नात वाढ होणे शक्य आहे ,  असे प्रतिपादन रोहयो , मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी आज येथे केले.                         

 जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जलसंधारण आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत  ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि प चे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश बिराजदार, राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे, राज्य प्रकल्प अधिकारी श्रीमती सायली घाणे आणि जिल्हा परिषद व महसूल विभागातील विभागप्रमुख उपस्थित होते.

पाण्याच्या प्रत्येक थेंबातून आणि मातीच्या प्रत्येक कणातून उत्पन्न वाढवणे शक्य आहे. त्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांची मानसिकता तयार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी समृध्द व्हावे ही आपली प्रथम प्राथमिकता असली तरच समृध्द शेतकरी हा समृध्द महाराष्ट्राचा पाया रचेल. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याच्या उध्दारासाठी शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे असे निर्देश श्री.नंदकुमार यांनी यावेळी दिले.

शेतीतील उत्पन्नात वाढ करण्यासाठी पाण्याचे अपव्यय टाळणे ही काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर शेतीसोबत इतर जोडधंद्यांबाबतही शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे अपेक्षित आहे, असेही श्री. नंदकुमार यावेळी म्हणाले. 

उस्मानाबाद जिल्ह्याचा झपाट्याने विकास करण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या समन्वयाने काम करावे. रोजगार हमी योजनेबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करावी. मोठ्या संख्येने जॉब कार्ड उपलब्ध करुन द्यावे तसेच प्रत्येक गावामागे पाच कामे सेल्फ वर ठेवा. म्हणजे मागेल त्याला काम या संकल्पनेचा अवलंब करणे अधिकाधिक सोपे होईल. सेल्फच्या (Self) माध्यमातून पाच कामांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता असलेल्या कामांमुळे काम मागणाऱ्याला लवकर काम सुरु करण्यास मदत मिळते.

जलसंधारण विभागाने पूर्ण क्षमतेने काम केल्यास जिल्ह्यात पडणाऱ्या सरासरी 70 सें.मी. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न सुटतील असेही श्री.नंदकुमार यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 622 ग्राम पंचायतीतील माहिती दिली . ते म्हणाले की, जिल्ह्यात एकूण मंजुरांची संख्या 6 लाख 52 हजार आहे . त्यापैकी 2 लाख 91 हजार मजुरांना जॉबकार्ड देण्यात आले आहे तर 59 हजार मजूर कामांवर आहेत. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 54 हजार 882 योजनेच्या सुरुवातीपासून आहेत. 39 हजार 560 कामे पूर्ण झाली असून 15 हजार 322 कामे अपूर्ण आहेत. पूर्ण कामांची टक्केवारी 72.8 टक्के असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. यावेळी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .चंदनशिवे यांनी केले तर आभार जिल्हा परिषदेचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक विलास खिल्लारे यांनी मानले.

श्री सिध्दीविनायक अग्रीटेक इंडस्ट्रीजचा रोलर पूजन सोहळा उत्साहात संपन्न.

उस्मानाबाद 

आज दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड देवकुरुळी ता.तुळजापूर या कारखान्याचा मिल रोलर पूजनाचा समारंभ उत्साहात संपन्न झाला.सदरचा कार्यक्रम श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये व जिल्हा परिषद सदस्य वसंत वडगावे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.अनिल काळे व जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.नितीन भोसले  यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन भाऊ रोचकरी, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट चे अध्यक्ष व्यंकटेश कोरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख,तुळजापूर भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सत्यवान सुरवसे, आनंद कंदले, विशाल रोचकरी, प्रभाकर मुळे,सत्यवान सुरवसे, साहेबराव घुगे, दत्ता राजमाने,प.स.सदस्य चित्तरंजन सरडे, प.स.सदस्य शिवाजी साठे, प.स.सदस्य पिंटू कळसुरे, नांदुरी सरपंच मोहन मुळे, उपसरपंच हनुमंत जाधव, देवकुरुळीचे सरपंच राहुल कलाटे, अनिल जाधव, नागेश चौगुले, बाबा बेटकर, शिवाजी शिंदे, विजय रोकडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमास श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड चे कर्मचारी व सिध्दीविनायक परिवाराचे हितचिंतक व परिसरातील शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी कारखान्याच्या जडणघडणीचा लेखाजोखा मांडला व तुळजापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन या भागात कारखाना उभारण्याचा संकल्प केल्याचे सांगितले व ऑक्‍टोबर महिन्यात मोळी पूजनाचा कार्यक्रम घेण्याचा निश्चय व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲ प्रतीक देवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

११ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक  ११  सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


२) दिनांक ११ सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील   १०  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ११ सप्टेंबर  २०२१ रोजी  १०  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

बायोडिझेल ची अवैध विक्री करणाऱ्या ठिकाणी प्रशासनाची धाड





 उस्मानाबाद

आज दिनांक 09.09.2021 रोजी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी त्यांचेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हयात बायोडिझेल सदृष्य ज्वलनशील पदार्थाची साठवणुक करणाऱ्या ठिकाणी व अवैध विक्री करणा-या ठिकाणावर अचानक छापे /धाड /कार्यवाही करणेसाठी महसुल व पोलीस विभागाची एकत्र पथके तयार करून कार्यवाहीचे आदेश दिले. तुळजापुर तालुक्यात मा.उप विभागीय अधिकारी उस्मनाबाद यांचे उपस्थितीत आज रोजी अचानक धाडसत्र राबविले असता पुढील पाच ठिकाणी बायोडिझेल सदृष्य ज्वलनशील पदार्थाची साठवणुक व विक्री करताना कार्यवाही करण्यात आली.


1) सोलापुर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत जयशंकर धाब्याच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये Rivo कंपनीच्या पिवळ्या रंगाच्या 04 टाक्यात प्रत्येकी 2000 लिटर आणि एका पांढ-या रंगाच्या टाकीत 500 लिटर बायोडिझेल सदृष्य ज्वलनशील पदार्थ आढळुन आला या ठिकाणी एकुण 8500 लिटर ज्वलनसिल पदार्थ आढळुन आला असुन त्याची अंदाजे बाजार किंमत 6,80,000 इतकी असुन सदर द्रव जप्त करण्यात आलेला असुन उर्वरित 08 टाक्या रिकाम्या आढळुन आल्या. उपरोक्त सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आलेले असुन ते पुढील चौकशीसाठी पोलीसांकडे सुपुर्द करण्यात आलेले आहे. सदर प्रकरणात श्री दिनकर प्रभाकर सुरवसे वय 35 वर्ष रा जळकोट ता तुळजापुर यांचेवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.


२) मौजे अलियाबाद शिवारातील सोलापुर ते हैद्राबादः जाणारे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रामदेव हॉटेलच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये एका मोठा टँक आढळुन आला त्यामध्ये अंदाजे 600 ते 650 लिटर डिझेल सदृष्य पदार्थ आढळुन आलेला असुन त्याठिकाणचे सर्व साहित्य ताब्यात घेतलेले असुन सर्व वस्तुचा ताबा एन.डी.सुरवसे पोना / 1170 यांच्या सुपुर्द केलेला आहे. सदर प्रकरणात श्री सचिन दगडु हासुरे वय 35 वर्ष रा जळकोट ता तुळजापुर यांचेवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.


3 जळकोट रोडवरील हॉटेल गणेश धाबा येथे एक केशरी बॅरेलमध्ये एक पानबुडी मोटार, बाजुला अर्धा इंच पाण्याची मोटार व एक इलेक्ट्रीक स्टार्टर आढळुन आला. आढळुन आलेल्या 09 टाक्यापैकी 06 टाक्यामध्ये एकत्रित मिळुन 450 लिटर बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थ आढळुन आला. सदर सर्व वस्तु ताब्यात घेण्यात आलेल्या असुन सदर प्रकरणात सत्यनारायण शिवाजी कदम वय 34 वर्ष रा जळकोट ता तुळजापुर यांचेवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

4) मौजे जळकोट शिवारातील हॉटेल गारवा च्या मागील बाजुस स्टोअर रूम, रेस्ट रूम मध्ये दोन नोझल मशीन, एक जनरेटर, एक अर्धा इंच पाण्याची मोटार ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पिवळे मोठे 04 बॅरेल, निळे ०३ बरेल, हिरवे ०२ मोठे बॅरेल आणि निळे प्लास्टीकचे मध्यम ०३ व छोटे 04 बॅरेल सर्व रिकामे स्थितीत आढळून आले. तथापि बॅरेल मधील बायोडीझेल सदृष्य ज्वलनशील पदार्थ कार्यवाहीच्या भीतीने नष्ट केल्याची शक्यता नाकारता येत नाही. निळया मोठया 04 बॅरेलपैकी एका • बरेलमध्ये अंदाजे 20 लिटर बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थ आढळुन आला. तसेच लोखंडी कापलेल्या बॅरेलमध्ये अंदाजे 05 लिटर द्रव आढळुन आला. सदर सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आले असून सदर प्रकरणात श्री खासिम पापुन जमादार वय 53 रा जळकोट ता तुळजापुर यांचेवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

