Home Blog Page 173

अवैध कत्तलखान्याविरोधात २५ संघटना एकवटल्या

भ्याड हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी


उस्मानाबाद –

समाज कंटकाकडून पोलिस बांधवासह पशूमानक अधिकारी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विविध २५ संघटनांकडून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले असून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री  शहरातील पोलीसं पथक कत्तल खान्यावर कारवाई करण्यासाठी गेले असता तेथील कसाई यांनी व त्यां माणसांनी पोलीसांवर व गोरक्षकावर हल्ला चढवला त्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी एक पशु मानद कल्याण अधिकारी व अन्य एक असे चार जन गंभीर जखमी झाले पोलीस व पशु मानद अधिकारी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न यावेळी कसाईकडून झाला.  वास्तविकतः जन रक्षण करण्यासाठी कटीबद्द असलेल्या व आपले कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना हल्ला होणे ही बाबच मुळात खुप गंभीर आहे. मागील काही दिवसात एका विशिष्ट समाजातील ठराविक लोकांकडून पोलीसांवर हा दुसऱ्यांदा हल्ला केला आहे. मागील हल्ल्यात देखील पोलीस बांधव गंभीर जखमी झाले होते. जनतेचे रक्षण करणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे पोलीस बांधवांवर अशी परिस्थीती आहे. तर सामान्य नागरीक काय होईल याचाही विचार केला गेला पाहिजे. मागील काही दिवसांत शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला सर्व आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा अन्यथा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येत आहे अशीच परस्थिती कायम राहिल्यास शहरात व जिल्हाभरात व्यापक जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व संघटना दिला आहे.


दैनिक जनमत ०८ फेब्रुवारी २०२२ E paper

दैनिक जनमत ०७ फेब्रुवारी २०२२ E paper

 

लाखनगाव येथे दोन शेतकऱ्यांचा ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक


 तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांचा ना पत्ता ना मुद्दा!

 प्रशासनाचा आपत्ती निवारण कार्यक्रम फक्त कागदावरच?





 पारा (राहुल शेळके ):वाशी तालुक्यातील लाखनगाव येथील तोडणीस आलेल्या ऊसाच्या फडाला शनिवारी दुपारी शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे. 
         याबाबत अधिक माहिती अशी की लाखनगाव येथील आडका क्षेत्रातील गणपत रावसाहेब ढेपे यांच्या शेतातील सर्वे नंबर 666 मधील 60आर ऊस, तसेच हनुमंत श्रीराम ढेपे यांच्या सर्वे नंबर 665 क्षेत्रांमधील 80 आर उसाची पूर्णपणे वाढ होऊन हा ऊस तोडणी योग्य झाला होता. मात्र शेतातून गेलेल्या विद्युत तारा ऊसामध्ये लोंबकळत होत्या. वाऱ्यामुळे त्यांच्यात घर्षण होऊन शनिवारी दुपारी दोन वाजता लागलेल्या आगीत ऊस जळून पूर्णपणे खाक झालेला आहे. आग लागल्याचे समजताच गावातील तरुण मुलांनी आग विझवण्याचे खूप प्रयत्न केले त्यांचे प्रयत्न फोल ठरले.मात्र त्यांना आगीचा विस्तार होऊन नुकसान टाळता आले. दरम्यान या शेतकऱ्यांनी गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना कळवले असता ते मुख्यालयी राहत नसल्याकारणाने घटनास्थळी सायंकाळपर्यंत ही पंचनामा साठी येऊ शकले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाचा आपत्ती निवारण कार्यक्रम हा फक्त कागदोपत्रीच राहतो का काय? ज्यावेळी खरच नागरिकांना गरज पडते त्यामुळे मात्र प्रशासन झोपा काढते की काय असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून  या शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शेतकरी संघटनेचे आंदोलन, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांच्या प्रतिमेचे केले दहन

 



उस्मानाबाद

विज वितरण कंपनीने विज पुरवठा खंडित करण्याची कारवाई बंद करावी या मागणीसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिक्षक अभियंता उस्मानाबाद यांना निवेदन दिले या निवेदनात विजपुरवठा खंडित करण्याची मोहिम त्वरीत बंद करावी,विजे बिले दुरूस्त करून द्यावीत,इगतपुरीच्या शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना मुक्त करावे, बेकायदेशीर वीज पुरवठा खंडित करणाऱ्या वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर अधिक्षक अभियंता मंडळ कार्यालयासमोर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले या निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, जिल्हाध्यक्ष नवनाथ जाधवर, विनोद बिक्कड,दिपक वाकूरे,उदय कुलकर्णी,भारत पाटील, जयंत रणदिवे,लक्ष्मण जाधव,सचिन देशमुख, गोरोबा पांचाळ,वामन टेकाळे, बाळासाहेब सरवदे,शामराव पाटील, सुदर्शन सुरवसे, लक्ष्मण मुंडे,हणूमंत बोंदर, नवनाथ देवगिरे, संतोष राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



स्पर्शच्या वतीने किलजमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम आणि महिला आरोग्य विषयक संवाद

 


सलगरा,दि.२(प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील किलज ग्रामपंचायत कार्यालय येथे दि.२ फ्रेब्रुवारी रोजी स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर येथील फिरत्या दवाखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील गावांमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महिला आरोग्य विषयक संवाद कार्यक्रम राबवला जात आहे. म्हणुन त्याच अनुषंगाने किलज येथे ग्रामपंचायत कार्यालय समोरील परिसरात किलज येथील महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महिला आरोग्य विषयक संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये गावातील महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात होती, आयोजित कार्यक्रमात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच स्पर्श च्या वतीने उपस्थित महिलांना आरोग्य विषयक माहिती देण्यात आली.  स्पर्शच्या वतीने कार्यक्षेत्रातील गावात फिरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे, यामध्ये या रुग्णालयाचे आरोग्य विषयक फायदे याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली. 

या कार्यक्रमास किलज येथील महिलांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रकल्प समन्वयक तुकाराम गायकवाड, सुपर वायझर पवन गायकवाड, सरपंच अर्चना शिंदे, उपसरपंच दिक्षा गवळी, उमेद गटाच्या सीआरपी जगदेवी शेळके, उमेद गटाच्या प्रभाग समन्वयक कल्पना घुरे, आशाकार्यकर्त्या छाया गवळी, यांसह किलज येथील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.