खासदार साहेब आपणही मोदींच्या आशिर्वादानेच निवडुन आला आहात : नितीन काळे
उस्मानाबाद –
खासदार साहेब सोयाबीनच्या भावातील घसरण ही बाब फक्त सरकारच्या हातातील मुद्दा नाही तुमच्या भावनिक राजकारणासाठी पंतप्रधानाना बदनाम करू नका कारण तुम्ही संसदेत सुद्धा फक्त आणि फक्त मोदींच्याच कृपेने पोहचला आहात हे लक्षात असू द्या. असा पलटवार भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे. खा. ओमराजे निंबाळकर यांनीमोदीसाहेबाच्या आर्शिवादाने सोयाबीनचे दर पडले असे प्रसिद्धीपत्रक काढले होते त्याला काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सोयाबीनचे दर शिकागोमध्ये सीबॉट (CBOT)येथे जागतिक स्तरावर ठरतात, याची कल्पना खासदारांना असेल अशी अपेक्षाही आम्ही करत नाही. मात्र ज्यांच्या नावावर आपण निवडून आलात, त्यांच्याबाबत विधान करताना त्या विषयाचा निदान थोडा तरी अभ्यास करायला हवा. एकूणच जागतिक स्तरावर सोयाबीनच्या दरामध्ये एकाएकी ऐतिहासिक घट झाली आहे. व आपण गुगल सर्च करण्याचे कष्ट घेतले तर ते लगेच बघायला मिळेल. कोविड महामारी मध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी खाद्य तेलाच्या आयात शुल्कामध्ये कपात करणे गरजेचे होते, सोयाबीन खाद्य तेलाच्या आयात शुल्कामध्ये ४२.५% वरून ३७.२५% घट करण्यात आली आहे. या आयात शुल्कातील बदलामुळे सोयाबीनच्या दरात घट झाली असं म्हणणं म्हणजे अज्ञानाचचं नाही तर हास्यास्पद आहे.
तसेच तुम्ही सोयाबीनचे भाव घसरले हा मुद्दा मांडलात हा एक मुद्दा आहे. मात्र केंद्र सरकारने सोयाबीनच्या आयात शुल्कात केवळ 5% कपात केली असता सोयाबीनचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे ढासळू शकतात? याबाबत सविस्तर माहिती घेतली असता भावातील ही घसरण जागतिक बाजारपेठेतील चढ उतारावर अवलंबुन आहे.
मागील काही महिन्यात खाद्य तेलाच्या दरामध्ये जवळपास 80 टक्के वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पाम तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल या खाद्य तेलाच्या आयात शुल्कामध्ये घट करण्यात आली आहे.
ऐन सोयाबीनच्या हंगामामध्ये आज एवढा दर यापूर्वी कधीही नव्हता. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानूनच आजवर मोदी सरकारने निर्णय घेतलेले आहेत. ठाकरे सरकारचे सर्वेसर्वा कृषिमंत्री असताना देखील सोयाबीनचा भाव चार हजाराच्या पुढे गेला नाही. ऐन हंगामात तर ३००० सुद्धा कधी शेतकऱ्यांना मिळाला नाही. मात्र आज ऐन हंगामात सोयाबीन सहा हजारा पेक्षा जास्त दराने विकले जात आहे. मोदी सरकारचा नेहमीच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न आहे व राहणार आहे.
ज्यांच्या मुळे आपण खासदार झालात, त्या व्यक्तीबाबत व त्यांच्या निर्णया बाबत बोलताना आपण थोडा तरी विचार करायला हवा मात्र अशी अपेक्षा करणं उस्मानाबाद करांनी सोडून दिलं आहे.
शेतकऱ्यांना जोडून पंतप्रधानांना बदनाम करण्यापेक्षा कधीतरी स्वतःच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय काम केले याबाबत सर्व सामान्यानां माहिती द्यावी. अशी आमची मागणी आहे. असे काळे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते खा. ओमराजे निंबाळकर
अतिवृष्टीचा अंदाज आसल्याने सोयाबीन काढणी करावी
उस्मानाबाद,दि.22(प्रतिनिधी):- आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी नैसर्गिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. जिल्हयामध्ये दि. २० ते २२ सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे . या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये लवकर पेरणी केलेल्या आणि काढणीस तयार झालेल्या सोयाबीनची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी, काढणी केलेल्या पीकांचे ढीग (गंजी ) ताडपत्रीने झाकून ठेवावेत . मळणी केलेले सोयाबीन पोत्यांमध्ये ठेवुन पाऊस लागणार नाही. अशा जागी ही पोती ठेवण्याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
पीक विमा भरलेल्या पिकांचे नुकसान विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन,ढगफुटी होऊन,पुराचे पाणी शेतात शिरुन,शेत दीर्घकाळ जलमय होऊन नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास घटना घडल्यापासुन 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी आणि कृषी विभागास देणे बंधनकारक आहे.यामध्ये नुकसान सर्वे नंबरनिहाय नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समितीमार्फत शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात येईल.