5) मौजे जळकोट शिवारातील हॉटेल महाराजाच्या पाठीमागील बाजुस पत्र्याच्या शेडमध्ये 2000 लिटरचे सरीता कंपनीचे ०५ बॅरेल रिकामे दिसुन आले. परंतु सदर बॅरेलमधील बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थ पथकाच्या कार्यवाहीच्या भीतीने नष्ट केल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बॅरेलचा गंध हा बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थाचा आढळुन आला आहे. तसेच निळ्या रंगाचे 35 ते 40 लिटर क्षमतेचे सात रिकामे बॅरेल सुद्धा आढळुन आले. सदर बॅरेलचा गंध हा बायोडिझेल सदृश्य ज्वलनषि पदार्थाचा होता. जायमोक्यावर डिझेल भरण्यासाठीचे एक नोजल आणि अंदाजे ०५ लिटर बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थाचा एक प्लास्टीक कॅन आढळुन आला. सदरचे सर्व साहीत्य ताब्यात घेण्यात आलेले असुन सदर प्रकरणात श्री शेषेराव शंकर काळे वय 45 वर्ष रा जळकोट ता तुळजापुर यांचेवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

उपरोक्त नमूद बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थाचे अंदाजे बाजार मूल्य रु.7,70,400 /- इतके असून ताब्यात घेतलेल्या साहित्याची किंमत अंदाजे रु.5,40,000/- इतके आहे.

सदर कार्यवाही मध्ये योगेष खरमाटे उप विभागीय अधिकारी उस्मानाबाद, सौदागर तांदळे तहसिलदार तुळजापुर, जगदीष राऊत सपोनि पो स्टे नळदुर्ग, अमित भारती नायब तहसिलदार तुळजापुर, संदीप जाधव नायब तहसिलदार तुळजापुर, संतोष पाटील नायब तहसिलदार तुळजापुर, अमर गांधले मंडळ अधिकारी नळदुर्ग, नेमचंद शिंदे मंडळ अधिकारी इटकळ, पवन भोकरे मंडळ अधिकारी जळकोट, अशोक भातभागे, परमेश्वर शेवाळे, आबासाहेब सुरवसे, गणेश जगताप, दयानंद काळे, तुकाराम कदम, (सर्व तलाठी) तसेच नळदुर्ग पोलीस स्टेशन मधील सपोफौ/429 जोशी, पोह/900 कांबळे, पोह/1251 बांगर, पोह/487 गायकवाड, पोना/1170 सुरवसे, पोकॉ/ 1851 सगर, पोकॉ 1681 पाटील यांनी सहभाग नोंदविला.

उस्मानाबाद शहरात गणरायाचे आगमन

गणपती बाप्पा मोरया ऽऽऽ मंगलमूर्ती मोरया ऽऽऽ स्वर घुमला..

उस्मानाबाद ( कुंदन शिंदे) – विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे आज घराघरात आगमन झाले आहे. गणेश चतुर्थी असल्याने उस्मानाबाद शहरात आज दिवसभर विविध ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापणा केली गेली. कोरोना सारखे संकट कायम असतांनाही गणेशभक्तांचा उत्साह उल्लेखनीय असल्याचे पाहायला मिळते आहे. राज्य सरकारने जारी केलेली कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत गणेशभक्तांनी घरोघरी आपल्या लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापणा केली आहे. घराघरांमध्ये भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. 

सकाळपासूनच उस्मानाबाद छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, बसवेश्वर चौक, भवानी चौक परिसरात गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येते. होते या गणेश मूर्त्यांची किंमती १००ते १००० पर्यंतच्या मूर्त्यां बाजारात होत्या 

मात्र कोरोनामुळे यंदा गणेश आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांवर प्रशासनाने बंदी घातली आहे. यामुळे घरगुती गणेशमूर्तींप्रमाणेच सार्वजनिक मंडळांच्याही गणेशमूर्तींचे आगमन मोजक्या कार्यकर्त्यांसह आणि कोणत्याही वाद्यांच्या दणदणाटाशिवाय सुरू आहे. यामुळे प्रतिवर्षी दिसणारा उत्साह तुलनेने कमी झाला आहे. यामुळे पारंपरिक वाद्ये पथकांच्या हंगामावर कोरोनाचे सावट गतवर्षीप्रमाणेच कायम आहे. 
गणपती बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी देखील मोठी गर्दी होती तसेच मोदक मिठाई खरेदी करण्यासाठी  देखील मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.