पीक विमा भरलेल्या ज्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा पिकांच्या नुकसानीच्या सूचना शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance किंवा विमा कंपनीचे Farmmitra हे ॲप डाऊनलोड करुन त्या ॲपव्दारे आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा 18002095959 या टोल फ्री क्रमांकावर कळवावी. तसेच संबंधित गावचे कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पध्द्तीनेही अर्ज करुन ही माहिती कळवता येईल . असेही आवाहन जिल्हयातील शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी केले आहे.
चोरीच्या शेळ्यासह दोन आरोपी अटकेत
उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : सलीम शेख, रा. जुनोनी यांच्या शेत गट क्र. 66 मधील शेडमधील 2 शेळ्या, 1 कोकरु व 1 बोकड दि. 15- 16 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले होते. यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 231 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत दाखल आहे.
गुन्हा तपासादरम्यान उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. चे पोनि- श्री. साबळे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोफौ- किशोर रोकडे, पोहेकॉ- तुगावकर, पोना- समाधान वाघमारे यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करुन व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जुना बस डेपो, उस्मानाबाद येथील 1) सोमनाथ रामा काळे 2)दिपक लक्ष्मण चव्हाण यांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीच्या शेळ्या व गुन्ह्यात वापरलेली कारसह कटर, मारतुल जप्त केले आहे.
इतर बातम्या
“अवैध मद्य विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : सुधामती सुभाष सगर, रा. होर्टी, ता. तुळजापूर या दि. 21 सप्टेंबर रोजी आपल्या राहत्या घरासमोर 5 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगल्या असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळल्या. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभा करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
तामलवाडी पोलीस ठाणे : वैजिनाथ मारुती सावंत, रा. काटी, ता. तुळजापूर यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी 16.30 वा. सु. तामलवाडी टोलनाक्याजवळील महामार्गावर आपल्या ताब्यातील ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 एजे 1776 हा रहदारीस धोकादायकपने उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.
“चोरी.”
शिराढोन पोलीस ठाणे : शहाजी जंगली शेळके, रा. खामसवाडी, ता. कळंब यांनी त्यांचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएस 7751 हा गावातील तडवळा रस्त्यालगत लावला असता दि. 19- 20 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री त्या ट्रॅक्टरची पुढील दोन्ही चाके व स्टेअरींग सिट अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शहाजी शेळके यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“अपहरन.”
तामलवाडी पोलीस ठाणे : ठेकेदार- अप्पु हुदप्पा खुबसद, रा. सातारा व विठ्ठल एलगौड गौर, रा. सालोटगी, ता. इंडी, जि. विजापूर या दोघांत जुन्या आर्थिक व्यवहारावरुन वाद आहे. अप्पु खुबसद यांनी माळुंब्रा येथील 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्राचे काम घेतले असून त्या ठिकाणी आनंद परशुराम गोळसंगी, रा. मुघळखोड, ता. रायबान, जि. बेळगाव हे पर्यवेक्षक म्हणुन काम पाहत असुन तेथे 7- 8 कामगार आहेत. विठ्ठल गौर यांनी दि. 19 सप्टेंबर रोजी 15.00 वा. सु. त्या ठिकाणी जाउन बेकायदेशीर जमाव जमवून अप्पु खुबसद यांच्या सोबतच्या आर्थिक व्यवहारावरून पर्यवेक्षक गोळसंगी व कामगार- मुकेशराम धनीराम, रा. झारखंड या दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच त्या दोघांना जबरदस्तीने क्रुझर गाडी क्र. के.ए. 28 एन 5561 मध्ये बसवून त्यांचे उपहरन केले व अप्पु खुबसद यांना, “माझे पैसे न दिल्यास या दोघांना सोडणार नाही.” अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या अप्पु खुबसद यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 364 (अ), 365, 385, 504, 506, 143, 147 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे : चालक- शिवकुमार हणमंत सुंटनुरे, रा. कसगी, ता. उमरगा यांनी दि. 14 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. कसगी येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. के.ए. 32 ईक्स 2695 ही चुकीच्या दिशेने, निष्काळजीपने चालवून नरसिम्मा विठ्ठल हुगार, रा. हित्तल शिरुर, ता. आळंद, जि. कलबुर्गी, राज्य- कर्नाटक हे चालवत असलेल्या मोटारसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात नरसिम्मा हे जखमी झाले तर मो.सा. वर पाठीमागे बसलेली त्यांची आई- जयश्री विठ्ठल हुगार, वय 45 वर्षे या मयत झाल्या. अशा मजकुराच्या नरसिम्मा हुगार यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
परंडा पोलीस ठाणे : हनुमंत श्रीधर पाटील, रा. लोणी, ता. परंडा यांच्या शेतातील पावसाचे पाणी गावकरी- अमोल पोपट मटकर यांच्या शेतात येत असल्याने दि. 20 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. लोणी शिवारात अमोल यांनी हनुमंत यांना ते पाणी अडवण्यासाठी सांगीतले. यावर चिडून जाउन हनुमंत पाटील यांनी अमोल यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अमोल मटकर यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
स्वराज्य ध्वजाचे तेरमध्ये जल्लोषात स्वागत.
२३ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
२२ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग या सोबतच गरोदर माता ,स्तनदा माता ,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम रब्बी हंगाम २०२१-२२ अंतर्गत शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
उस्मानाबाद – राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत (एन एम एटी) बियाणे व लागवड साहीत्य उपअभियान कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये फार्म सेव्हड सिड वृदिगंत करून शेतकरी स्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने या उपअभियानांर्गत हरभरा व गहु या पिकासाठी ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम कृषि विभाग व महाबिज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून जिल्ह्यास हरभरा पिकासाठी ४२०० क्वि. व गहू पिकासाठी ६२० क्वि. चे लक्षांक प्राप्त आहे. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत प्रती शेतकरी ०१ एकरच्या मर्यादेत लाभ मिळणार असुन हरभरा पिकासाठी १० वर्षाच्या आतील (जात फुले विक्रम, राजविजय २०२, AKG ११०९, फुले विक्रांत बियाण्यासाठी रु. २५/- प्रती किलो अनुदान देय आहे व १० वर्षावरील (जात जॅकी ९२१८, दिग्वीजय, विजय, विशाल, विराट) बियाण्यासाठी रू. १२/- प्रती किलो अनुदान देय आहे. तसेच गहु पिकाठी १० वर्षाच्या आतील जात फुले समाधान, NPAW- १४१५) विण्यासाठी रु.२०/- प्रती किलो अनुदान देय आहे व १० वर्षावरील (जात MACs६२२२, HI १५४४, GW ४९६, लोकवन) बियाण्यासाठी रु. १०/- प्रती किलो अनुदान देय आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी नजिकच्या सामुहीक सेवा केंद्रे, ठिकानी जाऊन किंवा ज्या शेतक-याकडे Android स्मार्ट मोबाईल आहे अशा शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ” Maha DBT Farmer” हे अॅप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यावे. सदर सुविधा वापरकर्ता आयडी व आधार क्रमांक आधारीत असल्याने एकाच गावातुन स्मार्ट मोबाईल असणा-या शेतक-यांच्या मोबाईलवर सदर अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यास अनेक शेतकरी अर्ज करू शकतील. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२१ आहे.
ग्रामबिजोत्पादन योजनेत जिल्ह्यातील तेर, बेंबळी, तुळजापुर, सावरगाव, कळंब, मोहा, उमरगा, मुरूम, परंडा, आसु, भुम, ईंट, लोहारा, वाशी या महसुल मंडळाची निवड करण्यात आलेली असुन निवडण्यात आलेल्या महसुल मंडळातील गावातील शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयासी संपर्क साधावा. असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
मुद्रांक विक्रेत्यांचा संप नागरिकांची हेळसांड
उस्मानाबाद – मुद्रांक विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला असून या संपामुळे नागरिकांची हेळसांड झालेली पाहायला मिळाली. गेले अनेक दिवस मुद्रांक विक्रेते विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी आज संपाचा निर्णय घेतला.अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक व नोंदणी पुणे येथे ७ सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चामध्ये दिलेल्या अश्वासनानुसार संघटनेकडून करण्यात आलेल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे २१ सप्टेंबर पासून संघटनेकडून बेमुदत संप करण्याकरीता महाराष्ट्र मधील सर्व शासनमान्य मुद्रांक विक्रेते अर्ज व दस्त लेखक संघटनेणे संप पुकारला आहे. त्याला उस्मानाबाद येथील मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.






























